Blog

Enquire Now
Case Study

PCOS असलेल्या महिलांना CAPA IVM उपचार- औषधविरहित IVF नियम वापरून भारतातील पहिले CAPA IVM बाळ आले.

शिवा (३५) आणि शैलजा (३३) यांच्या लग्नाला ५ वर्षे झाली असून त्यांना प्राथमिक वंध्यत्वाचे निदान झाले होते.त्यांची OI TI ची अनेक चक्र अयशस्वी ठरल्यानंतर गंभीर PCOD असलेले ते ओएसिस फर्टीलिटी मध्ये आले होते. वारंगल ओएसिस फर्टीलिटचे मुख्य अधीक्षक व वंध्यत्व तज्ञ Dr. Jalagam Kavya Rao यांनी नवरा- बायको दोघांच्याही वंध्यत्व चाचण्या केल्या.चाचण्या अंती असे लक्षात आले की शैलजा यांचा AMH ११.७ होता आणि त्यांची मासिक पाळी अनियमित होती.त्यांच्या पतीची शुक्राणू संख्या सामान्य असली तरीही शुक्राणूंची हालचाल थोडी कमी होती.

डॉ काव्या यांनी जोडप्याची सखोल तपासणी करून सुरुवातीला आययुआय चक्राचे नियोजन केले. संपूर्ण तपासणीदरम्यान कोणतेही ठळक विकार न दिसल्याने Dr. Kavya यांनी त्यांना IVF करण्याचा सल्ला दिला. परंतु, IVF मध्ये असलेली असंख्य इंजेक्शने, औषधे, आणि शारिरीक,भावनिक व आर्थिक खच्चीकरण यांची रुग्णाने घेतलेली धास्ती पाहून Dr.Kavya यांनी त्यांना CAPA IVM ह्या उपचारांची माहिती दिली. हे औषधविरहीत IVF उपचार आयव्हीएफ उपचारांना पर्याय आहेत. हे तुलनेने आर्थिकदृष्ट्या परवडणारे कमी वेदनादायी असल्याने यामुळे जोडप्यामध्ये आशा आणि आत्मविश्वास निर्माण होतो.

गोपनीयता जपण्यासाठी जोडप्याचे नाव बदलले आहे.

CAPA IVM म्हणजे काय?

जोडप्याला खात्रीशीर गर्भधारणा व्हावी या हेतूने IVM ची ओळख करून दिली जाते.IVM जरी अंक वर्षापूर्वीपासून अस्तित्वात असले तरी सध्या त्यामध्ये असलेली गर्भधारणे पूर्वीची पायरी आधीपेक्षा अधिक चांगल्या निष्कर्षाकडे घेऊन जाते.

CAPA IVM ही औषधविरहीत IVF उपचार पद्धती पारंपारिक IVF उपचारांशी स्पर्धा करते.यालाच बायफेजिक इन व्हिट्रो मॅच्युरेशन असे म्हणतात, हे IVM नियमांचे अद्ययावत स्वरूप असून या संदर्भातील तज्ञ व अनुभव असलेले ओएसिस हे भारतातील एकमेव केंद्र आहे.

ज्या महिलांना औषधे आणि संप्रेरकांच्या इंजेक्शनची भिती वाटते आणि ज्यांना कमी खर्चिक व कमी वेदनादायी उपचार घ्यायचे आहेत अशा महिलांसाठी CAPA IVM हा चांगला पर्याय आहे.

CAPA IVM कोणाला सुचवले जातात?

