Blog
Enquire Now
Uncategorized

अंतःस्रावी रसायने आणि प्रजनन क्षमता

अंतःस्रावी रसायने आणि प्रजनन क्षमता

अंतःस्रावी रसायने आणि प्रजननक्षमतेमूळे अडथळा निर्माण होतो:

पालकत्व हा एक विलक्षण प्रवास आहे, परंतु आव्हांनात्मक प्रजननक्षमता असलेल्या जोडप्यांसाठी हा  अडचणीचा असू शकतो. अनेकांना लठ्ठपणा, होणाऱ्या आईचे प्रौढत्व, जीवनशैली, धूम्रपान आणि इतर वैद्यकीय कारणांबद्दल माहिती आहे, जी एखाद्या व्यक्तीच्या जननक्षमतेवर नकारात्मक परिणाम करू शकतात. परंतु तुमच्यापैकी बर्‍याच जणांना माहित नाही की ईडीसी (एंडोक्राइन डिस्रप्टिंग केमिकल्स) प्रजननक्षमतेला बाधा आणतात आणि तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात वापरत असलेल्या गोष्टींमध्ये ते उपस्थित असतात.

ईडीसी म्हणजे काय?

अशी संप्रेरक सदृश रसायने/नैसर्गिक पदार्थ जे नैसर्गिक संप्रेरकांना कार्य करण्यापासून रोखतात त्यांना अंतःस्रावी-विघटनकारी रसायने (ईडीसी)  म्हणतात. ते घरगुती वस्तू, लहान मुलांची खेळणी, मेकअपच्या वस्तू इत्यादींमध्ये उपस्थित असतात.

हे जड धातू, व्यावसायिक रसायने, औद्योगिक दूषित पदार्थ, कृषी रसायने आणि औद्योगिक सॉल्व्हेंट्समध्ये देखील सापडतात. ईडीसीमुळे गर्भधारणेवर परिणाम होतो आणि त्यामुळे इतर अनेक गुंतागुंत निर्माण होतात.

अनेक अभ्यासांनी असे सूचित केले आहे की जननेंद्रियाच्या येथे पावडरच्या वापरामुळे स्त्रियांमध्ये एपिथेलियल डिम्बग्रंथि कर्करोगाचा धोका वाढू शकतो.

सामान्य ईडीसींची यादी:

  1. बिस्फेनॉल ए (बीपीए)
  2. डीडीटी
  3. फॅथलेट
  4. ट्रायक्लोसन

शीतपेये पिण्यापूर्वी दोनदा विचार करा कारण त्यात कीटकनाशके असतात

 

सीएसई अहवाल: शीतपेयांमध्ये कीटकनाशकांच्या अवशेषांचे विश्लेषण, २००६

सामान्य घरगुती वस्तू आणि ईडीसीं:

सामान्य घरगुती वस्तू  उपस्थित ईडीसीं
मुलांची खेळणी शिसे
अन्न साठवण्याचे प्लॅस्टिक साहित्य, शाई, डिंक, नेलपॉलिश, शॅम्पू, केसांवर वापरायचा स्प्रे, डिओडोरंट, बॉडी वॉश, मुलांचा मेकअप – आय शॅडो, आय ग्लिटर, डायपर क्रीम, मॉइस्ट वाइप्स, लहान मुलांचे तेल, हातमोजे, रेनकोट, फॅथलेट्स
पावडर, पेंट्स, लेन्स, बाळाच्या आहाराच्या बाटल्या, डेंटल सीलंट, पाण्याच्या बाटल्या, इपॉक्सी रेझिन जे मेटल फूड कॅनला कोट करते, सायकल हेल्मेट, स्टोअर विक्री पावत्या बीपीए
मॉइश्चरायझर, शेव्हिंग क्रीम, शाम्पू, डिओडोरंट, काही खाद्यपदार्थ पॅराबेन्स
टूथपेस्ट, माउथवॉश, डिटर्जंट्स, टॉवेल, शूज, फोन, कटिंग बोर्ड, भांडी घासायचा लिक्विड साबण, किचनवेअर, टूथब्रश, केसांची काळजी उत्पादने ट्रायक्लोसन
इलेक्ट्रॉनिक्स, सोफा, गाद्या ब्रोमिनेटेड फ्लेम रिटार्डंट्स (बीएफआर)
विद्युत उपकरणे, तेलावर आधारित पेंट पॉलीक्लोरिनेटेड बायफेनिल्स (पीसीबी)
बॅटरी, रंगद्रव्ये, प्लास्टिक स्टॅबिलायझर्स कॅडमियम
बटाटा, दूध, ब्रेड, फळे, पिण्याचे पाणी कीटकनाशक

महिलांच्या पुनरुत्पादक आरोग्यावर आणि न जन्मलेल्या बाळावर ईडीसीं चा परिणाम:

  • गर्भधारणेवर परिणाम होऊ शकतो
  • नवजात बालकांच्या आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो
  • यौवनाच्या सुरुवातीच्या बदलांच्यावर प्रभाव पडू शकतो.
  • संज्ञानात्मक आणि वर्तनात्मक बाबी प्रभावित होतात.
  • मुलामध्ये ऑटिस्टिक स्पेक्ट्रम विकार होऊ शकतात

पुरुषांच्या पुनरुत्पादक आरोग्यावर ईडीसीचा प्रभाव

  • शुक्राणूंच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो.
  • शुक्राणूंच्या निर्मितीवर परिणाम होऊ शकतो.

गर्भधारणेदरम्यान ईडीसी च्या संपर्कात आल्याने जननेंद्रियातील विकृती जसे की न उतरणारे वृषण, लिंगातील विकृती आणि मुदतपूर्व जन्म देखील होऊ शकतात.

ईडीसी चा संपर्क कसा कमी करावा?

  • बीपीए मुक्त असलेली उत्पादने वापरा
  • प्लास्टिकच्या डब्यात अन्न गरम करणे टाळा
  • सुवासिक साबण टाळा
  • वारंवार स्वच्छता करा (घरगुती वस्तूंमधून ज्वाला-प्रतिरोधक रसायने काढून टाकण्यासाठी)
  • सुगंध-विरहित क्रीम, स्वच्छता उत्पादने आणि कपडे धुण्याचे डिटर्जंट निवडा.
  • कॅन केलेला (डबाबंद) पदार्थ टाळा.
  • कोणतेही उत्पादन विकत घेण्याआधी लेबले पहा.
  • कीटकनाशकांचा वापर न करता तयार केलेले पदार्थ खाण्याचा प्रयत्न करा.

Write a Comment