Blog
Enquire Now
Uncategorized

अद्ययावत वंध्यत्व उपचाराने जोडप्यांना पालकत्व लाभू शकते.

अद्ययावत वंध्यत्व उपचाराने जोडप्यांना पालकत्व लाभू शकते.

ज्या जोडप्यांना वंध्यत्वाच्या समस्येने ग्रासलेले असते त्यांना वंध्यत्वावर उपलब्ध असलेले अनेकाविध उपचार माहिती नसतात. जे उपचार तुमच्या मित्र- मैत्रिणी, शेजारी किंवा नातेवाईकांना लागू झाले ते तुम्हालाही लागू होतील असे नाही.ज्याप्रमाणे आपल्याकडे S, M, L, XL, XXL, XXXL इत्यादी आकाराचे कपडे असतात त्याचप्रमाणे प्रत्येक जोडप्याचे वय, त्यांची वैद्यकीय स्थिती, जीवनशैली, आरोग्य व अनेकाविध घटकांवर त्यांच्या पालकत्वाचा प्रवास अवलंबून असतो. सर्वांना एकाच प्रकारचे उपचार लागू नसल्याने हरेक जोडप्याची औषधे, औषधाच्या मात्रा आणि औषधे घ्यावयाच्या वेळा वेगवेगळ्या असतात.

तुम्हाला वंध्यत्वावर उपचार घेण्याचा सल्ला कसा दिला जातो?

आपल्याला कोणते उपचार घ्यावे लागतील हे कोणतेही जोडपे ठरवू शकत नाही. सर्व बाबींचा विचार करून वंध्यत्व तज्ञ उपचार निश्चित करतो. त्यामुळे, गर्भधारणा होण्यास एक वर्षाहून अधिक काल विलंब होत असल्यास जोडल्याने त्वरित वंध्यत्व तज्ञांचा सल्ला घ्यावा. सर्वप्रथम, वंध्यत्वावर उपलब्ध असलेले सर्व उपचार तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे. OITI, IUI, IVF, औषधविरहित IVF, गर्भ जतन , दाता उपचार, पुरुषांच्या वंध्यत्व समस्येवरील उपचार इत्यादी.

OITI:

OITI म्हणजे काय?

· मूलभूत वंध्यत्व उपचार

· बीजांडाची निर्मिती आणि फलन(बीज संयोग होण्यासाठी बाहेर पडणे) होण्यासाठी महिलांना उपचार दिले जातात. बीजांड संयोगासाठी केव्हा बाहेर पडते यावर लक्ष ठेवून जोडप्याला ठराविक दिवशी शरीरसंबंध ठेवण्यास सांगून त्यांना नैसर्गिक गर्भधारणा होण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात.

OITI कोणासाठी?

· ज्यांची बीज फलन क्रिया सलग होत नाही त्यांच्यासाठी

· PCOS ग्रस्त महिलांसाठी

IUI:

· IUI हे वंध्यत्वावरील आधुनिक उपचार आहेत.

· गर्भपिशवी मध्ये सुदृढ बीजांडे तयार होऊन ती फलनासाठी तयार करण्यासाठी महिलांना औषधे दिली जातात. जेणेकरून गर्भधारणा होऊ शकेल. त्या जोडप्यातील पुरुषाचे वीर्य साठवून त्यातील सुदृढ शुक्राणूंची फलनासाठी निवड केली जाते. कॅथेटर च्या सहाय्याने गर्भधारणेसाठी हे शुक्राणू स्त्रीच्या गर्भाशयात सोडले जातात.गर्भधारणा झाल्यावर गर्भाशयात एक झायगोट आकार तयार होतो आणि त्याचेच नंतर बाळ तयार होते.

IUI कोणासाठी?

· विनाकारण आलेले वंध्यत्व

· शुक्राणूंची संख्या कमी असलेले पुरुष

· कमी प्रमाणात इंडोमेट्रीयोसीस असलेल्या महिला

· गर्भाशय मुखाच्या समस्या असलेल्या महिला

IVF:

· IVF हे वंध्यत्वावरील आधुनिक उपचार आहेत.

