Blog
Uncategorized

महिलांची प्रजननक्षमता सुधारण्यासाठी प्रजननावश्यक आहार

महिलांची प्रजननक्षमता सुधारण्यासाठी प्रजननावश्यक आहार

Author: S. Flora Amritha, Dietician

महिलांमधील वंध्यत्व आव्हानात्मक परिस्थिती निर्माण करते. आता वंध्यत्वावरील उपचारांत कितीही आधुनिकीकरण झाले असले तरीही पारंपारिक पद्धतीने झालेली छोटीशी मदत देखील प्रजननाशी निगडित तांत्रिक उपचारांसाठी पूरक ठरू शकते. महिलांची प्रजननक्षमता वाढवण्यासाठी आवश्यक आवश्यक आहार घेतल्यास वंध्यत्व निवारणास मदत होऊ शकते. “प्रजननावश्यक आहार” हा सध्याचा नवीन ट्रेंड आहे. त्याविषयी अधिक माहिती घेण्याआधी आपण आहार आणि प्रजननक्षमता यांच्यातील सहसंबंध आणि प्रजननक्षमता वाढवन्यात आहाराचे महत्व समजुन घेउया.

आहार आणि प्रजननक्षमता यांच्यातील सहसंबंध:

आहार आणि प्रजननक्षमता यांच्यातील परस्परसंबंध दाखवणारे अनेक अभ्यास झाले आहेत.

गेली अनेक वर्षे महिलांची प्रजननक्षमता सुधारण्यासाठी आहारात बदल केले जातात. आहार आणि प्रजननक्षमता हे एकमेकांशी निगडित असले तरीही आहारातील बदल वंध्यत्वावर उपचार करत नाहीत आणि असे केल्याने एका रात्रीत परिणाम दिसत नाहीत.

गर्भधारणा होण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या महिलांच्या जेवणात खालील जीवनसत्वांचा अंतर्भाव केल्यास त्यांच्या प्रजननक्षमतेवर सकारात्मक परिणाम दिसून येतात असे म्हटले जाते.

– फ़ॉलिक असिड

– जीवनसत्व B12

– ओमेगा-3 फैटी असिड्स

हे आहारातील बदल तुमच्या सहचरामध्ये देखील केले जातात आणि तुम्हा दोघांची जीवनशैली आरोग्यदायी असेल याकडे लक्ष दिले जाते.

प्रजननावश्यक आहार म्हणजे काय?

प्रजननावश्यक आहार म्हणजे काही सर्वोत्तम आहार नाही. हां महिलांची प्रजननक्षमता सुधारण्यासाठी आवश्यक आहार असल्याने त्यामध्ये ठराविक जीवनसत्वे, तंतुमय पदार्थ, कर्बोद्के आणि आरोग्यदायी फैट्स यांचा समावेश असतो. हां आहार महिलेला गर्भधारणा होण्याची शक्यता वाढवतो व तिच्या गर्भारपणाचा प्रवास सुखकर होतो.

तुमचा प्रजननावश्यक आहार आशा प्रकारे ठरवू शकता

– जास्तीत जास्त आरोग्यदायी फैट्स असावेत (उदा. तूप, अवोकाडो इत्यादी) प्रक्रिया केलेले फैट्स वर्ज्य करावे(उदा. चीज)

– तुमच्या ताटात जास्तीत जास्त भाज्या, फले, आणि वनस्पतीजन्य प्रोटीन (वाटाणा, शेंगदाणे इत्यादी) असावे. लाल मांसाचे सेवन मर्यादित असावे.

– कार्बोदके वाईट नसतात. जास्तीत जास्त फायबर आणि कमीत कमी ग्लायसेमिक इंडेक्स (धान्य) असलेले अन्न खावे. प्रक्रिया केलेले किंवा थेट कार्बोदके घेणे टालावे.

