पीसीओएस (पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम) आजकाल अतिशय सामान्य आजार आहे, 5 पैकी 1 स्त्री या आजाराने ग्रस्त असते. हा सर्वात प्रचलित अंतःस्रावी विकार (एंडोक्राईन डिसऑर्डर) आहे, जो 8-13% प्रजननक्षम वयातील स्त्रियांवर परिणाम करतो. पीसीओएसची मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे एंड्रोजन (पुंजन्य संप्रेरक) मोठ्या प्रमाणात तयार होणे आणि विस्कळीत गोनाडोट्रोपिन स्राव ज्यामुळे मासिक पाळीची अनियमितता, शरीरावर जास्त केस, पुरळ आणि वंध्यत्व येते.
बहुतेक प्रकरणांमध्ये, पीसीओएस असलेल्या महिला लठ्ठ असतात आणि हे एक दुष्ट वर्तुळ आहे. 38% – पीसीओएस असलेल्या 88% स्त्रियांचे वजन जास्त आहे / त्या लठ्ठ आहेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लठ्ठपणामुळे गर्भधारणेची शक्यता कमी होते आणि गर्भपात होण्याचा धोका वाढतो. संशोधनानुसार ज्या महिला वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या बाबतीत गर्भधारणेच्या दरात लक्षणीय सुधारणा झाली आहे.
एखाद्याचा बीएमआय (बॉडी मास इंडेक्स) यशस्वी गर्भधारणेशी कसा संबंधित आहे आणि वजन कमी केल्याने गर्भधारणेची शक्यता कशी वाढू शकते हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू या.
बीएमआय म्हणजे काय:
बीएमआयमुळे हे समजून घेता येते की एखाद्याचे वजन त्याच्या उंची-ते-वजन गुणोत्तरानुसार निरोगी आहे.
बीएमआय चार्ट:
बीएमआय 18.5 पेक्षा कमी – कमी वजन
बीएमआय 18.5 <25 पासून – निरोगी वजन
बीएमआय 25 <30 पासून – जास्त वजन
बीएमआय 30 किंवा त्याहून अधिक – लठ्ठपणा
लठ्ठपणाची विभागणी :
वर्ग 1: बीएमआय 30 <35
वर्ग 2: बीएमआय 35 <40
वर्ग 3: बीएमआय 40 आणि 40 पेक्षा जास्त
पीसीओएस असलेल्या महिलांमध्ये, उच्च बेसलाइन बीएमआय गर्भधारणेच्या कमी संभाव्यतेची शक्यता वर्तवतो. पीसीओएस निदानामध्ये 27 वर्षे वयाच्या सामान्य वजन असलेल्या महिलेचा संदर्भ म्हणून वापर करून पाच बीएमआय श्रेणींसाठी पीसीओएस निदान (18-45 वर्षे) वयोगटातील गर्भधारणेच्या शक्यतांचा अभ्यास केला गेला.
पीसीओएस निदानात 31 वर्षे वयोगटातील लठ्ठपणा वर्ग II (बीएमआय 35–39.9) असलेल्या महिलेसाठी, गर्भधारणेची शक्यता 27 वर्षे वयाच्या सामान्य वजनाच्या महिलेपेक्षा निम्मी होती. तसेच, गर्भधारणेची तिची शक्यता 35 वर्षे वयाच्या सामान्य वजनाच्या स्त्रीसारखीच होती.
बीएमआय श्रेणीनुसार पीसीओएस निदान झाले असताना वयाच्या आधारावर गर्भधारणेची शक्यता
स्रोत: बॉडी मास इंडेक्स, वजन कमी होणे आणि पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम आणि जास्त वजन किंवा लठ्ठपणा असलेल्या स्त्रियांमध्ये गर्भधारणेची शक्यता यांच्यातील संबंध: a retrospective cohort study in the UK Human Reproduction, Vol.38, No.3, pp. 471–481, 2023.
वजन कमी होणे आणि गर्भधारणा यांच्यातील संबंध:
पीसीओएस आणि जास्त वजन/लठ्ठपणा असलेल्या बहुतेक महिलांसाठी आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे प्राथमिक उपचार म्हणून वजन व्यवस्थापनासह जीवनशैलीत बदल करण्याची शिफारस करतात. स्थिर
वजन राखणे किंवा वजन वाढवणे यापेक्षा वजन कमी होण्याने गर्भधारणेच्या संधी वाढतात. संप्रेरक प्रोफाइल, ओव्ह्यूलेशन दर, ओअसाईट आरोग्य, एंडोमेट्रियल ग्रहणक्षमता, इन्सुलिन प्रतिरोध आणि इतर चयापचय घटकांमध्ये सुधारणा करून वजन कमी केल्याने प्रजनन परिणामात सुधारणा होऊ शकते.
