Site icon Oasis Fertility

आयव्हीएफ यशाचा दर समजून घेणे

Understanding IVF Success Rate

Author: Dr D Maheswari, Consultant & Fertility Specialist, Oasis Fertility.

आजकाल अनेक जोडपी उशिरा मूल होणे, बदलत्या जिवनशैलीचे घटक, मधुमेह, पीसीओएस आणि इतर हार्मोनल समस्यांमुळे, आयव्हीएफ उपचारांचा मार्ग अवलंबतात. पण सगळ्यांनाच आयव्हीएफ च्या यशाचा दर आणि त्या यशाचा दर ठरवणारे घटक माहीत असतेच असे नाही. जोडप्याने आयव्ही एफ चे उपचार घेण्यापूर्वी आयव्हीएफ ची प्रक्रिया जाणून घेणे जसे गरजेचे आहे त्याचप्रमाणे फर्टिलिटी क्लिनिकद्वारे किती प्रमाणात यश मिळेल हे समजून घेणे सुद्धा अत्यावश्यक आहे. अंडी आणि शुक्राणूंची गुणवत्ता, गर्भाची गुणवत्ता, आयव्हीएफ प्रयोगशाळेची गुणवत्ता, चिकित्सक आणि भ्रूणशास्त्रज्ञांचे कौशल्य, जोडप्याची जीवनशैली अशा अनेक घटकांचा यशाच्या दरावर परिणाम होत असतो. आयव्हीएफच्या यशाच्या दरामध्ये योगदान देणारे प्रत्येक घटक जाणून घेवूया.
इन विट्रो फर्टिलायझेशन प्रक्रिया काय आहे?
आयव्हीएफ म्हणजेच इन विट्रो फर्टिलायझेशन हे एक असे पुनरुत्पादक तंत्र आहे जे पुरुष वंध्यत्व, एंडोमेट्रिओसिस, ट्यूबल ब्लॉकेज, अंडकोषातील राखीव अंड्याची कमी संख्या आणि इतर अनेक प्रजनन संबंधी समस्या ज्यामुळे नैसर्गिकरित्या गर्भधारणा करू शकत नसेल तर जोडप्याला मूल होण्यास मदत करते. या प्रक्रियेमध्ये हार्मोनल इंजेक्शन देऊन स्त्री जोडीदाराकडून अंडी घेतली जातात व ती अंडी पुरुष जोडीदारांच्या शुक्राणूशी जोडली जातात. त्यामुळे गर्भाची निर्मिती होते. या गर्भाच्या पुढील वाढीसाठी आणि विकासासाठी गर्भ पुन्हा स्त्रीच्या गर्भाशयात ठेवला जातो.आयव्हीएफ एकतर त्याचवेळी तयार केलेल्या गर्भ हस्तांतरण किंवा गोठवलेल्या गर्भ हस्तांतरणाच्या रूपात केले जाऊ शकते. गर्भ तयार झाल्यानंतर 3 किंवा 5 दिवसांच्या आत गर्भ स्त्रीच्या गर्भाशयात ठेवला जातो, तेव्हा त्याला ताजे गर्भ हस्तांतरण म्हणतात. जेव्हा गर्भ गोठवला जातो आणि एका महिन्यानंतर किंवा नंतर स्त्रीच्या गर्भाशयात ठेवला जातो, तेव्हा त्या प्रक्रियेला गोठलेले गर्भ हस्तांतरण असे म्हटले जाते. गोठवलेल्या गर्भ हस्तांतरण प्रक्रियेचा यशस्वी होण्याचा दर ताज्या गर्भ हस्तांतरणापेक्षा चांगला आहे.
एकल गर्भ हस्तांतरण या प्रगत तंत्रज्ञानामध्ये फक्त एक निरोगी भ्रूण निवडला जातो आणि हस्तांतरित केला जातो आणि एकाधिक गर्भधारणेचा धोका किंवा भीती शिवाय तसेच आई आणि मूल या दोघांसंबंधीत कोणत्याही गुंतागुंतीशिवाय आयव्हीएफ द्वारे यशस्वी गर्भधारणा आणि प्रसुती शक्य होते. अनेक दशलक्ष जोडप्यांना आयव्हीएफ च्या माध्यमातून पालकत्वाचा आनंद मिळाला आहे.