– शाकाहारी पदार्थातील लोह सेवन करावे उदा. दाणे, दाली, टोफू, हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये, बिया, शेंगदाने आणि कमी फैट्स असलेले डेअरीतील पदार्थ (सायविरहित दूध आणि दही)

– आपल्या दररोजच्या दिनचर्येत फ़ॉलिक असिड आणि इतर औषधे घ्यावीत.

प्रजननावश्यक आहार घेण्याचा उपयोग होतो का?

प्रजननक्षमता सुधारणारे अन्नपदार्थ तुमची प्रजननक्षमता वाढवतात आणि वजन आटोक्यात ठेवून तुमच्या प्रजननक्षमता व गर्भधारणेवर नकारात्मक परिणाम करणारे घटक दूर ठेवतात.

प्रजननावश्यक आहार गर्भधारणेपुर्वी शरीराला आवश्यक जीवनसत्वे योग्य प्रमाणात पुरवतात.

 

Fertility Boosting Foods

 

महिलांची प्रजननक्षमता वाढवणारे पदार्थ कोणते?

महिलांची प्रजननक्षमता वाढवणारे पदार्थ म्हणजेच भाज्या, फले आणि कडधान्ये खाली दिली आहेत.

अंडी

अंडी हे महिलांची प्रजननक्षमता वाढवणारा पदार्थ आहे. त्यामध्ये प्रोटीन, जीवनसत्व B12, (फ़ॉलिक असिड), ई जीवनसत्व, झिंक आणि कॉलिन याने गर्भातील दोष दूर होउन वाढ उत्तम होते.

बदाम

बदामात ओमेगा-३ फैटी असिड भरपूर प्रमाणात असते त्याने गर्भधारणा होण्यास मदत होते.

बेरीज

बेरीज मध्ये अंटी ओक्सिदंट्स आणि अंटी इन्फ्लामेट्री गुणधर्म असल्याने त्यामध्ये फोलेट आणि क जीवनसत्व भरपूर असते.

अवोकाडो

अवोकाडो मधे क जीवनसत्व , डाएट्री फायबर, फोलिक असिड आणि आरोग्यदायी फैट्स असतात त्यांना मोनोसच्युरेटेड फैट्स म्हणतात. त्यांच्या सहाय्याने गर्भधारणेचे पाहिले काही दिवस नीट पार पडतात. त्यामध्ये पोटेशियम देखील भरपूर असते आणि त्याने जीवनसत्वे शोषून घेण्याची शरीराची क्षमता वाढते आणि रक्तदाब आटोक्यात राहतो.

डेअरीचे पदार्थ

डेअरी पदार्थात प्रोटीन, अ, इ आणि ड जीवनसत्वे असल्याने गर्भधारनेशी निगडित वन्ध्यत्व कमी करण्यास मदत होते.

बीन्स आणि डाली

बीन्स आणि डाली यांच्यामध्ये स्पर्मीडाइन नावाचे फोलेट असते ज्यामुले गर्भधारणा व वाढ योग्य पद्धतीने होते. फोलेट मुले गर्भरोपण आणि सकारात्मक गरोदरपणा अनुभवण्यास मिळतो.

निष्कर्ष

प्रजननावश्यक आहार ही संकल्पना आता बरीच लोकप्रिय आहे आणि अनेक महिला आहार तद्न्याच्या मदतीने आपल्या आहारात काही मुलभुत बदल करतात. तुमच्या गर्भधारनेच्या प्रवासात आरोग्यपूर्ण खाण्याचे पर्याय आणि बदल सुचवणारे मार्गदर्शक म्हणून प्रजननावश्यक आहार काम करतो. गर्भधारण होण्यास प्रोत्साहन देणारा आहार घेण्याबरोबरच असे काही पदार्थ आहेत जे तुम्हाला आहारातून काढून टाकावे लागतील. तुमच्या प्रजननावश्यक आहाराशी निगडित काही शंका किंवा प्रश्न असल्यास तुमच्या वन्ध्यत्व तद्न्याशी किंवा आहार तज्ञाशी आजच संपर्क साधा

 

Write a Comment

BOOK A FREE CONSULTATION