· गर्भाशयात स्त्रीबीजे तयार होण्यासाठी महिलांना औषधे दिली जातात. ही स्त्रीबीजे काढून त्यांचा पतीच्या काढलेल्या वीर्याशी संयोग घडवला जातो. फलन झालेल्या स्त्रीबीजांचा गर्भ तयार होतो आणि मग हा गर्भ पुढील वाढीसाठी गर्भाशयात ठेवला जातो.

IVF कोणासाठी?

· इंडोमेट्रीयोसीस असलेल्या महिला

· विनाकारण आलेले वंध्यत्व

· अनियमित मासिक पाळी

· बीजांडांची कमी होत असलेली संख्या

· पुरुष वंध्यत्व

· इंडोमेट्रीयोसीस

औषध विरहित IVF

· हे IVF चे अद्ययावत रूप आहे, याचा शोध नुकताच लागला आहे.

· अत्यल्प औषधांचा वापर

· कोणतेही विपरीत परिणाम नाहीत

· सुरक्षित आणि परवडणारा पर्याय

औषध विरहित IVF कोणासाठी?

· PCOS ग्रस्त महिला

· रेझीस्टंट ओव्हरी सिंड्रोम

· थ्रोम्बोफिलीयाचे रुग्ण

· अत्यवस्थ रुग्ण

· बीजांडांच्या फलना संबंधीच्या समस्या

गर्भ जतन:

ज्या रुग्णांना कर्करोगासारख्या गंभीर आजारांशी सामना करावा लागतो त्यांच्यासाठी गर्भ जतन करण्याचे तंत्र हे एक वरदान आहे. कर्करोगाच्या उपचारांदरम्यान स्त्री व पुरुष य दोघांच्याही प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. उपचारांपूर्वी त्याने किंवा तिने वंध्यत्व तज्ञांना भेटून आपले शुक्राणू किंवा स्त्री बीजे यांचे जतन करून ठेवावे. या पद्धतीद्वारे त्याला किंवा तिला आपली प्रजनन क्षमता जतन करता येते आणि कर्करोगाचे उपचार झाल्यानंतर त्यांच्या सोयीने ते गर्भधारणा करवून घेऊ शकतात.

दाता उपचार:

जर शुक्राणू किंवा स्त्री बीजे हलक्या प्रतीची असतील तर एखाद्या स्त्रीची स्त्री बीजे व दुसऱ्या पुरुषाचे वीर्य यांचा संयोग घडवून आणून गर्भधारणा होऊ शकते.

सरोगसी:

यामध्ये, जोडपे एखाद्या स्त्रीला आपल्यासाठी गर्भधारणा करवून घेण्याची विनंती करू शकते. विशिष्ट वैद्यकीय स्थिती असलेल्या जोडप्यांना सरोगसीचा पर्याय निवडता येऊ शकतो.

पुरुष वंध्यत्व उपचार:

विशिष्ट परिस्थितीवर आधारित Microfluidics, MACS (Magnetic Assorted Cell Sorting), TESA (Testicular Sperm Aspiration), MicroTESE (Microscopic testicular sperm extraction) या उपचारांच्या सहाय्याने पुरुषांना पितृत्वाचा लाभ होऊ शकतो.

जर तुम्हाला गर्भधारणा होत नसेल तर तुम्हां दोघांपैकी एकाला वंध्यत्वाची समस्या असू शकते. य समस्येचे निदान केवळ वंध्यत्व तज्ञ करू शकतात. वाढत्या वयानुसार स्त्री व पुरुष दोघांच्याही प्रजनन क्षमतेवर परिणाम होत जातो त्यामुळे वंध्यत्वावरील उपचारांना कधीही उशीर करू नये. तुम्हाला आनंदी पालकत्व लाभो!

Have question? Contact us now!


Have question? Contact us now!