एन्डोमेट्रीयोसिस विषयी तुम्हाला हे माहित असायला हवे
अनेक महिलांना मासिक पाळीची समस्या भेडसावत असते. परंतु पाळीचे अनियमित चक्र, अतिरिक्त रक्तस्त्राव किंवा गंभीर वेदना ही वंध्यत्वाची कारणे असू शकतात. एन्डोमेट्रीयोसिस ही महिलांच्या शरीरात आढळणारी एक अशी समस्या आहे जिचे निदान लवकर होत नसले तरीही ती स्त्रियांच्या प्रजनन क्षमतेवर मोठा परिणाम करू शकते. चला, एन्डोमेट्रीयोसिसविषयी विस्ताराने जाणून घेऊया.
एन्डोमेट्रीयोसिस म्हणजे काय?
एन्डोमेट्रीयोसिस विषयी जाणून घेण्या आगोदर आपण मासिक पाळीचे चक्र समजून घेऊया आणि महिलांना मासिक पाळीचे चक्र व्यवस्थितपणे समजलेले असणे आवश्यक आहे. गर्भाशयाच्या आतील आवरणाला एन्डोमेट्रीयम म्हणतात. हे आवरण दर महिन्याला परिपक्व गर्भ धारण करण्यास तयार असते. परंतु, गर्भधारणा न झाल्यास एन्डोमेट्रीयलं आवरण प्रत्येक महिन्याला मासिक पाळीच्या स्वरूपात बाहेर फेकले जाते. त्यातूनच रक्तस्त्राव होतो. जेव्हा एन्डोमेट्रीयम गर्भाशयाच्या बाहेर म्हणजेच गर्भनलिका, अंडाशय,योनि इत्यादी ठिकाणी फलित होतो तेव्हा त्याला एन्डोमेट्रीयोसिस असे म्हणतात. याहीवेळी गर्भाशयातील आवरण बाहेर फेकले जाते परंतु, रक्तस्त्राव न होऊ शकल्याने त्या ठिकाणी दाह जाणवू लागतो. परिणामी, त्या आवरणावर ओरखडा तयार होऊन तेथे जखम होते.
एन्डोमेट्रीयोसिसची लक्षणे कोणती?
- ओटीपोटात गंभीर वेदना व कंबरदुखी
- वेदनादायक मासिक पाळी (डायस्मेनोरेहा)
- गर्भधारणा होण्यात अडचणी (वंध्यत्व)
- शारीरिक संभोगाच्या वेळी वेदना (डायस्पेरोनिया)
- मासिक पाळीच्या वेळी गंभीर वेदना
- पाळीच्या वेळी लघवीतून रक्तस्त्राव होताना वेदना/ मलविसर्जनाच्या वेळी वेदना (डायशेझिया)
एन्डोमेट्रीयोसिसचे निदान
- अल्ट्रासाऊंड
- अतिशय मुळाशी झालेल्या एन्डोमेट्रीयोसिसच्या निदानासाठी क्वचित एमआरआय स्कॅन करावे लागते.
- लॅप्रोस्कोपी आणि बायोप्सी- एन्डोमेट्रीयोटिक जखमेची लॅप्रोस्कोपी आणि बायोप्सी करणे हा एन्डोमेट्रीयोसिसच्या उपचारांमधला अतिशय महत्वाचा भाग आहे. एन्डोमेट्रीयमची नमुना ऊती (लॅप्रोस्कोपी दरम्यान) सूक्ष्मनिरीक्षकाखाली बघितली जाते. त्यातून रुग्णाला एन्डोमेट्रीयोसिस आहे किंवा नाही याची तज्ञाला खात्री करता येते.
एन्डोमेट्रीयोसिसवरील उपचार
- रुग्णामध्ये असलेल्या बीजांडांच्या संख्येनुसार प्राधान्याने आययुआय व आयव्हीएफ हे उपचार केले जातात.
- जर रुग्णाचे कुटुंब पूर्ण झाले असेल तर वेदना/ इतर लक्षणांपासून सुटका करून घेण्यासाठी कुटुंबनियोजनाच्या गोळ्या, हार्मोनवरचे उपचार किंवा शस्त्रक्रियेचा पर्याय स्वीकारता येतो.
हार्मोन थेरपी
हार्मोन थेरपीद्वारे गर्भधारणेला आळा घालता येतो. त्यामुळे एन्डोमेट्रीयमची वाढ रोखता येऊ शकते.
-
शस्त्रक्रिया:
लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेद्वारे आजाराला कारणीभूत ठरणाऱ्या ऊती काढून टाकता येतात. काही रुग्णांच्या बाबतीत हिस्टेरेक्टोमी करून गर्भाशय आणि अंडाशय काढून टाकावे लागते.
जीवनशैलीत बदल करून एन्डोमेट्रीयोसिसचे व्यवस्थापन
आरोग्यदायी अन्न सेवन करा.
फळे,भाज्या आणि ओमेगा-३ या तेलयुक्त पदार्थ सेवन केल्याने एन्डोमेट्रीयोसिसचा धोका कमी होतो. दारू, कॅफिन आणि कर्बोदके यांचे सेवन टाळावे.
व्यायाम
नियमित व्यायाम केल्याने एन्डोमेट्रीयोसिस दूर ठेवता येतो. त्याचबरोबर, योगा आणि प्राणायाम केल्याने तुमच्या ताणतणावाचे व्यवस्थापन होते आणि तुम्हाला एन्डोमेट्रीयोसिसवर मात करता येते.जेव्हा तुम्हाला मासिक पाळीची समस्या भेडसावत असते तेव्हा तेव्हा वंध्यत्व तज्ञांचा सल्ला जरूर घ्या. लवकर झालेले निदान आणि उपचार तुमच्या वंध्यत्वाच्या समस्येवर नक्की मार्ग काढू शकतात आणि तुम्हाला तुमचे आई-बाबा होण्याचे स्वप्न पूर्ण करता येऊ शकते.
fill up the form to get a
Free Consultation
Avail 0% interest on EMI
All Procedures | No Upper Limit
How we reviewed this article:
- Current Version
- August 26, 2022 by Oasis Fertility
- November 23, 2021 by Oasis Fertility