Blog
Enquire Now
Uncategorized

आय व्ही एफ उपचार घेत असताना काय करावे आणि काय करू नये

आय व्ही एफ उपचार घेत असताना काय करावे आणि काय करू नये

जीवनशैलीतील बदल, पर्यावरणातील विविध घटक, ताण-तणाव, पीसीओएस(PCOS), उशिराने प्राप्त झालेले पालकत्व, धूम्रपान, झोप न लागणे आणि इतर अनेक कारणांमुळे सामान्यत: वन्ध्यत्वा सारख्या समस्येस सामोरे जावे लागते. वैद्यकीय इतिहास आणि अनुवांशिक परिस्थिती यासारखी इतर कारणे देखील वंध्यत्वास कारणीभूत ठरू शकतात. आय व्ही एफ (इन विट्रो फर्टिलायझेशन) हे सहाय्यक पुनरुत्पादक तंत्रज्ञानांपैकी एक आहे जे जोडप्यांना वंध्यत्वावर मात करण्यास आणि पालकत्व प्राप्त करून देण्यास सहाय्यक ठरू शकते.

आय व्ही एफ ही प्रक्रिया कशी असते?

आयव्हीएफ उपचारात, उपचारानंतर महिलेची स्त्रीबीज परत मिळविली जातात आणि ती जोडीदाराच्या शुक्राणूंद्वारे फलित केले जातात व भ्रूण तयार होतात. त्यानंतर हे भ्रूण रोपण आणि पुढील वाढीसाठी गर्भाशयात हस्तांतरित केले जातात.

आय व्ही एफ केव्हा करावे?

आय व्ही एफ सहसा अवरोधीत असलेल्या फॅलोपियन नलिका, पुरुषामधील काही गंभीर घटक,स्पष्ट न होणारे वंध्यत्व किंवा जेव्हा ओव्हुलेशन इंडक्शन आणि इंट्रायूटेरिन इन्सेमिनेशन सारखे प्रारंभिक उपचार अयशस्वी होतात तेव्हा आय व्ही एफ चा सल्ला दिला जातो. आय व्ही एफ गर्भधारणेचा निर्णय वैद्यकीय स्थिती, वय, वंध्यत्वाचा कालावधी इत्यादी अनेक घटकांवर अवलंबून असतो.

काय करावे :

 • योग्य प्रजनन चिकित्सालय केंद्र निवडा:

अनेक प्रजनन केंद्रे आहेत, परंतु उच्च प्रगत प्रयोगशाळा, उपकरणे आणि उच्च पात्रता आणि कुशल प्रजनन तज्ञ असलेले सर्वोत्तम केंद्र निवडणे आवश्यक असते. तसेच आय व्ही एफ ही एक दीर्घ प्रक्रिया असल्याने, तुमचे डॉक्टर आणि इतर कर्मचार्‍याशी तुमचे संबंध चांगले असणे आवश्यक असते कारण ते तुम्हाला या प्रक्रियेत मार्गदर्शक ठरू शकतात. तुमची केंद्राची निवड ही रुग्णांना प्रथम स्थान देणारे आणि नैतिक, पारदर्शक आणि पुराव्यावर आधारित उपचार देण्यावर भर देणारी असावी.

 • आय व्ही एफ या संपूर्ण प्रक्रियेची माहित आहे का?

तुम्ही तुमचा आय व्ही एफ उपचार सुरू करण्यापूर्वी, या प्रक्रियेची प्रत्येक पायरी स्पष्टपणे समजून घेणे महत्त्वाचे आहे. आय व्ही एफ हा भावनिक, शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या खर्चीक प्रक्रिया आहे, त्यामुळे योग्य नियोजन आणि जीवनशैलीतील हे बदल तुम्हाला संपूर्ण प्रक्रियेतून सहजपणे जाण्यास मदत करतात. तुमच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी योग्य चर्चा करून सर्व शंका आणि चिंतांचे निराकरण करावे जेणेकरून तुम्ही योग्य आत्मविश्वास आणि आशावादाने या प्रवासाला सुरुवात करू शकाल.

