![](/wp-content/uploads/2018/10/Frame-1171277672.png)
वंध्यत्व तज्ञाच्या दवाखान्यात उपचारांसाठी गेल्यानंतर जोडप्याने वंध्यत्व तज्ञाला विचारावयाचे १० प्रश्न
![वंध्यत्व तज्ञाच्या दवाखान्यात उपचारांसाठी गेल्यानंतर जोडप्याने वंध्यत्व तज्ञाला विचारावयाचे १० प्रश्न](https://oasisindia.in/wp-content/uploads/2022/05/Oasis-10-reasons-Blog-Banner2.jpg)
गर्भधारणा होण्यात अडथळे येणाऱ्या अनेक जोडप्यांसाठी वंध्यत्व चिकित्सालयात जाणे हे एक दु:स्वप्नच असते. गर्भधारणा होण्यास सक्षम नसण्याची भावना उध्वस्त करणारी आहे. आपल्याला नेमके कशामुळे वंध्यत्व आले आहे व कोणत्या उपचारांनी आपण आई- बाबा होऊ शकतो या दोन्हीही गोष्टींची माहिती नसल्याने अशा जोडप्यांचा भितीने पुरेपूर ताबा घेतलेला असतो. कसनुसेपणा, अपराधीभाव व अशाश्वततेने ते हैराण झालेले असतात. परंतु, वंध्यत्वावर मात करत पालक होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या या प्रवासात वंध्यत्व तज्ञाचा सल्ला घेणे ही अतिशय महत्वाची बाब आहे. तर. अशा जोडप्यांनी वंध्यत्व तज्ञाकडे गेल्यानंतर अगदी सुरुवातीला सल्ला व समुपदेशन घेताना विचारावेत असे हे प्रश्न आहेत.
1.आम्हाला गर्भधारणा का होऊ शकत नाही?
निदान ही सर्वात महत्वाची पायरी आहे. जोडप्याने वंध्यत्व चिकित्सालयाला भेट दिल्यानंतर सुरुवातीलाच अनेक रक्त तपासण्या, स्कॅन्स, जोडप्याच्या वैद्यकीय इतिहासाची माहिती घेणे, आधीच्या वैद्यकीय चाचण्या व उपचार यांविषयी समजून घेणे, त्यांच्या आरोग्याची सध्याची स्थिती तपासणे इत्यादी घडामोडींची शृंखलाच सुरु होते. स्त्री व पुरुष दोघांच्याही काही वंध्यत्व चाचण्या केल्यानंतर वंध्यत्व तज्ञ त्यांच्या वंध्यत्वाचे नेमके कारण सांगू शकतो.
2.जीवनशैलीत बदल केल्यास गर्भधारणेस मदत होते का?
काही वेळे, वजन कमी केल्यास, दररोज व्यायाम केल्यास व योग्य आहार घेतल्यास जोडप्यांना नैसर्गिकरित्या गर्भधारणा होऊ शकते. यामुळे गर्भधारणेसाठी घेत असलेले उपचार यशस्वी होण्याची शक्यता देखील वधारते.
3.आम्ही गर्भधारणेसाठी कोणते उपचार घ्यावेत?
गर्भधारणेसाठी देण्यात येणारे उपचार अत्यंत वैयक्तिक पद्धतीचे असून ते प्रत्येक जोडप्याकरता वेगवेगळे असू शकतात. गर्भधारणेच्या बाबतीत एकाच प्रकारचे उपचार सर्वांना लागू होत नाहीत. स्त्रीबीजांचे रोपण, आययुआय या मूलभूत उपचारांपासून आयव्हीएफ, आयसीएसआय, गर्भरोपणापूर्वी करण्यात येणारी गुणसूत्रांची चाचणीइत्यादी अनेक अद्ययावत उपचार जोडप्याच्या आरोग्याची स्थिती, वय, जीवनशैली, आणि इतर निकषांवर देता येतात. कोणत्या प्रकारच्या उपचारांनी गर्भधारणा होऊ शकते हे जोडप्यांना समजणे आवश्यक असते. संपूर्ण उपचारपद्धतीविषयी जोडप्याला अगोदर कल्पना देणे गरजेचे आहे.
4. उपचार यशस्वी होण्याचे प्रमाण काय आहे?
