लठ्ठपणामुळे गर्भधारणेच्या शक्यता कमी होतात का?
जे खाता त्याकडे लक्ष द्या आणि निरोगी राहण्यासाठी नियमितपणे व्यायाम करायला विसरू नका.लठ्ठपणामुळे गर्भधारणा होण्याच्या शक्यता कमी होतात. होय, गर्भधारणेची वेळ येते तेव्हा तुमचे आकारमान पाहणे आवश्यक ठरते. जीवनशैलीत झालेल्या बदलांमुळे प्रजननाच्या योग्य वयात असलेल्या स्त्री- पुरुषांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण वाढत आहे. जर तुमचा बीएमआय (बॉडी मास इंडेक्स) ३० पेक्षा अधिक असेल तर तुम्ही लठ्ठ आहात असे समजले जाते. एखाद्याचे वजन योग्य आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी त्याच्या उंची आणि वजनाच्या मानाने त्याचा बॉडी मास इंडेक्स काढला जातो.लठ्ठपणा जोडप्याच्या प्रजनन क्षमतेवर गंभीर परिणाम करते व त्यांना वंध्यत्व येऊ शकते त्याचप्रमाणे, मधुमेह,उच्च रक्तदाब, हृदयरोग, स्ट्रोक, कर्करोग, सांधेदुखी यांसारखे आजार देखील होऊ शकतात. पण, घाबरू नका!वजन की केल्यास तुम्हाला गर्भधारणा होऊ शकते. स्त्री- पुरुषांमध्ये असलेल्या लठ्ठपणामुळे वंध्यत्व कसे येते हे आता तपशीलवार पाहूयात.
लठ्ठपणा आणि स्त्रियांमधील वंध्यत्व
लठ्ठपणामुळे महिलांना बीजनिर्मिती संबंधित आजार होतात आणि लठ्ठ महिलांना गर्भधारणा होण्यास विलंब होतो असे अनेक आभ्यासांतून सिद्ध झाले आहे. महिलांमधील अतिरिक्त चरबीमुळे महिलांमध्ये हार्मोन्सचा असमतोल होतो त्यामुळे त्यांची मासिक पाळी अनियमित होते व बीजनिर्मितीचे विविध आजार जडतात. लठ्ठपणामुळे गर्भपाताचा धोका वाढतो त्याचबरोबर सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञानाचा देखील फारसा उपयोग होत नाही.
लठ्ठपणाचे गर्भावस्थेदरम्यान होणारे परिणाम:
लठ्ठपणा गर्भावस्थेमध्ये खालील गुंतागुंती निर्माण करतो:
- कालपूर्व प्रसूती
- सिझेरियन प्रसूतीच्या शक्यता वाढणे
- मॅक्रोसोमिया (गर्भ लांब असणे)
- जन्मजात व्यंग
- मृत गर्भजनन
लठ्ठपणा आणि पुरुषांमधील वंध्यत्व:
पुरुषांचे वजन जास्त असल्यास टेस्टेरॉनची पातळी कमी असते, शुक्राणूंची गुणवत्ता खराब असते, व सर्वसाधारण वजनाच्या पुरुषांपेक्षा कमी प्रजननक्षमता असते, सर्वसाधारण वजनापेक्षा ९ किलो जास्त वजनाच्या (20 पाउंड) पुरुषांना लठ्ठ (एनसीबीआय)पुरुष म्हटले जाते. अशा पुरुषांच्या बाबतीत वंध्यत्व १०% नी वाढते.
अशा लठ्ठ पुरुष शारीरिक संभोगाच्या बाबतीत अनिच्छ असतात, आणि त्यांच्यातील शुक्राणूंची संख्या देखील कमी असते. त्यांची हालचाल आणि शारीरिक उलाढालदेखील कमीच असते.
लठ्ठपणावरील उपचार:
एखाद्या व्यक्तीच्या वजनात झालेली ५-१०% घट देखील त्यांची प्रजननक्षमाता वाढवू शकते. समतोल आहात, बाहेरचे खाण्यावर ताबा, आणि दररोज शारीरिक व्यायाम केल्याने वजन घटते. वजन नियंत्रणात आले की बीजनिर्मिती व प्रजनना संबधीच्या सर्व समस्या नाहीशा होतात व गर्भधारणा होण्याच्या शक्यता वाढतात. ज्या जोडप्यांना बीजनिर्मिती व शुक्राणू संदर्भातील समस्या असल्यास त्यांच्यासाठी अद्ययावत आयव्हीएफ/आयसीएसआय उपचार देखील सहाय्यकारी ठरतात. परंतु, तुम्ही जरी गर्भधारणेसाठी उपचार घेत असलात तरीही वजनाचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.
खाण्या-पिण्याच्या योग्य सवयी आणि शारीरिक हालचाल ही द्विसूत्री तुमचे पालकत्वाचे स्वप्न पूर्ण करेल हे विसरू नका! तुम्हाला आनंदी पालकत्व लाभो!