Blog
Uncategorized

दुसऱ्या बाळाची वाट पाहताय? – दुसऱ्या वेळेचे वंध्यत्व ही त्याचे एक कारण असू शकते!

दुसऱ्या बाळाची वाट पाहताय? – दुसऱ्या वेळेचे वंध्यत्व ही त्याचे एक कारण असू शकते!

वंध्यत्व ही अशी समस्या आहे जी तुमच्या पहिल्या बाळाच्या जन्माने नाहीशी होत नाही. होय, तुम्ही दुसऱ्या बाळासाठी प्रयत्न करत असताना देखील तुम्हाला ही समस्या भेडसावू शकते. असे होऊ शकते याबाबत कित्येक जण अनभिज्ञ असतात. परंतु, अनेक जोडपी आपल्या वयाच्या तिशीत बाळासाठी प्रयत्न करू लागतात आणि मग वंध्यत्वाच्या अडचणीमुळे त्यांच्या मनासारखे कुटुंब तयार करण्यात अपयशी ठरतात. ही परिस्थिती भावनिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक असते. आधीचे मूल  असल्याने जोडपे या विषयावर मोकळेपणाने बोलत नाहीत आणि कोणीही त्यांचे सहानुभूतीपूर्वक ऐकूनही घेत नाही.    

दुसऱ्या वेळेच्या वंध्यत्वाची कारणे कोणती? 

काम आणि इतर जबाबदाऱ्यांमुळे पहिल्या बाळाच्या आगमनाची वेळ जवळजवळ २९ किंवा ३० वर्षांपर्यंत वाढली आहे. त्यामुळे दुसऱ्या बाळाचा विचार करून त्यासाठीचे प्रयत्न ३४- ३५ व्या वर्षी होतात. तोपर्यंत महिलांची प्रजननक्षमता कमी होत जात असते. वाढते वय व बदलत्या  जीवनशैलीमुळे पुरुषांमधील शुक्रजंतू देखील घटत असतात.   

एंडोमेट्रीओसीस, गर्भनलिका बंद होणे, पाळी अनियमित असणे, गर्भाशयात गाठी असणे, लैंगिक संबंधातून लागण होणारे आजार असणे, पहिल्या बाळाची प्रसूती सी- सेक्शनद्वारे होणे , संपूर्ण माहिती न मिळालेले वंध्यत्व ई. दुसऱ्या वेळच्या वंध्यत्वाची महत्वाची कारणे आहेत.   

दोन गर्भधारणांच्या दरम्यान स्त्रियांचे वय वाढते, स्त्रियांना पीसीओएस चा त्रास होऊ शकतो किंवा व्यायामाच्या आभावामुळे स्त्रिया – पुरुष दोघांनाही मधुमेह असल्याचे निष्पन्न झाल्यास गर्भधारणा होताना अडथळे येतात. धूम्रपानाच्या सवयीनमुळे स्त्री- पुरुष दोघांनाही वंध्यत्व होऊ शकते.  

आधी मूल असलेल्या जोडप्याला पुन्हा गर्भधारणा होण्यात विलंब होत असल्यास त्यांना नैराश्य येते. पहिले मूल झाल्यानंतर वर्षभराने गर्भधारणा होण्यास अडथळे येत असलेल्या ३५ वर्षांखालील स्त्रियांनी आणि ६ महीने प्रयत्न करूनही गर्भधारणा न झालेल्या ३५ वर्षावरील स्त्रियांनी अजिबात वेळ न दवडता वंध्यत्व तज्ञाचा सल्ला घ्यायला हवा.   

दुसऱ्यांदा आलेल्या वंध्यत्वावर मात कशी करावी?  

दुसऱ्यांदा आलेले वंध्यत्व आपल्या वयानुसार व आरोग्याच्या स्थितीनुसार  औषधे, शस्त्रक्रिया किंवा आययूआय, आयव्हीएफ ई. प्रजननाला सहाय्यकारी ठरणारी तंत्रे वापरुन दूर करता येते.  

दुसऱ्या वेळी आलेले वंध्यत्व अनेक जोडप्यांमध्ये अनेक प्रयत्न करूनही आपल्या पाल्याला भावंड न देता येण्याच्या जाणीवेने प्रचंड नैराश्य निर्माण करते. अशा जोडप्यांनी जीवनशैलीमध्ये काही बदल केल्यास त्यांच्या आयुष्यात साकारात्मक बदल घडून येतात आणि त्यांच्या मनात असलेले संपूर्ण कुटुंबाचे चित्र पूर्ण होण्यास मदत होते.  

जेव्हा जोडपी त्यांच्या पहिल्याच गर्भधारणेला उशीर करतात तेव्हा दुसऱ्या गर्भधारणेला देखील तितकाच उशीर होतो. अनेक जोडपी त्यांच्या दुसऱ्या बाळाचे स्वप्न पूर्ण करू शकलेली नाहीत. जोडप्यांनी आपल्या कोषातून बाहेर येऊन  दुसऱ्या वेळेला आलेल्या वंध्यत्वाकरता वंध्यत्व तज्ञांचा सल्ला घ्यावा.

Write a Comment

BOOK A FREE CONSULTATION