उपचार घेण्यास सुरुवात करण्यापूर्वी जोडप्याला त्या विशिष्ट उपचारांच्या यशस्वितेची माहिती असणे आवश्यक आहे. या यशस्वितेचा दर जोडप्याचे वय, आरोगयाची स्थिती, स्त्रीबीज व पुरुषबीजाची गुणवत्ता इत्यादीनुसार वेगवेगळा असला तरीही गर्भधारणा होण्यास लागणाऱ्या कालावधीची साधारण कल्पना जोडप्याला असायला हवी. वास्तवाची जाणीव ठेवत अपेक्षा ठेवणे नेहमीच चांगले.
5.वंध्यत्व उपचारांचे काही दुष्परिणाम होतात का?
उपचारांचे दुष्परिणाम समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. वंध्यत्वावरील औषधांनी काही महिलांना मळमळ, दुखणे, मानसिक स्थितीत सतत बदल होणे इत्यादी त्रास होऊ शकतात.म्हणूनच, उपचार सुरु करण्यापूर्वीच जोडप्यांना त्या उपचारांचे शक्य असलेले दुष्परिणाम व त्यातील गुंतागुंत माहित असणे आवश्यक आहे.
6.जुळे होण्याची शक्यता कितपत आहे?
आयव्हीएफ उपचारांनी काही वेळा एकापेक्षा अधिक गर्भ राहू शकतात. अनेक गर्भधारणा होण्याच्या शक्यतांवर केलेली चर्चा जोडप्यांसाठी निश्चितपणे फायदेशीर ठरू शकते. आयव्हीएफ ने नेहमीच जुळी मुले होत नसून एकच गर्भ राहण्याची देखील तितकीच शक्यता असते हे त्यांना माहिती असावे.
7.आम्हाला गर्भधारणा झाली नाही तर आम्ही डोनर उपचार घेऊ शकतो का?
काही जोडप्यांना गर्भधारणा होण्यासाठी दात्याने दिलेल्या पुरुषबीज अथवा स्त्रीबीजाची आवश्यकता असते. त्यामुळे चिकित्सालयातील डोनर उपचारांची शक्यता पडताळून पहा.
8.वंध्यत्व चिकित्सालय गर्भ जतन करून ठेवते का?
आयव्हीएफ उपचारांदरम्यान अनेक गर्भ तयार होऊ शकतात परंतु ते सर्वच गर्भ एकाच वेळी वापरले जात नाहीत.म्हणूनच, वंध्यत्व चिकित्सालयात जास्तीचे गत्भ जतन करून ठेवण्याची सोय आहे का हे बघावे लागते. जास्तीचे गर्भ द्रवरूपातील नायट्रोजनमध्ये जतन करून ठेवले जातात. जेणेकरून, एखादे आवर्तन अयशस्वी झाल्यास दुसऱ्या वेळच्या आवर्तनासाठी गर्भरोपण प्रक्रियेसाठी जतन करून ठेवलेला गर्भ वापरता येतो व महिलेला स्त्रीबीज उत्तेजित करण्याच्या त्रासदायक प्रक्रीयेमधून पुन्हा जावे लागत नाही.
9.आम्ही उपचारांसाठीची तयारी कशी करावी?
वंध्यत्वावरील उपचारांना सामोरे जाण्याआधी याविषयीच्या कराव्यात व करू नयेत अशा अनेक गोष्टी माहिती करून घेणे आवश्यक आहे.
10. उपचारांचा खर्च किती असेल ?
खर्चाचा अंदाज येणे अतिशय आवश्यक आहे. काही वेळा, आययुआय किंवा आयव्हीएफच्या एकाच आवर्तनात यश मिळत नाही. जोडप्याच्या स्थितीनुसार गर्भधारणा होण्यास एकाहून जास्त आवर्तने करावी लागतात. त्याकरता येणाऱ्या खर्चाचा अंदाज असल्यास जोडप्याला वंध्यत्वावरील उपचारांसाठी मानसिक व आर्थिक पातळीवरची तयारी करता येते.
तुमची भिती, तुमच्या शंका आणि काळज्या आता विसरा. वंध्यत्व तज्ञाला भेटून आत्मविश्वासाने व सकारात्मक मानसिकतेने तुमच्या पालकत्वाचा प्रवास सुरु करा. तुम्हाला आनंदी पालकत्व लाभो!
![](/wp-content/uploads/2018/10/form-title.png)
![](/wp-content/uploads/2024/11/consult_popup_img.webp)
fill up the form to get a
Free Consultation
Avail 0% interest on EMI
All Procedures | No Upper Limit
How we reviewed this article:
- Current Version
- May 26, 2022 by Oasis Fertility