Blog

Enquire Now
Uncategorized

महिलांमध्ये असलेला संप्रेरकांचा असमतोल आणि वंध्यत्व

महिलांमध्ये असलेला संप्रेरकांचा असमतोल आणि वंध्यत्व

शरीराची यंत्रणा योग्य पद्धतीने चालत राहण्यामध्ये संप्रेरकांचा अतिशय महत्वाचा वाटा असतो. मानवी शरीरात ५० परिचित संप्रेरके रक्तामधून संचार करत असतात त्यामुळे शरीराच्या सर्व क्रियांचे व त्यामध्ये असणाऱ्या विविध यंत्रणांचे नियमन होत असते. या क्रियांमध्ये चयापचय क्रिया, शरीराच्या तापमानाचे नियमन आणि वाढ यांचा समावेश असतो. संप्रेरकांच्या गुणवत्तेमध्ये किंवा संख्येमध्ये असलेल्या कोणत्याही बिघाडामुळे संप्रेरकांचा असमतोल होतो. संप्रेरके बाहेर पडण्याच्या वेळा आणि त्यांचे इतर संप्रेरकांशी असलेला संपर्क हेदेखील अतिशय महत्वाचे असते.

महिलांमधील गर्भधारणेच्या क्षमतेसाठी अनेक संप्रेरके जबाबदार असतात. गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असताना ह्या संप्रेरकांपैकी कोणतेही संप्रेरक कारणीभूत ठरू शकते. म्हणूनच गर्भधारणेसाठी प्रयत्न करण्याच्याआधी आपली सर्व संप्रेरके व्यवस्थित कार्य करत असल्याची खात्री करून घेणे उत्तम. गर्भधारणा होण्यातील अडचणी. गर्भधारणेसाठी तुम्ही जास्त काळापासून प्रयत्न करत असाल तर

गर्भधारणेवर संप्रेरकांचा होणारा परिणाम

1.बीजकोश प्रेरक संप्रेरक (FSH)

नियमित मासिक पाळीच्या चक्रासाठी हे संप्रेरक अतिशय महत्वाचे आहे व ते स्त्रीच्या अंडाशयातील अंडी परिपक्व होण्यासाठी मदत करते. ज्या स्त्रियांचे अंडाशय व्यवस्थित कार्य करत नसते, त्या स्त्रियांचे शरीर अंडाशयाचे हे कार्य भरून काढण्याचे प्रयत्न करत असते म्हणूनच, त्या स्त्रियांच्या शरीरात FSH चे प्रमाण अधिक असते

2.जननग्रंथीचे कार्य नियंत्रित करणारे संप्रेरक (LH): 

फलन क्रियेसाठी योग्य असलेल्या वेळेमध्ये अंडाशयातून परिपक्व अंडे बाहेर सोडण्याचे काम या संप्रेरकाचे असते. फलन क्रियेचा अंदाज बांधणारी अनेक यंत्रे हेच संप्रेरक वापरतात कारण, हे संप्रेरक फलन क्रीयेपूर्वी वाढलेले असते

3.म्यूलेरीयनविरोधी संप्रेरक (AMH): 

अपरिपक्व अंडे असणाऱ्या अंडाशयातील बीजकोषामध्ये म्यूलेरीयनविरोधी संप्रेरक (AMH) तयार होते. या संप्रेरकाच्या पातळीवरून स्त्रीच्या अंडाशयात राहिलेल्या स्त्रीबीजांची कल्पना येते. AMH चे घटते प्रमाण हे वंध्यत्वाचे एक कारण ठरू शकते

4.इस्ट्रोजन : 

इस्ट्रोजेन हे संप्रेरक संभोगाची प्राथमिक व द्वितीय स्तरावरील वैशिष्ट्यांचे आणि स्त्रियांच्या प्रजनन यंत्रणेचे नियमन करते. इस्ट्रोजच्या प्रभावामुळे कधीकधी गर्भधारणेमध्ये अडथळे निर्माण होताना दिसतात

5.प्रोजेस्टेरॉन

गर्भधारणेचे पोषण करण्यासाठी प्रोजेस्टेरॉन हे संप्रेरक गरजेचे असते. हे संप्रेरक गर्भाशयाचे आवरण जाड करून आतील गर्भाचे योग्य पोषण करण्यास मदत करते. स्त्रियांमधील प्रोजेस्टेरॉनचे प्रमाण कमी असल्यास गर्भपात होतात.

