वंध्यत्व- ‘निदान’ बोलूया!
“बऱ्याचदा काय चुकलं हे शोधण्यापेक्षा, आपण मात्र कोणाचं चुकलं हे शोधत राहतो ! “ समस्येचं निराकरण करण्यापेक्षा त्या भोवती आपण भावनिकरीत्या गुंतून राहतो. वंध्यत्व ही अशीच एक समस्या! लग्न झाल्यानंतर सर्व काही ठीक सुरु असतं. दिवस आनंदात जात असतात, परंतु काही महिने किंवा वर्ष गेल्यानंतरही ‘दिवस जात नाही‘ म्हणून विचारणा होऊ लागते. सुरुवातीला हे दडपण कमी राहतं त्यामुळे सल्ला घेतला जात नाही. नंतर हीच गोष्ट वारंवार सांगितली जाते. प्रत्येक येणाऱ्या पाळीला दडपण वाढत जातं. पति – पत्नीचं नातं देखील पणास लागू शकतं! सासू सासऱ्यांच्या अपेक्षा, समाजाच्या अपेक्षा, या सर्वांमुळे दडपण हे नैराश्यात बदलू शकतं. काही वेळा काही घरांमध्ये समस्या अधिक …