Blog

Enquire Now
Uncategorized

अतिजोखमीची गर्भधारणा

अतिजोखमीची गर्भधारणा

Author : Dr Jigna Tamagond, Consultant-Fertility Specialist, Oasis Fertility, Karimnagar

अतिजोखमीची गर्भधारणा- हे करा आणि हे करू नका

गर्भधारणा म्हटले की मुळातच स्त्रियांच्या मनात भिती आणि अगतिकता निर्माण होते. काही वैद्यकीय परिस्थिती आणि आपण निवडलेल्या जीवनशैलीमुळे अतिजोखमीचे गरोदरपण निर्माण होते व आई आणि बाळ दोघांच्याही जीवाला धोका निर्माण होतो. आई आणि बाळ दोघांच्याही सुरक्षेसाठी अशा धोकादायक वैद्यकीय परीस्थिती आधीच ओळखून त्यासाठी योग्य उपाय करायला हवेत.

अतिजोखमीच्या गरोदरपणाची कारणे:

 

  1. शारीरिक अवस्था

  2. मधुमेह:

जर तुम्हाला गर्भधारणा होण्याआधीपासून मधुमेह असेल किंवा गरोदरपणा दरम्यान मधुमेह (गरोदरपणातील मधुमेह) असेल आणि साखरेचे प्रमाण अनियंत्रित असेल तर आई आणि बाळ दोघांच्याही जीवाला धोका असतो. विशेषत: जर तुम्हाला गरोदरपणातील मधुमेह असेल आणि तुमचे वजनही प्रमाणापेक्षा जास्त असेल तर हा धोका अधिक असतो.

  1. पीसीओएस

पीसीओएस असलेल्या स्त्रियांना इन्सुलिनचा विरोध, हृदयरोग, पक्षाघात इत्यादी आजार होण्याचा धोका अधिक असतो.

 

  1. थायरॉईड
  2. थायरॉईड असलेल्या स्त्रियांमध्ये प्रीक्लांपशिया (उच्च रक्तदाब),प्लेसेंटल अब्रप्शन (नुकतेच गर्भाशयापासून वेगळी झालेली नाळ), पल्मनरी हायपरटेन्शन इत्यादी समस्या निर्माण होतात.या समस्यांमुळे गर्भपात,जन्माच्या वेळी बाळाचे वजन कमी असणे आणि मृत बाळाचा जन्म य समस्या उद्भवतात.

 

  1. प्रतिकारशक्तीशी निगडीत आजार

सिस्टेमिक ल्युपस एरीथेमेटोसस सारख्या प्रतिकारशक्तीशी निगडीत आजार झाल्यास अनेक जटील समस्या उद्भवू शकतात.त्याकरता सर्व बाजूंनी काळजी घेतल्यास स्त्रियांची गर्भावस्था व बाळाचा जन्म या दोन्ही गोष्टी सुरक्षितरित्या होऊ शकतात.

 

  1. उच्च रक्तदाब

रक्तदाब अतिशय वाढल्याने पक्षाघात, प्लेसेंटल अब्रप्शन इत्यादी समस्या उद्भवतात.

 

  1. स्थूलता

स्थूल स्त्रियांच्या अपत्यांमध्ये जन्मजात विकृती, वेळेआधी प्रसूती, नवजात अर्भकाचा मृत्यू इत्यादी समस्या असू शकतात.

 

  1. जीवनशैलीशी निगडीत समस्या

  2. धूम्रपान

धूम्रपान करणाऱ्या स्त्रियांच्या बाळांमध्ये जन्मजात दोष असण्याची शक्यता अधिक असते.

  1. मद्यपान

ज्या महिला मोठ्या प्रमाणात मद्यपान करतात त्यांच्या बालकांमध्ये फिटल अल्कोहोल स्पेक्ट्रम डिसॉर्डर (FASD) असण्याचा धोका असतो. यामध्ये शारीरिक अपंगत्व, नर्वस सिस्टीमला होणारे नुकसान’ इत्यादी हानी होते.

  1. औषधे घेणे

औषधे घेतल्याने पोटातील गर्भाचा मृत्यू होऊ शकतो किंवा बालकाला काही शारीरिक विकृती होऊ शकतात,

 

  1. वय- ३५ वर्षे उलटून गेल्यानंतर पहिल्यांदा गर्भधारणा होणे

आईचे वय अधिक असल्यास गर्भ पोटातच दगावण्याची आणि इतर समस्या उद्भवण्याची शक्यता असते.

 

  1. अनेक गर्भधारणा

अनेकवेळा गर्भधारणा झालेल्या स्त्रियांना गर्भारपणात उच्च रक्तदाब होण्याची शक्यता असते. त्यामुळे गर्भपात, वेळेआधी प्रसूती, जन्मजात विकृती अशा अनेक समस्या उद्भवतात.

गरोदरपणात घ्यावयाची काळजी

  1. धूम्रपानाने गर्भातील बाळाची वाढ खुंटते त्यामुळे धूम्रपान टाळा.
  2. कच्चे मांस खाऊ नका, त्यामुळे मृत बालक जन्माला येऊ शकते किंवा गर्भातील बाळाला अपाय होऊ शकतात.
  3. कॉफी घेऊ नका. अतिप्रमाणात कॉफी पिल्याने गर्भपात होऊ शकतो.

4.ताण घेऊ नका आणि योगा करणे व चांगले संगीत ऐकण्यावर भर द्या.

  1. मद्यपान करणे टाळा, त्यामुळे बाळाला अनेक प्रकारच्या समस्या होऊ शकतात.

 

गरोदरपणात काय काय करावे?

  1. चांगली झोप घ्या. गरोदरपणात शांत झोप झाल्याने तुमची प्रतिकारशक्ती सुधारते आणि मेंदू तुमचे हार्मोन्स संतुलित ठेवतो.
  2. ताजे सकस अन्न घ्या. जेवणात भरपूर भाज्या, फळे आणि प्रक्रिया केलेले अन्न खा.
  3. वजन नियंत्रित ठेवा. गरोदरपणात वाढलेले वजन अनेक समस्यांना जन्म देते.
  4. फॉलिक अॅसिडसारखी गरोदरपणातील जीवनसत्व घ्या जेणेकरून बाळाला कोणत्याही प्रकारच्या जन्मजात शारीरिक विकृती होणार नाहीत.
  5. नियमितपणे आरोग्य तपासणी करा
  6. आई आणि बाळ दोघांसाठी फायदेशीर ठरणारे योगासने अथवा व्यायाम करा.

 

डॉक्टरांच्या मदतीने जोखमीच्या गर्भधारणेवर योग्य उपचार करता येतात. तुम्हाला मधुमेहाचा धोका असल्यास गरोदरपणाच्या २४ ते २८ आठवड्याच्या दरम्यान साखरेचे प्रमाण तपासावे.परंतु तुम्हाला आधीपासून मधुमेह असल्यास सुरुवातीलाच मधुमेहाची चाचणी करून घ्यावी. प्रत्येक वेळी स्त्रीरोगतज्ज्ञाकडे गेल्यावर रक्तदाबाची तपासणी करायलाच हवी.

सर्व सूचनांचे पालन करावे आणि सर्व औषधे वेळेवर घ्यावीत. सुरक्षितरित्या प्रसूती होऊन निरोगी बाळ होण्यासाठी महिलेचा दृष्टीकोन सकारात्मक असणे आणि मन आनंदी असणे आवश्यक आहे.

Write a Comment