Blog
Uncategorized

आयव्हीएफ उपचारांविषयी मिथके

आयव्हीएफ उपचारांविषयी मिथके

सर्व जोडीदारांचा आई-वडील होण्याचा प्रवास अतिशय भावनिक असतो.पालक होण्याचा प्रवास प्रत्येक जोडीसाठी वेगवेगळ्या पद्धतीचा असतो.जेव्हा जोडप्याला नैसर्गिक गर्भधारणा होऊ शकत नाही तेव्हा गर्भधारनेसाठी उपचारांची मदत होऊ शकते. आयव्हीएफ (इनव्हीत्रो फर्टिलायझेशन) हा त्यांपैकीच एक प्रभावी उपचार आहे. परंतु अनेकांना या आयव्हीएफ उपचारांची नेमकी प्रक्रिया माहिती नसल्याने त्यांच्या मनात याविषयी भिती व गैरसमज असतात. आयव्हीएफ उपचारांना सामोरे जाण्याआधी जोडप्याला आयव्हीएफ उपचारांविषयी व त्याबद्दलच्या मिथकांविषयी संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. आयव्हीएफ उपचारांविषयीच्या सर्वसामान्य मिथकांवर एक नजर टाकुया

1. मिथक:

आयव्हीएफ यशस्वी होण्यामध्ये स्त्रीच्या वयाचा काहीही वाटा नसतो

सत्य:

सर्व वयोगटामधील स्त्रियांच्या बाबतीत आयव्हीएफ यशस्वी होत नाही. स्त्रीचे वय जसजसे वाढत जाते तशी तिची गर्भधारणेची क्षमता कमी होत जाते त्याचप्रमाणे आयव्हीएफ यशस्वी होण्याचे प्रमाणदेखील कमी होते.

2. मिथक:

आयव्हीएफ केल्याने जेह्मी तिळे किंवा चार मुले होतात.

सत्य:

आधी दोन किंवा तीन गर्भांचा वापर केल्यास तीन किंवा चार मुले होत असत. परंतु आता, पीजीटी, ईआरए आणि अन्य अद्ययावत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केवळ एकाच गर्भाचे रोपण केले जाते त्यामुळे अनेक गर्भधारणा होत नाहीत.

3. मिथक:

गर्भधारणा होत नसलेल्या सर्व जोडप्यांना आयव्हीएफ उपचार घ्यावे लागतात

सत्य:

प्रत्येक जोडप्याच्या सम्स्येनुसार त्यांना योग्य वेळी संभोगाद्वारे करावयाची गर्भधारणा, आययुआय आणि इतर उपचारांनी जोडप्याला गर्भधारणा होऊ शकते. त्यामुळे सर्वच जोडप्यांना आयव्हीएफ उपचार घ्यावे लागत नाहीत.z

4. मिथक:

पुरुषांच्या धूम्रपानाचा आयव्हीएफ च्या यशस्वितेवर कोणताही परिणाम होत नाही

सत्य:

पुरुषांच्या धूम्रपानाने आयव्हीएफ यशस्वी होण्याचे प्रमाण कमी होते. व त्यामुळे गर्भपातदेखील होऊ शकतो.

5. मिथक:

आयव्हीएफ १००% यशस्वी होऊ शकते

सत्य:

आयव्हीएफ यशस्वी होण्यास अनेक घटक जबाबदार असतात, ५०-७०% आयव्हीएफ उपचार यशस्वी होतात.

6. मिथक:

आयव्हीएफ ने झालेल्या मुलांमध्ये दोष असतात

सत्य:

अनेक लोकांना आयव्हीएफ बद्दल नीट माहिती नसल्याने त्यांच्या मनात अनेक गैरसमज असतात. आयव्हीएफ उपचारांनी झालेली मुले नैसर्गिक गर्भधारणेने झालेल्या मुलांइतकीच सुदृढ असतात.

7. मिथक:

आयव्हीएफ उपचार घेणार्यांना रुग्णालयात दाखल व्हावे लागते

सत्य:

आयव्हीएफ उपचार दिवसा केले जातात. एखाद्या व्यक्तीवर आयव्हीएफचे एक प्रकारचे उपचार झाले की ती व्यक्ती घरी जाऊ शकते. सातत्याने रुग्णालयात राहण्याची गरज पडत नाही. एका ठराविक वयापर्यंत जोडप्याने गर्भधारण प्रक्रिया पुढे ढकलू नये. आपापल्या कारकिर्दीच्या स्थिरतेच्या कारणाने किंवा अन्य कोणत्याही कारणाने तुम्हाला लगेच मूल नको असेल तर अशी बीजांडे, शुक्राणु व गर्भ जतन करून ठेवून कालांतराने त्याचा गर्भधारणेकरता उपयोग करावा. बदलत्या जीवनशैलीनुसार पीसीओ, एंडोमेट्रिओसिस, शुक्राणुंमध्ये होणारी घट या समस्यांमध्ये होणारी वाढ लक्षात घेता अजिबात उशीर न करता गर्भधारणेसाठीचे उपचार अगदी वेळेवर घेणे गरजेचे आहे.

Write a Comment

BOOK A FREE CONSULTATION