6.थायरॉईड संप्रेरके : 

थायरॉईड संप्रेरकांपैकी T3 आणि T4 ही संप्रेरके प्रजनन क्षमतेशी निगडीत असतात. याचा परिणाम अन्नपचन व चयापचय क्रीयेवरही होतो. थायरॉईड संप्रेरकांचा असमतोल झाल्यास देखील तुम्हाला गर्भधारना होण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात

7.प्रोलॅक्टीन: 

स्तनांमध्ये दूध तयार होण्यासाठी प्रोलॅक्टीन हे संप्रेरक गरजेचे असते, परंतु हे संप्रेरक तेवढेच कार्य करत नाही. स्त्रियांना गर्भधारणा होण्यासाठी या संप्रेरकाची भूमिका प्रामुख्याने महत्वाची असते. प्रोलॅक्टीनची पातळी योग्य नसल्यास तुम्हाला अनियमित पाळीचा त्रास होऊ शकतो व त्यामुळे तुम्चाला गर्भधारणा होताना अडचणी येऊ शकतात

प्रजननक्षमतेवर प्रभाव करणाऱ्या संप्रेरकांच्या असमतोलाची लक्षणे

संप्रेरकांमधील असमतोलाच त्रास असणाऱ्या महिलांनी खालीलपैकी एक किंवा अनेक लक्षणांकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे. अनेक स्त्रियांमध्ये कोणतीही बाह्य लक्षणे दिसत नाहीत. स्वत:ची चिकित्सा स्वत: करताना ही लक्षणे बघू नयेत

  • अनियमित मासिक पाळी
  • अनियमित रक्तस्त्राव किंवा रक्ताचे डाग पडणे
  • चेहऱ्यावरील केस येणे
  • पुरळ
  • शरीरावर पुरुषांसारखे केस असणे किंवा केस गळणे
  • वजन वाढणे 
  • मन:स्थितीत बदल होणे 

वंध्यत्व निर्माण करणाऱ्या संप्रेरकांमधील असमतोलाची कारणे

वंध्यत्व किंवा गर्भधारणेमध्ये अडथळे निर्माण होण्याची सर्वात सामान्य कारणे अशी आहेत

  • अॅनओव्हलेशन

ही अशी अवस्था आहे ज्यामध्ये स्त्रियांच्या स्त्रीबीजाचे फलन होत नाही

  • पॉलिसिस्टीक ओव्हारीयन सिंड्रोम

पीसीओ या आजारामध्ये स्त्रियांमधील स्त्रीबीजे अपरिपक्व राहतात व त्यांच्या गाठी तयार होतात. यामुळे स्त्रियांच्या गर्भधारणेमध्ये अडथळे निर्माण होतात व स्त्रियांमध्ये वंध्यत्व येते

  • हायपरप्रोलॅक्टीनेमिया:

या अवस्थेमध्ये, स्त्रियांमध्ये प्रोलॅक्टीनचे प्रमाण अतिरिक्त असते. यामुळे त्यांच्यामध्ये अनियमित मासिक पाळी व वंध्यत्व असते.

संप्रेरकांच्या असमतोलामुळे निर्माण झालेल्या वंध्यत्वावर कशाप्रकारे उपचार केले जातात

वंध्यत्वाला कारणीभूत असलेली संप्रेरके व तुमच्यामध्ये असलेली लक्षणे यांच्या आधारे तुमचा आरोग्य चिकित्सक अशी औषधे निवडतो जी

  • मासिक पाळीचे चक्र नियमित करतात.
  • फलनक्रिया सुकर करतात
  • थायरॉइड ग्रंथींच्या कार्याचे नियमन करतात.
  • प्रोलॅक्टीनची पातळी योग्य प्रमाणात ठेवतात

तुमचे वंध्यत्व तज्ञकदाचित तुमच्या जीवनशैलीमध्ये काही बदल सुचवतील आणि गर्भधारणा होण्यासाठी वजन कमी करण्याचा सल्ला देतील.

तुमच्या गर्भधारणेमध्ये तुमची संप्रेरके अडथळे निर्माण करत असतील असे जर तुम्हाला वाटत असेल तर ओएसिस गर्भधारणा केंद्रातीलं वंध्यत्व तज्ञांशी संपर्क साधा.

Write a Comment