आयव्हीएफच्या यशाच्या दरावर परिणाम करणारे घटक:

1. स्त्रीचे वय:

आयव्हीएफच्या यशाच्या दराचा अंदाज लावण्यासाठी महिलेचे वय हा सर्वात महत्वाचा घटक आहे कारण महिलांची प्रजनन क्षमता 32 वर्षानंतर कमी होत जाते आणि 37 वर्षानंतर तर त्यामध्ये अधिक घट दिसून येते. अंडपेशींची गुणवत्ता आणि प्रमाण कमी होते परिणामी गर्भपात होण्याचा आणि मुलामध्ये

जन्मजात विसंगती असण्याचा धोका वाढतो. आई होण्याच्या वयात वाढ झाल्यामुळे गर्भपात होणे, प्रसुती दरम्यान येणाऱ्या जोखमी इत्यादी गोष्टींमुळे आईवीएफच्या परिणामांवर नकारात्मक प्रभाव दिसून येतो.

2. वंध्यत्वाची कारणे:

अनेक अभ्यासांमध्ये असे दिसून आले आहे की वंध्यत्वाचे कारण हे देखील आयव्हीएफ च्या उपचारांमध्ये यशाचा दर ठरवण्यात मोठी भूमिका बजावते

3. स्त्रीचे वजन:

जास्त वजन असलेल्या/लठ्ठ महिलांना आईवीएफ उपचार प्रक्रियेदरम्यान उत्तेजित होण्यास कमी प्रतिसाद मिळतो आणि त्यांच्याकडून फक्त काही अंडी मिळतात. लठ्ठपणामुळे गर्भाधानाचा दर कमी होतो आणि गर्भपात होण्याचे प्रमाण जास्त असते. वजन कमी केल्याने आयव्हीएफ परिणाम सुधारण्यास मदत होऊ शकते.

4. अंडी, शुक्राणू आणि गर्भाची गुणवत्ता:

सकारात्मक आयव्हीएफ परिणामासाठी, गेमेट्सची गुणवत्ता म्हणजे अंडी व शुक्राणू तसेच अंडी आणि शुक्राणूंच्या संमिश्रणामुळे तयार झालेल्या गर्भाची गुणवत्ता देखील खूप महत्वाची आहे. मायक्रोफ्लुइडिक्स सारख्या प्रगत शुक्राणू निवड पद्धतीद्वारे आयव्हीएफ प्रक्रियेसाठी सर्वोत्तम दर्जाचे शुक्राणू निवडण्यात मदत करू शकतात. अंड्याच्या खराब गुणवत्तेचा यशाच्या दरावर परिणाम होतो आणि काही प्रकरणांमध्ये, आयव्हीएफ यशाचा दर सुधारण्यासाठी दात्याच्या अंडींना प्राधान्य दिले जाऊ शकते.

35 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या स्त्रिया किंवा अनुवांशिक विकार असलेल्या जोडप्यांच्या बाबतीत पीजीटी (प्री-इम्प्लांटेशन जेनेटिक टेस्टिंग) सारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून हस्तांतरणासाठी सर्वोत्तम गर्भ निवडला जाऊ शकतो ज्यामुळे गर्भपाताचा धोका कमी होतो.

5. जीवनशैलीतील घटक:

धूम्रपान, मद्याचे सेवन आणि जंक फूडचे सेवन यामुळे आयव्हीएफ चे परिणाम नकारात्मकरित्या प्रभावित होऊ शकतात.

6. गर्भाशयाच्या अस्तराची जाडी आणि आयव्हीएफच्या यशाचा दर:

यशस्वी गर्भधारणेमध्ये एंडोमेट्रियम/गर्भाशयाच्या अस्तराची जाडी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. 7 मिमी पेक्षा कमी जाडीमुळे रोपण आणि गर्भधारणच्या यशाचा दर कमी होतो.

