कर्करोगाचे रुग्ण आरोग्यपूर्ण पालकत्व कसे निभावतात?
कर्करोगाचे निदान एखाद्या व्यक्तीचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकते. कारण, त्यामुळे व्यक्तीचे शारीरिक,मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या प्रचंड शोषण करते.कर्करोगाचे उपचार म्हणजेच रेडीयेशन आणि केमोथेरपी सारख्या उपचारांनी स्त्री- पुरुष दोघांनाही वंध्यत्वाची समस्या निर्माण होते.परंतु, गर्भ जतनासारख्या आधुनिक उपचारांनी कर्करोगाच्या रुग्णांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे. या उपचारांच्या सहाय्याने कर्करोगग्रस्त रुग्ण देखील भविष्यात मूल जन्माला घालू शकतात. कर्करोग असूनही आपल्याला पालक होता येते याबाबतची जनजागृती होणे ही काळाची गरज आहे.
कर्करोगाने गर्भधारणेवर कसा परिणाम होतो?
- या रोगामुळे शरीरातील हार्मोन्सवर व जननेन्द्रीयांवर विपरीत परिणाम होऊन गर्भधारणेची शक्यता कमी होते.
- कर्करोग शस्त्रक्रिया: या शस्त्रक्रियेमध्ये अंडाशये, गर्भाशय किंवा अंडकोष काढून टाकल्यास व्यक्तीची गर्भधारणेची क्षमता नाहीशी होते.
- रेडीएशन: रेडीएशनची मात्रा,कालावधी आणि अवयव यानुसार एखाद्या व्यक्तीच्या अंडाशयातील अंडी कमी होऊन दिवस भरण्यापूर्वी अंडाशय गळून जाणे किंवा अझुस्पर्मिया झाल्याने शुक्राणू गळून जाणे.
- केमोथेरपी : केमोथेरपीसाठी वापरण्यात येणारी अनेक औषधे जननेंद्रियांना घातक असतात आणि त्यामध्ये सायक्लोफोस्फामाईड सारखे अल्कलीचा स्त्रोत असलेले औषध सर्वात जास्त वापरले जाते.या औषधांनी महिलांमधील अपक्व स्त्रीबीजे उध्वस्त होतात आणि फोलीक्युलर पूल दुहेरी होतो. यामुळे पुरुषांचे शुक्राणू कमी होऊन गर्भधारणा होण्यास अडचणी येतात.
- कर्करोगाच्या उपचारांमुळे स्त्रियांच्या मासिक पाळीत अडचणी निर्माण होऊ शकतात आणि पुरुषांची लैंगिक सुखाची इच्छा नाहीशी होऊन यशस्वी गर्भधारणेच्या शक्यता कमी होतात.
- वय: केमोथेरपी आणि रेडीएशनमुळे वाढत्या वयात कर्करोगाचे निदान आणि उपचार झाल्यास जननग्रंथींचे नुकसान अटळ असते.
गर्भधारणेचे जतन – पालकत्वाच्या दिशेने पाउल
गर्भधारणेचे जतन ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये, अंडी, शुक्राणू, गर्भ, अंडाशयातील अथवा शुक्राणूंच्या पेशी रायोप्रिझर्व्हड (१९६ अंश सेंटीग्रेड इतक्या कमी तापमानावर द्रवरूप नायट्रोजनमध्ये) भविष्यातील वापरासाठी जतन केल्या जातात. कर्करोगाचे उपचार पूर्ण झाल्यानंतर जेव्हा स्त्री- पुरुष जोडपे गर्भधारणेकरता तयार असते, तेव्हा हे जतन करून ठेवलेले अंडी/ शुक्राणू/ गर्भ रोपण केले जाऊन गर्भधारणा होण्यासाठी आयव्हीएफ करू शकतात.
