Age and Pregnancy

वयाच्या पस्तीशीनंतर गर्भवती होणे – माहीती आणि अपेक्षा

वयाच्या पस्तीशीनंतर गर्भवती होणे – माहीती आणि अपेक्षा

Author: Dr. Meera Jindal, Consultant – Fertility specialist

पालकत्वाचा प्रवास आनंददायी असतो अर्थात त्यातही काही अडचणी येऊ शकतात. अनेक जोडपी विविध कारणांमुळे उशीरा वयात मुले जन्माला घालणे पसंत करतात. सहाय्यक पुनरुत्पादक तंत्रज्ञानामुळे, हा निर्णय घेणे सोपे झाले आहे आणि अतिविचार न करता कोणीही आपले ध्येय आणि प्राधान्यक्रमांचा पाठपुरावा करू शकतो.

तथापि, “मानक प्रजनन वय” नसलेल्या वयात गर्भवती होण्यात अनेक आव्हाने आहेत.

वयाचा परिणाम प्रजननक्षमतेवर होतो ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. आणि वयानुसार स्त्रीची प्रजनन क्षमता कमी होते. वयाच्या तिशीत असलेल्या महिलेला गर्भधारणा होण्यास थोडा जास्त वेळ लागू शकतो परंतु हे अशक्य नाही.

म्हणून जिज्ञासू मनाच्या समाधानासाठी… होय!! 35 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांना गर्भधारणेची चांगली शक्यता असते परंतु संबंधित जोखीम असते.

वयाच्या पस्तीशीनंतर गर्भधारणा होण्यात येणाऱ्या अडचणी

  • ओव्ह्यूलेशन कमी होणे
  • स्त्रीबीजाची गुणवत्ता आणि प्रमाण कमी होणे
  • शस्त्रक्रिया किंवा संसर्गामुळे फॅलोपियन ट्यूब किंवा गर्भाशय ग्रीवामध्ये मेदयुक्त ऊती तयार होणे
  • फायब्रॉइड्स किंवा गर्भाशयाचे विकार
  • एंडोमेट्रिओसिस
  • मधुमेह किंवा उच्च रक्तदाब यासारख्या परिस्थिती

काय करावं?

बहुतेक प्रकरणांमध्ये, 35 वर्षांपेक्षा जास्त वयाची आणि मूलभूत प्रजनन समस्या नसलेली निरोगी महिला नैसर्गिकरित्या गर्भवती होऊ शकते आणि निरोगी बाळ होऊ शकते.

परंतु जर एखादं जोडपं नैसर्गिकरित्या गर्भधारणा करण्यास असमर्थ असेल तर ते खालील वैकल्पिक प्रजनन उपचारांकडे पाहू शकतात :

  • आययूआय (अंतर्गर्भाशयी गर्भाधान): चांगल्या प्रतीचे शुक्राणू निवडले जातात आणि गर्भ रुजण्यात मदत करण्यासाठी गर्भाशयात सोडले जातात.
  • आयव्हीएफ (इन विट्रो फर्टिलायझेशन): प्रयोगशाळेत शुक्राणूंद्वारे अंडे फलित केले जाते जेणेकरून गर्भ तयार होईल जो स्त्रीच्या गर्भाशयात रोपण केला जाईल किंवा नंतर उपयोगात आणण्यासाठी गोठवून जतन केला जाऊ शकतो.
  • तसेच, स्त्रीबीज गोठवण्याचा पर्याय असतो.

जोखीम

प्रत्येक गरोदरपण अद्वितीय असते. 20 आणि 30 वर्षं वयाच्या स्त्रीयांच्या तुलनेत तिशीनंतरच्या स्त्रियांना त्यांच्या गर्भधारणेमध्ये गुंतागुंत होण्याची शक्यता असते. काही जोखमी खालील प्रमाणे आहेत:

  • गर्भस्त्राव
  • जन्मदोष
  • गरोदरपणात उच्च रक्तदाब आणि मधुमेह होऊ शकतो
  • दिवस पूर्ण भरण्याआधी जन्म किंवा जन्मत: कमी वजन
  • नाळेच्या समस्या

उत्तम प्रकारे घेतलेल्या प्रसूतीपूर्व काळजीने हे धोके योग्य पद्धतीने हाताळले जाऊन टाळले जाऊ शकतात. जन्मपूर्व स्क्रीनिंग चाचण्यांची निवड करू शकता आणि त्यात समाविष्ट असलेल्या जोखमींबद्दल (असल्यास) माहिती ठेवू शकता.

प्रजनन क्षमता सुधारण्याचे मार्ग:

गर्भधारणेची शक्यता वाढवण्यासाठी आपल्या जीवनशैलीत काही बदल करण्याने आपल्या शरीराला गर्भधारणेसाठी तयार करणे ही प्रक्रिया सोपी करण्यास मदत होऊ शकते.

लक्षात ठेवण्यासारख्या काही गोष्टी आहेत:

  • मासिक पाळीची लांबी समजून घेऊन, प्रजनन काळ आणि ओव्ह्यूलेशनचा मागोवा घेऊन आणि नियमित व असुरक्षित संभोग केल्यास गर्भधारणा होण्याची चांगली संधी मिळू शकते.
  • आपल्या नियमित वैद्यकीय चाचण्या करणे.
  • धूम्रपान आणि अल्कोहोल सेवन बंद करून, कॅफिन मर्यादित करणे, पुरेशी झोप घेणे आणि निरोगी संतुलित आहार घेणे यासारख्या निरोगी जीवनशैलीतील बदलांची निवड करणे.
  • योग्य व्यायाम करणे आणि निरोगी वजन ठेवणे .
  • तणाव कमी करण्यासाठी वेळ काढणे. गरोदरपणाचे नियोजन करताना मानसिक आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे.
  • आपल्याला कोणत्याही जन्मपूर्व जीवनसत्त्वांची आवश्यकता असल्यास आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  • प्रजननसमस्या असल्यास आपल्या प्रजनन तज्ञाचा सल्ला घ्या आणि गर्भधारणा होण्यात अडचण येणाऱ्या जोडप्यांना मदत करण्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध प्रजनन उपचारांबद्दल जाणून घ्या.
 थोडक्यात: 

गर्भधारणा हा एक रोमांचक प्रवास आहे आणि वयाच्या 35 व्या वर्षी गर्भधारणेचे नियोजन करणे आव्हानात्मक वाटू शकते. सामाजिक धारणा आणि वयाशी संबंधित आरोग्याच्या समस्यांमुळे केवळ तणावात भर पडते. जोखीम समजून घेणे आणि संपूर्ण प्रवास कसा करावा याबद्दल माहिती असणे गोष्टी यथार्थ ठेवण्यास मदत करते.

गर्भधारणा होण्यात अडचण येणाऱ्या जोडप्यांनासाठी आशेचा किरण आहे, कारण पालकत्वाचे स्वप्न पूर्ण करण्यात मदत करण्यासाठी बरेच उपयुक्त प्रजनन उपचार पर्याय आणि संशोधन-समर्थित पुनरुत्पादक तंत्रज्ञान उपलब्ध आहे.

Was this article helpful?
YesNo

fill up the form to get a

Free Consultation

Your data is 100% safe with us.

Avail 0% interest on EMI
All Procedures | No Upper Limit

How we reviewed this article:

HISTORY
  • Current Version
  • September 21, 2023 by Oasis Fertility

LatestTrending

Ad

BOOK A FREE CONSULTATION

Book

Appointment

Call Us

1800-3001-1000