HomeCase Studiesअंतगर्भाशयाच्या समस्येतही गर्भधारणा शक्य!

अंतगर्भाशयाच्या समस्येतही गर्भधारणा शक्य!

Published On Sep 2, 2022|By Oasis Fertility

अंतगर्भाशयाच्या समस्येतही गर्भधारणा शक्य!
अंतगर्भाशयाच्या समस्येतही गर्भधारणा शक्य!

पालकत्व हा खूप खास प्रवास असून त्याचा प्रत्येकाला येणारा अनुभव वेगवेगळा असतो.काही लोकांच्यासाठी पालकत्वाचा मार्ग सुरुवातीला थोडा खडतर असला तरी, योग्य वेळी नामांकित वंध्यत्व निवारण तज्ञांना भेट दिल्यास इच्छित परिणामांची प्रचिती येते. श्री.संजय (35) आणि श्रीमती प्रीथा संजय (32) यांच्या लग्नाला 5 वर्षे झाली आहेत, वंध्यत्वाच्या समस्यांसाठी अनेक तज्ञ डॉक्टरांना भेटी दिल्या होत्या परंतु त्यांना यश मिळाले नाही आणि त्यांनी आशादेखील सोडली होती. सुदैवाने, ते डॉ नीलेश उन्मेश बलकवडे, क्लिनिकल हेड आणि फर्टिलिटी स्पेशलिस्ट, ओएसिस फर्टिलिटी, पुणे यांना भेटले व त्यांनी उपचार सुरू केले. संजय आणि प्रीथा या दोघांची शारीरिक तपासणी, रक्त चाचण्या, स्कॅन या सर्व प्राथमिक तपासणीनंतर डॉ. नीलेश यांना असे आढळून आले की प्रीथाला इंट्रायूटरिन ऐड्हीश़न(IUA) आहे,म्हणजेच अंतगर्भाशय चिकटलेले आहे.

गर्भाशयांतर्गत आकुंचन म्हणजे काय?

गर्भाशयांतर्गत आकुंचन याला एशरमन सिंड्रोम देखील म्हणतात. गर्भाशयाच्या अस्तराला एंडोमेट्रियम म्हणतात आणि जेव्हा या अस्तराला कोणतीही दुखापत किंवा संसर्ग होतो तेव्हा गर्भाशयात चिकटपणा (स्कार टिश्यू) तयार होतो ज्यामुळे वंध्यत्वाची समस्या उद्भवण्याची शक्यता असते.

गर्भाशयांतर्गत आकुंचन होण्याची कारणे:
  • पूर्वी गर्भाशयाशी निगडीत झालेली शस्त्रक्रिया
  • गर्भाशयाजवळील जंतुसंसर्ग
  • डी अँड सी (गर्भपिशवी साफ करण्याची शस्त्रक्रिया)
  • एंडोमेट्रिटिस (गर्भाशयाच्या अस्तरास होणारा संसर्ग)
  • सिझेरियन प्रसव
  • डॉ नीलेश उन्मेष बलकवडे यांनी ऑपरेटिव्ह हिस्टेरोस्कोपीद्वारे गर्भाशयांतर्गत आकुंचन काढून टाकण्यासाठी एक उपचार पद्धती तयार केली. ही कमीत कमी त्रासदायक प्रक्रिया आहे.ह्या प्रक्रियेद्वारे गर्भाशयात निर्माण झालेली असामान्य परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला जातो. डाग काढून टाकल्यानंतरही, एंडोमेट्रियल अस्तर सुधारणे अत्यावश्यक आहे कारण यशस्वी गर्भधारणेच्या प्रकियेतील हा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. एंडोमेट्रियमचे पुनरुज्जीवन करण्यासाठी पीआरपी ची (प्लेटलेट रिच प्लाझ्मा) इंजेक्शन्स दिली जातात.

    प्रीथाला जननेंद्रियातील संसर्गाचा त्रास झाला होता आणि आयव्हीएफ चे ३ सायकल्स अयशस्वीझाले होते. गर्भधारणेच्या अधिक शक्यतेसाठी, एस्ट्रोजेन-प्राइम्ड एफइटी सायकल दरम्यान पीआरपी चे हिस्टेरोस्कोपिक इंजेक्शन दिले गेले. सुरुवातीच्या सायकलमध्ये, एंडोमेट्रियमची जाडी 5.6 मिमी वरून 6.2 मिमी पर्यंत सुधारली. त्यानंतर पुन्हापीआरपीइंजेक्शन दिले गेले ज्यानंतर जाडी 6.8 मिमी पर्यंत वाढली. या भ्रूण हस्तांतरणानंतर गर्भधारणा झाली.

    डॉक्टरांचे दृढ प्रयत्न तसेच नैदानिक ​​तज्ञता व जोडप्याच्या सहकार्यामुळे हा सकारात्मक परिणाम दिसून आला.

    या जोडप्याने त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठे स्वप्न साकार केल्या बद्दल डॉ नीलेश उन्मेष बलकवडे, क्लिनिकल हेड आणि फर्टिलिटी स्पेशलिस्ट, ओएसिस फर्टिलिटी, पुणे यांचे मनापासून आभार मानले.

    डॉ नीलेश उन्मेश बलकवडे, महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध IVF विशेषज्ञ आहेत आणि ते वंध्यत्व, प्रजनन औषध आणि गायनॅक एंडोस्कोपी या क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर आहेत. डॉ नीलेश वंध्यत्वाची प्रकरणे चांगल्या पद्धतीने हाताळून सकारात्मक परिणाम मिळवून देण्यासाठी तसेच त्यांच्या कौशल्याने आणि सहृदयतेने अनेक जोडप्यांना पालकत्वाचा आनंद मिळवून देण्यासाठी प्रसिद्ध आहेत.

    Related Case Studies


    Call Us

    1800-3001-1000