Site icon Oasis Fertility

वंध्यत्व- ‘निदान’ बोलूया!

बऱ्याचदा काय चुकलं हे शोधण्यापेक्षा, आपण मात्र कोणाचं चुकलं हे शोधत राहतो ! “

समस्येचं निराकरण करण्यापेक्षा त्या भोवती आपण भावनिकरीत्या गुंतून राहतो. वंध्यत्व ही अशीच एक समस्या! लग्न झाल्यानंतर सर्व काही ठीक सुरु असतं. दिवस आनंदात जात असतात, परंतु काही महिने किंवा वर्ष गेल्यानंतरहीदिवस जात नाहीम्हणून विचारणा होऊ लागते. सुरुवातीला हे दडपण कमी राहतं त्यामुळे सल्ला घेतला जात नाही. नंतर हीच गोष्ट वारंवार सांगितली जाते. प्रत्येक येणाऱ्या पाळीला दडपण वाढत जातं. पतिपत्नीचं नातं देखील पणास लागू शकतं! सासू सासऱ्यांच्या अपेक्षा, समाजाच्या अपेक्षा, या सर्वांमुळे दडपण हे नैराश्यात बदलू शकतं. काही वेळा काही घरांमध्ये समस्या अधिक जटिल होऊन बसतात.

अशावेळीनिदानबोलणं गरजेचं असत. ‘निदानहोणं हे ही गरजेचं असत. वंध्यत्वाची समस्या अशी आहे की स्त्री ला बोलण्यास संकोच होऊ शकतो. ‘पुरुष वंध्यत्व’ याहीपेक्षा अधिक जटिल समस्या आहे. ‘पुरुष वंध्यत्वअसू शकतं हे मानायलाच पुरुष तयार होत नाहीत. काही वेळा तपासणीलाही विरोध होतो.

अशावेळी समुपदेशन मोलाचं ठरत. ‘वंध्यत्वही समस्या योग्य निदानानंतर, योग्य उपचाराने दूर होऊ शकते. वंध्यत्वाचा कारणांमध्ये / कारणं ही स्त्री मध्ये, / कारणं पुरुषांमध्ये, / कारण ही दोघांमध्ये आढळतात अशावेळी दोघांच्या तपासण्या करणं महत्वाचं ठरतं !

निदानहोणं देखील महत्वाचं आहे. पुरुषांमध्ये वीर्याची तपासणी करणं ही योग्य सुरुवात ठरते. कारण पुरुष वंध्यत्वाच्या बऱ्याच करणांचं निदान या एका तपासणीत होऊ शकतं !

स्त्रियांमध्ये अंडकोशाची क्षमता (ovarian reserve) तपासण्यासाठी AMH, AFC, FSH यासारख्या तपासण्या करता येतात. त्याचबरोबर बीजाची उत्पत्ती होत आहे का हे पाहण्यासाठी folliculometry नावाची सोनोग्राफी करता येते. गर्भाशय आणि गर्भनलिका सामान्य असणं हे ही महत्वाचं आहे. यासाठी सोनोग्राफी, hysterosalphingography, sonohysterography, hysterolaproscopy यासारख्या तपासण्या करता येतात. या सर्व तपासण्यानॉर्मलअसतील तर त्यास आपणअज्ञात वंध्यत्व(unexplained infertily) असं संबोधित करतो. अशावेळी काही अधिक तपासण्यांची गरज भासू शकते.

अत्याधुनिक निदान पद्धती मध्ये Sperm DNA Fragmentation index , sperm function tests या सारख्या तपासण्या पुरुष वंध्यत्वामध्ये करता येतात. स्त्रियांमध्ये Chronic Endometritis, Endometriosis, Tubal factor अशी काही कारणे असू शकतात. त्यासाठी काही तपासण्या करता येऊ शकतात. त्यामुळे मनातला संशय मोडूया. निदान बोलूया, योग्यनिदान’ करूया!

 

मन हे पाण्यासारखं असत.

जेव्हा ते अशांत असतं, तेव्हा काही दिसत नाही

परंतु जेव्हा शांत होत, तेव्हा सर्व स्पष्ट दिसू लागतं!”

आपल्या समस्या देखील अशाच असतात आणि त्यावरच समाधानही!

धन्यवाद!

 

डॉ. निलेश उन्मेष बलकवडे

वंध्यत्व निवारण तज्ञ्,

पुणे

Exit mobile version