महत्वाचे मुद्दे:
1.उच्च बीएमआयमुळे पीसीओएस असलेल्या स्त्रियांच्या बाबतीत गर्भधारणेची शक्यता कमी होते.
2.पीसीओएस निदानानंतर वजन कमी होणे हे स्थिर वजन किंवा वजन वाढण्याच्या तुलनेत गर्भधारणेच्या वाढीव संधीशी संबंधित आहे.
3.पीसीओएस निदानानंतर 5-15% वजन कमी झाल्यास गर्भधारणेची शक्यता वाढू शकते.
4.ज्यांचे बीएमआय ४५ पेक्षा जास्त आहे अशा 10 % पेक्षा कमी स्त्रियांची गर्भधारणा होऊ शकते.
5.35 पेक्षा जास्त बीएमआय असलेल्या 31 वर्षांच्या (पीसीओएस निदान झालेल्या) स्त्रीसाठी, गर्भधारणेची शक्यता २७ वर्षे वयाच्या सामान्य वजनाच्या स्त्रीपेक्षा निम्मी असते.
6.35 पेक्षा जास्त बीएमआय असलेल्या 31 वर्ष वयोगटातील स्त्रीची गर्भधारणेची शक्यता सामान्य वजन असलेल्या आणि पीसीओएस निदान झालेल्या 35 वर्षे वयाच्या महिलेसारखीच असते.
7.सामान्य वजन असलेल्या स्त्रीच्या तुलनेत 40 किंवा त्यापेक्षा जास्त बीएमआय असलेल्या स्त्रीसाठी गर्भधारणेची शक्यता 63% कमी होणे अपेक्षित असते.
8.पीसीओएस निदानानंतर 5% वजन वाढल्याने गर्भधारणेची शक्यता थोडीशी कमी होते.
मुख्य संकेतक | गर्भधारणेची शक्यता |
पीसीओएस + वजन वाढणे | कमी |
पीसीओएस + वजन कमी होणे | जास्त |
पीसीओएस + स्थिर वजन | कमी |
पीसीओएस आणि जास्त वजन असलेल्या महिलांसाठी आरोग्य उद्दिष्टे:
पीसीओएस बरा होऊ शकत नाही; मात्र निराश होऊ नका. जीवनशैलीतील बदल तुम्हाला निरोगी राहण्यास आणि गर्भधारणा होण्यास मदत करू शकतात. संतुलित आहार, वजन कमी करणे आणि नियमित व्यायाम करून गर्भधारणेशी संबंधित अनेक गुंतागुंत टाळता येऊ शकते .उद्युक्त व्हा आणि कठोर पथ्ये पाळा ज्यामुळे तुम्हाला आनंदी आणि निरोगी राहता येईल.
1.जर तुम्ही गर्भधारणेचा विचार करत असाल, तर निरोगी वजन ठेवण्याचा प्रयत्न करा. वजन कमी केल्याने मासिक पाळी नियमित होण्यास मदत होते आणि गर्भधारणा होण्यास मदत होते.
2.पीसीओएस असलेल्या महिलांमध्ये इंसुलिन प्रतिरोध ही एक प्रमुख समस्या आहे. प्रक्रिया केलेले पदार्थ टाळण्याचा प्रयत्न करा आणि साखरेचे सेवन कमी करा; मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी भरपूर चोथायुक्त आणि आरोग्यदायी मेदयुक्त पदार्थांचा समावेश करा.
3.तुमच्या कॅलरीज बर्न करा; व्यायाम हा तुमच्या दिनचर्येचा भाग बनवा.
अन्न पदार्थ टाळावेत | अन्न पदार्थ समाविष्ट करावे |
सॅच्युरेटेड फॅट्स (बिस्किटे, केक, बटर) | बीन्स, हिरव्या पालेभाज्या |
लाल मांस | तपकिरी तांदूळ, बार्ली |
तळलेले पदार्थ | पालक, फ्लॉवर, टोमॅटो |
अल्कोहोलिक पेये | सॅल्मन आणि इतर ओमेगा -3 फॅटी ऍसिडयुक्त मासे |
सोडा | संपूर्ण फळे |