महिलांच्या प्रजनन क्षमतेवर HIV चा नेमका परिणाम?
एचआयव्हीमुळे महिलांचे शारीरिक, जैविक, मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम होतो आणि त्यामुळे वजन कमी होणे, प्रदीर्घ अनओव्ह्युलेशन आणि मासिक पाळीत अनियमितता यांच्यासारख्या समस्यांना देखील सामोरे जावे लागू शकते. एचआयव्ही पॉझिटिव्ह महिलांमध्ये ओटीपोटीचा दाह, ट्यूबल फॅक्टर वंध्यत्व इत्यादींचा धोका असल्याचे दिसून आले आहे.गर्भधारणा आणि बाळाच्या आरोग्याबाबतचीशंका आणि भीतीमुळे निर्माण होणारा ताण अशाप्रकारच्या महिलांच्या प्रजनन क्षमतेवरही परिणाम करतो. तसेच त्यांच्यामध्ये गर्भपात होण्याची शक्यता देखील अधिक असते. पण, यासर्व बाबींमुळे एखाद्याचं कुटूंबनियोजनाचं स्वप्न खंडित होऊ शकत नाही.
पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर HIV चा नेमका परिणाम?
WHO च्या मते, एचआयव्ही पॉझिटिव्ह पुरुषांमध्ये हायपोगोनॅडिझम विकसित होतो आणि शुक्राणूंची संतृप्तता, शुक्राणूंची संख्या आणि गतिशीलता कमी होते. तसेच, त्यांना इरेक्टाइल डिसफंक्शन, कामवासना कमी होणे, ऑलिगोस्पर्मिया आणि नपुंसकत्व यांसारखी स्थिती देखील आढळून येते.
प्रजनन उपचार पद्धती:
सेरोडिस्कॉर्डंट (मिश्र)जोडपी:
जोडप्यामध्ये, जेव्हा पुरुष जोडीदाराला एचआयव्हीची लागण होते, तेव्हा त्याच्यावर अँटीरेट्रोव्हायरल औषधांचा उपचार केला जातो ज्यामुळे सीरम आणि सीमेन व्हायरल लोड कमी होतो. जेव्हा पुरुष जोडीदारात व्हायरल लोड आढळून येत नाही, तेव्हाच जोडप्यामध्ये ART उपचारांना सुरुवात केली जाते. महिला जोडीदाराला दिलेल्या प्री-एक्सपोजर प्रोफिलॅक्सिसमुळे (PrEP) महिला जोडीदाराला होणाऱ्या संसर्गाचा धोका कमी होतो. ICSI सहित सेमिनल प्लाझ्मा, IUI आणि IVF च्या डबल वॉश सारख्या विशेष प्रोटोकॉलमुळे पत्नी आणि मुलाच्या बाबतीत सेरोकन्व्हर्जनचा धोका कमी होतो.
एचआयव्ही ग्रस्त जोडप्यांना पालकत्वाची अनुभूती देण्यासाठी विविध उपचार पद्धती उपलब्ध आहेत. केवळ पुरेश्या प्रमाणात जागरुकता नसल्यामुळे निराशा व भ्रमनिराश होतो.
एचआयव्ही ग्रस्त जोडप्यांत गर्भधारणा-पूर्व समुपदेशन अत्यंत महत्वाचे ठरते. ज्यामुळे संभाव्य धोके, खबरदारीचे उपाय आणि कुटूंबनियोजनाला सुरुवात करण्यापूर्वीचे उपचारांचे पर्याय यांचा त्यामध्ये समावेश होतो.
आशेवर जग चालतं! तुमचं पालकत्वाचं स्वप्न अपूर्ण ठेऊ नका. एड्ससोबत लढूया व पालकत्वाचे स्वप्न साकार करूया!