भारतातील आयव्हीएफच्या यशस्वीतेचा दर किती आहे?

आयव्हीएफचा यशाचा दर जोडप्यानुसार बदलतो कारण वय, बीएमआय, वंध्यत्वाचे कारण, जीवनशैली इ. प्रत्येक व्यक्तीनुसार बदलते. अत्याधुनिक आयव्हीएफ लॅब, प्रजनन तज्ञ आणि

भ्रूणशास्त्रज्ञ यांच्यामुळे ओएसिस फर्टिलिटीमध्ये भारतातील आयव्हीएफचा यशाचा दर 69% आहे..

 

वयानुसार आयव्हीएफ यशाचा दर:

वयाचा आयव्हीएफ उपचार प्रक्रियेच्या परिणामांवर नकारात्मक परिणाम हॉट असतो. ओएसिस फर्टिलिटीमध्ये, 30 वर्षांपेक्षा कमी वयाच्या महिलांसाठी, IVF यशाचा दर 60% पेक्षा जास्त आहे तर 35 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी, यशाचा दर 50% आहे.

आयव्हीएफ उपचार प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी आवश्यक जीवनशैलीतील बदल:

– वजनाचे व्यवस्थापन:

वजन कमी केल्याने आयव्हीएफ यशाचा दर सुधारण्यास मदत होऊ शकते. तुमचा बीएमआय जाणून घ्या आणि आयव्हीएफची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी वजन कमी करण्याकडे लक्ष केंद्रित करा.

– आरोग्यदायी आहार:

यशस्वी गर्भधारणा साध्य करण्यासाठी निरोगी आहार खूप लाभदायक ठरू शकतो.

– व्यायाम:

एकंदर आरोग्य सुधारण्यासाठी आणि आयव्हीएफच्या यशाच्या दरात सुधारणा मदत करण्यासाठी नियमित व्यायाम करणे अत्यंत गरजेचे आहे.

– तणावाचे व्यवस्थापन करणे:

तणावाचा मासिक पाळीवर परिणाम होऊ शकतो आणि आयव्हीएफच्या परिणामांच्यावर नकारात्मक प्रभाव पडतो. एकदा तुम्ही आयव्हीएफची प्रक्रिया करायचे ठरवले की, तुमचे मन शांत आणि तणावमुक्त असणे गरजेचे आहे. चिंता, भीती किंवा नैराश्य यामुळे गर्भधारणेमध्ये अडथळा निर्माण होतो.

पालकत्व हा एक अद्भुत प्रवास आहे मग तो नैसर्गिक मार्गाने असो किंवा आयव्हीएफद्वारे . आयव्हीएफ उपचार घेण्यापूर्वी इन विट्रो फर्टिलायझेशन प्रक्रियेबद्दल स्पष्टता असणे खूप महत्वाचे आहे. इतकंच नाही तर सकारात्मक विचारसरणी आणि वास्तववादी अपेक्षांमुळे तुम्हाला कोणत्याही अडचणीशिवाय उपचार प्रक्रिया पार पाडण्यास मदत होईल. आयव्हीएफच्या यशाच्या दराचा प्रश्न येतो तेव्हा जीवनशैलीचे घटक अत्यंत महत्वाचे ठरतात म्हणून, धूम्रपान सोडणे, अल्कोहोलचे सेवन कमी करणे आणि निरोगी आहाराचा समावेश करून आपल्या जीवनशैलीत

सुधारणा करणे खूप महत्वाचे आहे. आनंदी पालकत्वासाठी शुभेच्छा! तुम्ही काळजी करणे सोडा आणि जर तुमच्या डॉक्टरांनी शिफारस केली असेल तर आत्मविश्वासाने आयव्हीएफ करून घ्या!

Was this article helpful?
YesNo
Exit mobile version