 • या प्रक्रियेचे आर्थिक पैलू समजून घ्या:

तुम्ही आय व्ही एफ घेण्यापूर्वी, आर्थिक बाबतीत समुपदेशक/डॉक्टर यांच्याशी तपशीलवार चर्चा करा. आर्थिक बाबी तील विविध पर्यायी मार्ग, ईएमआय आणि विमा यासंबंधीचे ज्ञान तुम्हाला आगाऊ मिळाल्यास तशी आर्थिक तरतूद करण्यात आणि त्या संबधित तुमचा ताण कमी करण्यात हे सहाय्यक ठरू शकते.

 • स्वतःला शांत ठेवा:

आयव्हीएफ प्रक्रियेदरम्यान, स्त्रीबीज उत्पादनास उत्तेजन देण्यासाठी तुम्हाला हार्मोनल इंजेक्शन दिले जातील. संप्रेरकांमुळे चिंता, दुःख, चिडचिड आणि निराशा यासह अनेक भावनिक बदल होऊ शकतात परंतु या काळात ध्यानाचा सराव आणि प्रक्रियेची जाणीव तुम्हाला शांत राहण्यास मदत करेल.

 • तुमच्या डॉक्टरांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन करा:

आय व्ही एफ उपचार असोत किंवा योग्य आहाराचे पालन करणे, जीवनशैली, वजन व्यवस्थापन किंवा औषधे असोत काटेकोरपणे

तुमच्या प्रजनन तज्ज्ञांच्या सल्ल्याचे पालन करा. कोणतेही बदल करण्यापूर्वी काही शंका असल्यास, नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 • समर्थन मागण्यास अजिबात लाजू नका:

आय व्ही एफ ही एक शारीरिक व मानसिक चढ-उतार असणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे कुटुंब, मित्र किंवा मानसशास्त्रज्ञ यांच्याकडून मानसिक आधार घेताना कधीही वाईट वाटून घेऊ नका. काही आय व्ही एफ समर्थन गट तुम्हाला हा प्रवास सुरळीत करण्यात मदत करू शकतात.

 • ताण-तणाव कमी करण्यासाठी उपाय शोधा:

तुम्हाला काही वेळा उत्साही, निराश आणि खूप तणावग्रस्त वाटू शकते. एखादा छंद, अथवा नित्यक्रम शोधा जो तुम्हाला प्रोस्तहीत आणि आशावादी राहण्यास मदत करेल. वास्तववादी अपेक्षा असणे नेहमीच महत्त्वाचे असते. धैर्य ही यशाची गुरुकिल्ली आहे आणि ती गमाऊ नका.

काय करू नये :

 • धूम्रपान:

धूम्रपान केल्याने गर्भधारणेची शक्यता कमी होईल. धूम्रपान शुक्राणूंची गुणवत्ता, संख्या आणि गतिशीलता कमी करते. स्त्रियांच्या बाबतीतील धूम्रपान, स्त्रीबीज उत्पादनावर विपरित परिणाम करते आणि गर्भपात होण्याचा धोका वाढवते.

 • दारू:

अल्कोहोलचे सेवन गर्भधारणेच्या संधीवर नकारात्मक परिणाम करू शकते.

 • तीव्र व्यायामाची पद्धत:

तीव्र व्यायामाचा तुमच्या आय व्ही एफ उपचारांवर परिणाम होऊ शकतो. आय व्ही एफ यशाची शक्यता सुधारण्यासाठी वजन कमी करणे आवश्यक आहे. पण स्वत: जास्त कष्ट घेऊ नका. आय व्ही एफ दरम्यान मध्यम व्यायामाची शिफारस केली जाते.

काही जोडप्यांसाठी पालकत्वासाठी थोडा अधिक वेळ लागू शकतो आणि कदाचित मार्ग थोडा कठीण असू शकतो, परंतु दृढनिश्चय आणि आत्मविश्वास असणे महत्वाचे असते.

लक्षात ठेवा सर्व चांगल्या गोष्टींना वेळ लागत असतो.

पालकत्वाच्या शुभेच्छा!

आमच्या आय व्ही एफ उपचारांच्या यशाच्या दराबद्दल जाणून घेण्यासाठी, आम्हाला भेट द्या!

Write a Comment