गर्भजतनाचे प्रकार
a) गर्भ जतन
यामध्ये, स्त्रीच्या गर्भाशयातील परिपक्व अंडी अंडाशयावरील प्रक्रियेने किंवा त्याच्याशिवाय आणि शुक्राणू बरोबर आय व्ही एफ द्वारे संयोग करून किंवा न करता जतन केली जातात. संयोगानंतर तयार झालेला गर्भ जतन केला जातो. कर्करोगाचे उपचार संपल्यानंतर जेव्हा स्त्री गर्भधारणेसाठी तयार असते तेव्हा हा जतन केलेला गर्भ काढून स्त्रीच्या गर्भाशयात रोवला जातो ज्यामुळे ती आई होऊ शकते. ही पद्धत गर्भधारणेसाठीची सर्वोत्तम पद्धत आहे.
b) शुक्राणूंचे जतन
कर्करोग असलेल्या पुरुषांचे उपचार सुरु करण्यापूर्वी शुक्राणू जतन केले जातात. तारुण्यात नुकतेच पदार्पण करत असलेल्या मुलांच्या शुक्राणूजन्य पेशी जतन करून नंतर त्यांचे रोपण करता येऊ शकते आणि एआरटी मध्ये वापरण्यासाठी त्यातून शुक्राणू काढले जाऊ शकतात.
c) अपरिपक्व स्त्री बीज रायोप्रिझर्व्हेशन (जतन)
कर्करोगाचे निदान आणि त्यावरील उपचार या दरम्यान उपलब्ध असलेल्या वेळेमध्ये केव्हाही ही प्रक्रिया करता येते. ही प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी रुग्णाचे वय, मासिकपाळीची वेळ आणि कर्करोगाचा प्रकार या गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे. शक्य असल्यास अंडाशयातील अंड्यांची संख्या वाढवण्यासाठी इंजेक्शने दिली जातात आणि त्यानंतर स्त्रीच्या अंडाशयातील अंडी जतन करून मग कर्करोगाचे उपचार सुरू केले जातात. स्त्रीला जेव्हा आई व्हावेसे वाटेल तेव्हा ही जतन केलेली अंडी काढून त्यांचा शुक्राणूंशी संयोग घडवला जातो व स्त्री गरोदर राहते.
d) अंडाशयातील पेशीचे रायोप्रिझर्व्हेशन (जतन)
या मध्ये स्त्रीच्या संपूर्ण अंडाशयातील काही भाग काढून जतन केला जातो. नुकत्याच तारुण्यात पदार्पण केलेल्या मुली आणि ज्यांच्या अंडाशयातील अंडी अनेक कारणांनी उत्तेजित होत नाहीत अशा स्त्रियांसाठी ही पद्धत उपयोगाची ठरते. कर्करोगाचे उपचार पूर्ण झाल्यानंतर जेव्हा स्त्री गरोदर राहण्यासाठी तयार असते तेव्हा ही अंडाशयातील पेशी योनीमार्गात किंवा हेटेरोटोपीक भागात पुन्हा रोवली जाते. एका अभ्यासानुसार असे सिद्ध झाले आहे की या प्रक्रियेमुळे रुग्णांना पुन्हा त्यांच्या जनन क्षमता मिळवता येतात. हा बदल जवळजवळ नव्वद टक्के रुग्णांच्या बाबतीत दिसून आला आहे. ही पेशी आपले कार्य सुरू करते आणि या रोवल्या गेलेल्या पेशीमुळे निर्माण झालेली अंडी एकत्र करून त्यांचा गर्भधारणेसाठी वापर करता येऊ शकतो.
कर्करोगामुळे एखाद्याचे पालक होण्याचे स्वप्न विरून जात नाही! कर्करोगाचे निदान झाल्यानंतर योग्य निर्णय घेणे अतिशय महत्वाचे आहे. यामुळे एखाद्याच्या जनन क्षमतेचे जतन होऊन त्याचे भविष्य उज्वल असू शकते.