Blog
Case Study

पीजीटी-ए सह पूर्ण होईल तुमचे आई- वडील होण्याचे बहुप्रतीक्षित स्वप्न

३४ वर्षांची स्नेहा आणि ३६ वर्षांचा संजय यांच्या लग्नाला ९ वर्षे झाली होती. आई- वडील होण्याची आतुरतेने वाट पहात असलेल्या या जोडप्याने गेल्या ६ वर्षांमध्य गर्भरोपणाचे अनेक उपचार घेतले होते. परंतु, पुण्याच्या ओएसिस फर्टीलिटी सेंटरमध्ये येईपर्यंत त्यांच्या कुठल्याच प्रयत्नाला यश आले नाही. या जोडप्याने आजवर केलेले अनेक गर्भरोपणाचे उपचार अयशस्वी ठरले होते. पूर्वी केलेल्या ४ आयव्हीएफच्या उपचारांमध्ये झालेल्या दोन गर्भपातांना देखील ते सामोरे गेले होते. त्यांच्या काही नियमित चाचण्या केल्या असता संजयच्या डीएफआयची संख्या २४% असली (ज्यामुळे शुक्राणूंची संख्या व त्यांचा होणारा क्षय लक्षात येतो.)तरीही तिच्या दोन्ही गर्भनलिका बंद असल्याचे व तिच्या गुणसूत्रांमध्ये दोष असल्याचे चाचण्यांमधून निष्पन्न झाले.

दोघांचे वाढलेले वय व पूर्वी त्यांना आलेले अपयश लक्षात घेता अशा उपचारांचे नियोजन करण्यात आले ज्यामध्ये या जोडप्याला गर्भाचे रोपण करण्याआगोदर त्याच्या काही जनुकीय चाचण्या कराव्या लागल्या, जेणेकरून त्यांच्या गर्भधारणेच्या शक्यता वाढतील.

प्री- इम्प्लांटेशन जेनेटिक टेस्टिंग (पीजीटी) म्हणजे पालकत्वासाठी केलेली प्राथमिक चाचणी, यामध्ये स्त्रीच्या गर्भाशयामध्ये गर्भरोपण करण्याआधीच इन व्हिट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) चक्रादरम्यान संबंधित गर्भाच्या काही जनुकीय चाचण्या केल्या जातात.

मानवी गर्भामध्ये सामान्यत: काही अतिरीक्त क्रोमोसोम असतात किंवा काही क्रोमोसोम कमी असतात त्यामुळे गर्भपात किंवा अनुवांशिक विकृती असलेल्या बाळाचा जन्म होणे या दोन्हीचा धोका संभवतो त्यालाच जनुकीय दोष असे म्हणतात.

गर्भामधील जनुकीय दोषांची चाचणी कशी केली जाते?

गर्भाच्या जनुकीय रचनेचा अभ्यास करण्यालाच गर्भरोपण- पूर्व जनुकीय चाचणी असे म्हणतात.

आयव्हीएफ उपचारांमध्ये गर्भाच्या तीन प्रकारच्या जनुकीय चाचण्या केल्या जाऊ शकतात.

  • पीजीटी- ए- सदोष जनुकांची संख्या जाणून घेण्यासाठी गर्भरोपण- पूर्व चाचणी
  • पीजीटी- एम – वैयक्तिक आजार जाणून घेण्यासाठी गर्भरोपण- पूर्व चाचणी
  • पीजीटी – एसआर – गुणसूत्रांची पुनर्रचना करण्यासाठी गर्भरोपण- पूर्व चाचणी
    गर्भामध्ये काही दोष असल्याने तो गर्भ रोपणासाठी अयोग्य आहे असे स्पष्ट करणारी पीजीटी- ए ही चाचणी सर्वात जास्त वेळा केली जाणारी चाचणी आहे.पीजीटी- ए मध्ये गर्भाशयामध्ये नंतर वाढणाऱ्या गर्भाची दुर्बिणीतून चाचणी केली जाते.
    गर्भधारणेसाठी अडथळे येत असलेल्या, स्त्रीचे वय जास्त असलेल्या, वारंवार गर्भरोपण अयशस्वी झालेल्या, वारंवार गर्भपात झालेल्या किंवा पुरुषाच्या शुक्राणूंमध्ये गंभीर दोष असलेल्या जोडप्यांना पीजीटी चाचणी करून घेण्याचा सल्ला दिला जातो.

स्नेहाची जनुकीय स्थिती पाहता तिचे गर्भांचा संग्रह करून नंतर त्यांची पीजीटी-ए चाचणी करण्याबाबत समुपदेशन करण्यात आले होते.

त्यानंतर, तिच्या बंद असलेल्या गर्भनलिकांवर दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून तिच्या गर्भाशयामध्ये केवळ गर्भधारणेस योग्य गर्भ सोडण्यात आले. हे गर्भरोपण यशस्वी झाले आणि तिला गर्भधारणा झाली.

म्हणूनच,व्यक्तिकेंद्रित उपचार, तज्ञांचे मार्गदर्शन, व जोडप्यांची मूल हवे असण्याची प्रबळ इच्छा यांच्या जोरावर ओएसिस फर्टीलिटी मध्ये आई-वडील होण्याची स्वप्ने पूर्ण होतात.

Write a Comment

BOOK A FREE CONSULTATION