Blog

Enquire Now
Case Study

गर्भाशयातील फायब्रॉइड्सच्या पल्याड विचार करा आणि आपली पालकत्वाची स्वप्ने साकार करा: ओएसिस फर्टीलिटीची यशोगाथा

अनेक जोडपी आपल्यातील वंध्यत्वावर मात करतात परंतु त्यांपैकी काही जोडप्यांसाठी हा प्रवास थोडा अधिक मोठा असतो आणि कुटुंबाची स्वप्ने पाहणाऱ्या या जोडप्यांची प्रचंड भावनिक व मानसिकफरपट होते. आव्हानांना भिडावे व त्यांच्यावर मात करावी असे म्हटले जाते. आणि, अनेक जोडप्यांचे पालक होण्याचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या प्रजननक्षम औषधांच्या बाबतीत तर हे अगदीच खरे आहे.

३९ वर्षांची पूजा आणि तिचा ४७ वर्षांचा नवरा दिनेश यांच्या लग्नाला १४ वर्षे झाली होती. ते स्वत:च्या बाळासाठी आतुर होते. गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी वंध्यत्वावर अनेक प्रकारचे उपचार घेतले होते परंतु त्यांना यश मिळाले नाही. मग ते दोघे ओएसिस फर्टीलिटी सेंटरच्या वंध्यत्व विशेषज्ञ डॉ. निलेश उन्मेष बलकवडे यांना भेटले. या जोडप्याने पूर्वी घेतलेले वंध्यत्वावरील अनेक उपचार अयशस्वी ठरले होते.

वैद्यकीय आढावा घेताना डॉक्टरांना गर्भाशयामध्ये मोठ्या आकाराचे फायब्रॉइड्स दिसले. तिचे वाढते वय व एएमएच ची कमी मात्रा लक्षात घेऊन उपचार पद्धती ठरवण्यात आली. ज्यामध्ये सर्वात आधी फायब्रॉइड्स काढून टाकण्यात आले. तिच्या नवऱ्याच्या सेमेनची मात्रा अगदी योग्य होती.

गर्भाशयातील फायब्रॉइड्स हे स्त्रियांच्या प्रजननाच्या मार्गातील सौम्य गाठी असतात. या गाठी सामान्यत:२०-४०% महिलांच्या प्रजननाच्या वर्षांमध्ये त्यांच्या गर्भाशयात आढळतात. नुकत्याच झालेल्या वैद्यकीय अभ्यासानुसार अनेक महिला आपले गर्भारपण पुढे ढकलत उशिरा आई होण्याचा निर्णय घेतात. वंध्यत्व असणाऱ्या महिलांच्या गर्भाशयामध्ये आकाराने लहान पण ठराविक संख्येचे फायब्रॉइड्स आढळतात.

शक्यतो फायब्रॉइड्सची लक्षणे दिसत नाहीत आणि बराच काळ त्यांचे निदान होऊ शकत नाही. असे असले तरीही, काही वेळा पाळीच्या वेळी होणारा अतिरिक्त रक्तस्त्राव, पाळीच्या वेळी प्रचंड वेदना होणे, ओटीपोट जड होणे, सातत्याने लघवीला जावे लागणे व संभोगाच्या वेळी वेदना होणे यांसारखी अनेक लक्षणे दिसून येतात.

गर्भाशयाच्या थरानुसार (सबसेरस, इंट्राम्युरल आणि सबमकस) फायब्रॉइड्सचे वर्गीकरण केले जाते. औषधाने, शस्त्रक्रियेने किंवा अगदी कमीत कमी तंत्रज्ञान वापरून गर्भाशयातील फायब्रॉइड्सवर नियंत्रण मिळवता येते. फायब्रॉइडची संख्या, त्याचा प्रकार व आकार यांवर करावी लागणारी शस्त्रक्रिया व पुढील गरोदरपण लांबवण्याचा वेळ अवलंबून असतो.

मियोमेक्टोमी म्हणजे काय ? 

गर्भाशय निरोगी ठेवण्यासाठी फायब्रॉइड्स काढून टाकताना कराव्या लागणाऱ्या शस्त्रक्रियेला मियोमेक्टोमी असे म्हणतात. मियोमेक्टोमी केल्यानंतर गरोदर राहण्याच्या शक्यता वाढवण्याच्या दृष्टीने फायब्रॉइड्स व वंध्यत्व असणाऱ्या स्त्रियांना बहुतेकवेळा शस्त्रक्रिया करवून घेण्याचा सल्ला दिला जातो. गर्भाशयाच्या काठावर किंवा गर्भाशयाबाहेर असणारे फायब्रॉइड्स लॅप्रोस्कोपिक मियोमेक्टोमी ने काढून टाकता येऊ शकतात.

मियोमेक्टोमी केल्यानंतर गर्भधारणा होण्याची शक्यता आहे का ?

बहुतेक जोडप्यांच्या बाबतीत मियोमेक्टोमी केल्यानंतर गर्भधारणा होते. परंतु या शक्यता स्त्रीचे वय, फायब्रॉइड्सची संख्या, आकार, ठिकाण व इतर संबंधित घटकांवर अवलंबून असतात. लॅप्रोस्कोपिक मियोमेक्टोमी केल्यानंतर रुग्ण बरी होण्यास १-२ आठवड्यांचा कालावधी लागतो.

पूजाच्या बाबतीत, पहिल्यांदा गर्भामध्ये बीजांडाचे रोपण केले गेले व त्यानंतर लॅप्रोस्कोपिक मियोमेक्टोमी केली गेली. एका महिन्यांनी पूजा बरी झाल्यानंतर जतन केलेल्या गर्भरोपणाचे चक्र सुरु करण्यात आले व पहिल्यांदा दोन आरोग्यपूर्ण गर्भाचे रोपण करण्यात आले. या उपचारांना यश मिळाले व तिला गर्भधारणा झाली.

त्यांना पहिल्याच चक्रामध्ये अपेक्षित यश मिळाले आणि राहिलेला गर्भ इतर कोणत्याही अडथळ्यांशिवाय वाढू लागला. आणि आता तिची दुसरी तिमाही चालू आहे.

जोडप्याने त्यांना त्यांचे सुख मिळवून देणाऱ्या डॉ. निलेश बलकवडे यांच्याविषयी व ओएसिस फर्टीलिटी विषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

डॉ. निलेश उन्मेष बलकवडे हे वाकड येथील प्रख्यात आयव्हीएफ तज्ञ आहेत. त्यांना वंध्यत्व, प्रजननक्षम औषधोपचार व स्त्रीरोग एंडोस्कोपी या क्षेत्रांतील दहा वर्षांचा अनुभव आहे. डॉ. निलेश हे आपल्या प्रदीर्घ अनुभवासाठी व अत्यंत काळजीपूर्वक यशस्वी उपचार करून अनेक वंध्यत्वग्रस्त जोडप्यांना पालकत्वाचा आनंद मिळवून देण्यासाठी प्रसिद्ध आहेत.

जर तुम्हीही गर्भाशयातील फायब्रॉइड्सने त्रस्त असाल व याविषयी आणखी जाणून घेऊ इच्छित असाल तर आमचे वंध्यत्व विशेषज्ञ तुम्हाला गर्भधारणा होण्याच्या शक्यता बळावण्यासाठी निश्चितपणे मदत करतील.

Write a Comment