गर्भाशयाचा अडीनोमायोसिस म्हणजे केवळ वेदनादायी मासिक पाळी नाही. अडीनोमायोसिस विषयी जाणून घेण्यासाठी गर्भाशयाचे शरीरशास्त्र समजून घ्यायला हवे.
गर्भाशय खालील थरांचे बनलेले असते .
मायोमेट्रीयम : बाहेरील मऊशार थर
एंडोमेट्रीयम: आतील असा थर जो मासिक पाळी दरम्यान वाढतो आणि गर्भाशयाला गर्भधारणेसाठी मदत करतो.
या दोन्ही थरांच्या मध्ये “जंक्शनल झोन” किंवा “इनर एंडोमेट्रीयम” हा भाग असतो ज्यामुळे एंडोमेट्रीयम आणि स्नायूयुक्त थर हे दोन्ही भाग वेगवेगळे राहतात. निरोगी गर्भाशयामध्ये या थराची जाडी 2-8 मिमी असते.
अडीनोमायोसिस ग्रस्त महिलेच्या शरीरात गर्भाशयाच्या स्नायूयुक्त भागामध्ये एंडोमेट्रीयल पेशी वाढत असते. यामुळे जंक्शनल झोनची जाडी वाढते. अडीनोमायोसिसअसणाऱ्या रुग्णामध्ये हा जंक्शनल झोन 12 मिमी किंवा त्याहून अधिक जाड असतो. यामुळे गर्भाशयाचा आकार वाढतो आणि इतर विचित्र आणि वेदनादायी लक्षणे दिसू लागतात. मायोमेट्रीयम मध्ये असलेल्या गाठी देखील अडीनोमायोसिस असल्याचे एक लक्षण आहे.
३५ वर्षे वयापुढील किंवा एंडोमेट्रीयोसिस असलेल्या महिलांना अडीनोमायोसिस होण्याची शक्यता अधिक असते.
प्रमुख लक्षणे पुढीलप्रमाणे:
– वेदनादायी कळा किंवा ओटीपोटात दुखणे
– दीर्घ काळ चालणारी आणि जास्त रक्तस्त्राव होणारी मासिक पाळी
– शारीरिक संबंधांच्या वेळी होणाऱ्या वेदना
– वंध्यत्व
ही लक्षणे दिसल्यास एंडोमेट्रीयोसिस आणि इतरही काही आजार उद्भवू शकतात.
गुंतागुंत :
अडीनोमायोसिस ग्रस्त महिलांच्या दैनंदिन आयुष्यावर देखील विपरित परिणाम होतो.
अडीनोमायोसिस ग्रस्त महिलांना अशक्तपणा, वंध्यत्व याबरोबरच गर्भाशयाचे इतर आजार होऊ शकतात.
अडीनोमायोसिस आणि वंध्यत्व
अडीनोमायोसिस मुळे गर्भाशयाला सूज येऊन ते फुगल्यामुळे महिलांना गर्भधारणेशी निगडीत अनेक आजार होऊ शकतात. यामुळे गर्भाशयाचा आकार विचित्र होतो आणि गर्भधारणा होण्यास अडथळे निर्माण होतात तसेच गर्भपाताचा देखील धोका वाढतो.
अडीनोमायोसिस सोबत एंडोमेट्रीयोसिस आणि पॉलिप इत्यादी सारखे इतरही आजार होतात असे संशोधनाने सिद्ध झाले आहे. अडीनोमायोसिस मुळे गर्भधारणेवर खालील प्रमाणे परिणाम होऊ शकतात.
1 . गर्भधारणेमध्ये अडचणी: जंक्शनल झोन फुगल्यामुळे विचित्र पद्धतीने वाढलेल्या गर्भाशयात शुक्राणू च्या प्रवेशाला मज्जाव होतो आणि अपरिपक्व बीजांची संख्या वाढल्याने गर्भधारणा होत नाही.
2. एंडोमेट्रीयल कार्यात अडथळा : गर्भाशयाला सूज आणि इसट्रोजन संप्रेरकांच्या वाढत्या प्रभावामुळे एंडोमेट्रीयमचे कार्यचक्र बिघडते.
3. गर्भरोपण होण्यास अडथळा : मायोमेट्रीयम मध्ये असलेली एंडोमेट्रीयल पेशी स्वत:चे नियोजित कार्य असल्यासारखी झडत जाते आणि रक्तस्त्राव वाढतो.
अडीनोमायोसिस आणि गरोदरपणा
अडीनोमायोसिस मुळे महिलेची गर्भधारणा होण्याची क्षमता कमी होते. अशा महिलांना गर्भधारणा झाली तरीही अवेळी गर्भपात,बाळाचे जन्मत: कमी असलेले वजन, वेळेपूर्वी होणाऱ्या प्रसूती वेदना, गर्भाभोवतीचा पाण्याचा थर वेळेपूर्वी कमी होत जाणे, गर्भाशयातील संसर्ग ई. अकस्मात गोष्टी होण्याचा धोका संभवतो.
वंध्यत्व असलेल्या रुग्णाला अडीनोमायोसिस साठी देण्यात येणारे उपचार:
तुम्हाला भविष्यात बाळ हवे असल्यास वंध्यत्व या आजारावर वेळेत आणि योग्य उपचार घेणे गरजेचे आहे.
अडीनोमायोसिस वर वैद्यकीय उपचार तसेच शस्त्रक्रियेचा पर्याय उपलब्ध आहे. या उपचारांनी तुम्हाला गर्भधारणा होऊ शकते.
गोनाडोट्रॉफीन सारखे संप्रेरक सोडण्याचे (GnRH-a) उपचार केल्याने तुमचा संप्रेरकांचा प्रभाव कमी करून सूज कमी होते आणि नैसर्गिक गर्भधारणेची शक्यता वाढते.
निष्कर्ष:
40 वर्षे वयापुढील 10 पैकी 6 महिलांना अडीनोमायोसिस असतो. मासिक पाळी दरम्यान पोटात जोरदार कळा येणे किंवा ओटीपोटात दुखणे अशी लक्षणे अडीनोमायोसिसची असू शकतात. यामुळे केवळ गर्भधारणेच्या क्षमतेवरच नव्हे तर महिलेच्या संपूर्ण आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.
गर्भधारणेपूर्वी निदान, सल्ला- मार्गदर्शन आणि जागरूकता या तीन गोष्टींनी आजाराचे निदान लवकर होते व त्यावर उपलब्ध असलेले उपचार करता येतात.
तुमच्या प्रजनन क्षमतेवर लक्ष ठेवण्यासाठी स्त्री- रोग तज्ञाकडून नियमित तपासणी करून घ्या.