Blog
Enquire Now
Uncategorized

महिलांच्या प्रजननक्षमतेला नैसर्गिकरित्या चालना देण्याच्या काही युक्त्या

महिलांच्या प्रजननक्षमतेला नैसर्गिकरित्या चालना देण्याच्या काही युक्त्या

Author: Dr. V Ramya, Consultant & Fertility Specialist

निरोगी गर्भाशय तुमची गर्भवती राहण्याची शक्यता वाढवते. खालील काही युक्त्या वापरुन तुम्ही स्वत:ला व स्वत:च्या शरीराला बाळासाठी तयार करू शकता.

तुमचे शारीरिक वजन तपासत रहा

वजनात बदल झाल्याने तुमच्या एकूण आरोग्यावर परिणाम होतो. वजन जास्त किंवा कमी असल्याने तुमच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो.

स्थूलतेमुळे तुम्हाला पीसीओएस सारखे आजार होऊ शकतात ज्यामुळे हारमोन असंतुलित होऊन तुमची मासिक पाळी अनियमित होते. वजन अतिशय कमी असल्याने देखील हार्मोन्स वर परिणाम होऊन इसट्रोजनचे प्रमाण कमी होते. इसट्रोजन कमी झाल्यास बीज फलन प्रक्रिया मंदावते . त्यामुळे गरोदरपणात अनेक गुंतागुंत निर्माण होते.

वजणाचे प्रमाण योग्य राखल्यास निरोगी गर्भधारणा होण्याची शक्यता वधारते. अतिश्रमाने देखील प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो हे देखील लक्षात ठेवा.

संतुलित आहार घ्या.

आपण जे अन्न खातो त्याचे आपल्या शरीरावर थेट परिणाम होतात असे आपण वर्षानुवर्षे ऐकत आलो आहोत. जीवनसत्वयुक्त आहार घेतल्याने आपले शरीर व्यवस्थित कार्य करते. विशिष्ट अन्न सेवन केल्याने प्रजनन क्षमता वाढत असल्याचे कोणतेही पुरावे नाहीत. चांगले अन्न खाल्ल्याने प्रजनन क्षमता सुधारता येऊ शकते. जसे की:

– भरपेट नाश्ता करावा आणि त्यामध्ये आंटी ओकसिडेंट असलेली फळे समाविष्ट असावीत.

– भरपूर पाणी प्यावे आणि थंड व गोड पेये टाळावीत.

– ट्रान्स fats टाळावेत.

– तुम्हाला पीसीओएस असल्यास प्रक्रिया केलेली कर्बोदके टाळावीत.

– फायबर युक्त अन्न खावे

– आहारात प्रोटीन युक्त अन्नाला स्थान द्यावे

– निरोगी फटस घ्यावेत.

 

 

अल्कोहोल व तंबाखू टाळावेत

अल्कोहोल व तंबाखू मुळे माणसाच्या शरीरावर गंभीर परिणाम होतात. अल्कोहोल सेवनाने इसट्रोजन ची पातळी खालवते त्यामुळे बीज फलन प्रक्रिया मंदावते. त्याने तुमची गर्भधारणा होण्यास अडथळे येतात.

तंबाखू आणि सिगारेट मध्ये असलेले अन्य आमली पदार्थ महिलांच्या शरीरावर विपरीत परिणाम करतात त्यामुळे महिलांच्या स्त्रीबीजाची संख्या कमी होऊन गर्भधारणा प्रक्रिया लांबते. यामुळे स्त्रियांची मासिक पाळी देखील अनियमित होते.

अनेकाविध जीवनसत्व अथवा गर्भधारणेसाठी आवश्यक जीवनसत्व घेण्यावर भर द्या.

तुम्ही गर्भधारणे साठी प्रयत्नशील असाल तर संतुलित आहाराबरोबरच काही विविध जीवनसत्वे अथवा गर्भधारणेकरता आवश्यक जीवनसत्वे अवश्य घ्या. तुमच्या शरीरात जीवनसत्वाची कमतरता असल्यास ब जीवनसत्व, नियासीन अथवा फॉलिक अॅसिड घेतल्यास तुमच्या प्रजननक्षमतेला चालना मिळते व गर्भधारणेची शक्यता वाढते.

. गर्भधारणेपूर्वी जीवनसत्व घेतल्यास गर्भाला पोषण मिळते व गर्भात कोणतेही व्यंग तयार होत नाही.

तणाव कमी करण्यासाठी वेळ द्या

स्त्री आणि पुरुष दोघांच्याही प्रजनन क्षमतेशी मानसिक स्वास्थ्य अतिशय जोडले गेलेले आहे.ताण , नैराश्य, भीती आणि इतर मानसिक परिस्थिती बीजफलन प्रक्रियेवर व मासिक पाळीवर थेट परिणाम करते.

ध्यान, योग आणि कॉगनिटीव्ह बिहेव्हीरियल थेरपी ई. मुळे आपले मानसिक स्वास्थ्य उत्तम राहण्यास मदत होते.

योग्य विश्रांती आणि पुरेशी झोप या गोष्टी ताण कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात.

रात्रीच्या वेळी काम केल्याने महिलांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो व गरोदर राहण्याच्या शक्यता कमी होतात त्यामुळे रात्रीच्या वेळी काम करणे टाळा.

कॅफिन चे प्रमाण कमी ठेवा

एफडीए च्या संशोधनानुसार निरोगी माणसाने दिवसभरात 400 एमजी पेक्षा कमी प्रमाणात कॅफिन चे सेवन केल्यास त्याच्या शरीराला कोणताही धोका नसतो. तरीही कॅफिनचे सेवन आणि महिलांची प्रजनन क्षमता यांचा जवळचा संबंध आहे.

दिवसभरात 1-2 कप कॉफी पिणे महिलांसाठी योग्य असते.

पर्यावरणातील अपायकारक गोष्टींपासून लांब रहा

माणसाच्या दैनंदिन व्यवहारातील गरजेच्या गोष्टी म्हणजे पाणी,हवा, अन्न यामधील प्रदूषणाने प्रजननक्षमतेवर अनेक प्रकारे परिणाम होतो. या प्रकारच्या प्रदूषणाचा सामना करणाऱ्या स्त्रियांमध्ये फलना संबंधीचे आजार, एंडोक्राईन कार्यावर होणारे परिणाम ई. आजार दिसून येतात.

यांपैकी काही प्रदूषणे तर आपल्या दैनंदिन आयुष्यातील उत्पादनात जसे की घरातील स्वच्छता सामग्री, सौंदर्य प्रसाधने ई. मध्ये आढळतात. याकरता सेंद्रिय किंवा तुलनेने कमी त्रासदायक ठरणारी उत्पादने वापरा.

प्रजनन क्षमतेवर परिणाम करणाऱ्या केमिकल्स पासून लांब रहा.

वर दिलेल्या युक्त्या वापरुन प्रजनन क्षमता सुधारण्यास मदत होऊ शकते. परंतु, तुम्हाला गर्भधारणा होत नसल्यास तुमच्या मध्ये काही वंध्यत्व समस्या असू शकतात. तुमची गर्भधारणेची शक्यता वाढवण्याच्या दृष्टीने तुमच्या वंध्यत्व तज्ञाचा सल्ला घ्या.

Write a Comment