· PCOS असलेल्या महिलांना

· अधिक जटील अवस्था असलेल्या आणि ज्यांना तातडीने उपचारांची आवश्यकता आहे अशा महिलांना ( IVF ही २ आठवड्यांची प्रक्रिया असून ती ज्यांना रुचत नाही अशा)

· अवरोधात्मक ओव्हरी सिंड्रोम

· थ्रोम्बोफिलीयाचे रुग्ण आणि

· अंडाशयातील अपरिपक्व स्त्रीबीज पक्व होण्यातील अडचणी असलेल्या रुग्ण

Dr Kavya यांनी रुग्णाला सुरुवातीला IUI करण्याचा सल्ला दिला त्यामध्ये लेट्रोझोल + एचएमजी 75 आययु व गोनाडोत्रोपिन्सची २ दिवसांची मात्रा(३रा आणि ५वा दिवस)यांचा अंतर्भाव असतो त्याचबरोबर गोनाडोत्रोपिन, लेट्रोझोल यांच्या मात्रेवर ३ ऱ्या दिवसापासून ७ व्या दिवसापर्यंत लक्ष ठेवले जाते. ९.११.१३. आणि १६ व्या दिवशी फोलीक्युलर स्कॅन केले जाते. १८ व्या दिवशी ४ HMG १५० इंजेक्शन देऊनदेखील कोणतेही ठळक फोलिकल्स दिसले नाहीत. संपूर्ण उपचारादरम्यान शैलजा डेक्सामेथासोन (१ एमजी) वर होत्या. २१ व्या दिवशी शैलजा यांना अवरोधिक PCOD असल्याचे निदर्शनास आल्याने उपचार रद्द करण्यात आले.

Dr Kavya यांनी शैलजाला CAPA IVM ही औषधविरहीत उपचार पद्धती देण्याचे ठर्व्ल्र ज्यामुळे शैलजा थोड्या इंजेक्शन्सद्वारे आणि कोणतेही दुष्परिणाम न होता गर्भार राहू शकत होत्या. त्यांच्या पाळीच्या १,२,३ या दिवशी मेनोपर १५० ची मात्रा देण्यात आळी. आणि ३ ऱ्या मात्रेनंतर शैलजाच्या अंडाशयातून अपरिपक्व स्त्रीबीजे मिळवून त्यावर परिपक्वतेसाठी २ पायर्यांमध्ये उपचार करण्यात आले.

अपरिपक्व स्त्री बीजे २४ तासांच्या पक्वतापूर्व पायरीच्या सहाय्याने एकत्रित केली जातात. (सी आकाराच्या नॅत्रियुरेटिक पेप्टाइड असलेल्या साधनाच्या सहाय्याने)

ही स्त्रीबीजे पुन्हा एकदा ३० तासासाठी काचेच्या पेटीत परिपक्व होण्यासाठी ठेवली जातात.(यामध्ये स्त्रीबीजे उत्तेजित करणारी संप्रेरके आणि अम्फायरग्युलीन असते)

गर्भधारणापूर्व पायरीने स्त्रीबीजे परिपक्व होण्याची क्षमता वाढते त्यानंतर ICSI करता येते. २० स्त्रीबीजे मिळवता आली आणि गर्भधारणा झाली, त्यानंतर ८ व्या स्तराचा १ गर्भ ३ ऱ्या आणि ४थ्या दिवशी मिळाला. पहिल्या स्तरावरील गर्भ ३ ऱ्या दिवशी गोठवण्यात आले आणि उरलेले ५ व्या दिवसापर्यंत जपून ठेवण्यात आले. क्रमवार गर्भ हस्तांतरण प्रक्रिया २ दिवसात ३ आणि १ दिवसात ५ ब्लास्टोसिस्ट ने करण्यात आले. अशाप्रकारे भारतातील पहिल्या CAPA IVM बाळाचा जन्म झाला.Dr.Kavya आणि त्यांच्या गर्भधारणा तज्ञ समुहाने केलेले उत्तम संशोधन, कामावरील निष्ठा आणि सातत्याने केलेला पाठपुरावा याचमुळे इतिहास घडला. अनेक वर्षे शारीरिक, भावनिक आणि आर्थिक पातळीवर कठोर परीक्षा पाहूनही फलित न झालेल्या उपचारांनी त्रस्त जोडप्याला भरमसाठ इंजेक्शने,गुंतागुंतीचे उपचार किंवा महाग उपचारांविना सकारात्मक उपचार मिळाल्याने हे जोडपे देखील आनंदी होते.

Write a Comment