AIDS

तुमच्या पालकत्वात एड्सचा अडथळा नको! प्रजनन उपचारांमुळे ‘एचआयव्ही’ग्रस्त जोडप्यांना पालकत्वाचं वरदान

तुमच्या पालकत्वात एड्सचा अडथळा नको! प्रजनन उपचारांमुळे ‘एचआयव्ही’ग्रस्त जोडप्यांना पालकत्वाचं वरदान

[tm_spacer size=”xs:20;sm:20;md:20;lg:45″]श्री.सुनील आणि श्रीमती दिव्या यांना नियमित तपासणी दरम्यान एचआयव्हीचे निदान झाल्याचे समजल्यानंतर त्यांना भविष्य अंधकारमय दिसू लागलं. काही डॉक्टरांनी त्यांना स्पर्म (शुक्राणू) डोनर किंवा दत्तक घेण्याचा पर्याय सुचविल्याने जैविक मूल असण्याच्या त्यांच्या स्वप्नांचाचक्काचूर झाला. मात्र, ओअ‍ॅसिस फर्टिलिटीला भेट दिल्यानंतर त्यांना अत्याधुनिक प्रजनन उपचारांच्या विषयी माहिती मिळाली. त्यांच्या पालकत्वाच्या स्वप्नाला पुन्हा बळ मिळालं व जगण्याचा नवा मार्ग गवसला. अत्याधुनिक प्रजनन उपचार पद्धती व अँटीरेट्रोव्हायरल थेरपीमुळे पार्टनर व संततीमध्ये एचआयव्हीचा प्रसार होण्याचा धोका कमी होतो. त्यामुळे एचआयव्ही रुग्णांना आशेचा नवा किरण गवसला आहे. जोडप्याच्या पालकत्वाच्या स्वप्नात एड्स अडथळा असू शकत नाही. खरंतर यासाठी पुरेश्या प्रमाणात जागरुकता निर्माण करणे महत्वाचे ठरणार आहे. ओअ‍ॅसिसफर्टिलिटीकडे एचआयव्हीग्रस्त जोडप्यांच्या वंध्यत्वावर मात करण्यासाठीचा उपचारपद्धतीचा अनुभव व कौशल्य आहेत. आजवर अनेक जोडप्यांना पालकत्वाची अनुभती देण्यासाठी मदत केली आहे. गोपनीयतेच्या हेतून जोडप्याची नावे बदलण्यात आली आहेत.

महिलांच्या प्रजनन क्षमतेवर HIV चा नेमका परिणाम?

एचआयव्हीमुळे महिलांचे शारीरिक, जैविक, मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम होतो आणि त्यामुळे वजन कमी होणे, प्रदीर्घ अनओव्ह्युलेशन आणि मासिक पाळीत अनियमितता यांच्यासारख्या समस्यांना देखील सामोरे जावे लागू शकते. एचआयव्ही पॉझिटिव्ह महिलांमध्ये ओटीपोटीचा दाह, ट्यूबल फॅक्टर वंध्यत्व इत्यादींचा धोका असल्याचे दिसून आले आहे.गर्भधारणा आणि बाळाच्या आरोग्याबाबतचीशंका आणि भीतीमुळे निर्माण होणारा ताण अशाप्रकारच्या महिलांच्या प्रजनन क्षमतेवरही परिणाम करतो. तसेच त्यांच्यामध्ये गर्भपात होण्याची शक्यता देखील अधिक असते. पण, यासर्व बाबींमुळे एखाद्याचं कुटूंबनियोजनाचं स्वप्न खंडित होऊ शकत नाही.

पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर HIV चा नेमका परिणाम?

WHO च्या मते, एचआयव्ही पॉझिटिव्ह पुरुषांमध्ये हायपोगोनॅडिझम विकसित होतो आणि शुक्राणूंची संतृप्तता, शुक्राणूंची संख्या आणि गतिशीलता कमी होते. तसेच, त्यांना इरेक्टाइल डिसफंक्शन, कामवासना कमी होणे, ऑलिगोस्पर्मिया आणि नपुंसकत्व यांसारखी स्थिती देखील आढळून येते.

प्रजनन उपचार पद्धती:

सेरोडिस्कॉर्डंट (मिश्र)जोडपी:

जोडप्यामध्ये, जेव्हा पुरुष जोडीदाराला एचआयव्हीची लागण होते, तेव्हा त्याच्यावर अँटीरेट्रोव्हायरल औषधांचा उपचार केला जातो ज्यामुळे सीरम आणि सीमेन व्हायरल लोड कमी होतो. जेव्हा पुरुष जोडीदारात व्हायरल लोड आढळून येत नाही, तेव्हाच जोडप्यामध्ये ART उपचारांना सुरुवात केली जाते. महिला जोडीदाराला दिलेल्या प्री-एक्सपोजर प्रोफिलॅक्सिसमुळे (PrEP) महिला जोडीदाराला होणाऱ्या संसर्गाचा धोका कमी होतो. ICSI सहित सेमिनल प्लाझ्मा, IUI आणि IVF च्या डबल वॉश सारख्या विशेष प्रोटोकॉलमुळे पत्नी आणि मुलाच्या बाबतीत सेरोकन्व्हर्जनचा धोका कमी होतो.

एचआयव्ही ग्रस्त जोडप्यांना पालकत्वाची अनुभूती देण्यासाठी विविध उपचार पद्धती उपलब्ध आहेत. केवळ पुरेश्या प्रमाणात जागरुकता नसल्यामुळे निराशा व भ्रमनिराश होतो.

एचआयव्ही ग्रस्त जोडप्यांत गर्भधारणा-पूर्व समुपदेशन अत्यंत महत्वाचे ठरते. ज्यामुळे संभाव्य धोके, खबरदारीचे उपाय आणि कुटूंबनियोजनाला सुरुवात करण्यापूर्वीचे उपचारांचे पर्याय यांचा त्यामध्ये समावेश होतो.

आशेवर जग चालतं! तुमचं पालकत्वाचं स्वप्न अपूर्ण ठेऊ नका. एड्ससोबत लढूया व पालकत्वाचे स्वप्न साकार करूया!

Was this article helpful?
YesNo

fill up the form to get a

Free Consultation

Your data is 100% safe with us.

Avail 0% interest on EMI
All Procedures | No Upper Limit

How we reviewed this article:

HISTORY
  • Current Version
  • January 4, 2023 by Oasis Fertility

LatestTrending

Ad

BOOK A FREE CONSULTATION

Book

Appointment

Call Us

1800-3001-1000