Blog
Enquire Now
Uncategorized

उच्च AMH पातळीसह गर्भवती होणे शक्य आहे का?

उच्च AMH पातळीसह गर्भवती होणे शक्य आहे का?

Author: Dr. V Ramya, Consultant & Fertility Specialist

गर्भधारणेचा विचार करत असताना, गर्भधारणेमध्ये प्रजननक्षमतेचा काळ,ओव्हरीजची (अंडाशयाची) स्थिती, स्त्रीबीज आणि शुक्राणूंचे आरोग्य आणि संप्रेरक यासारख्या विविध घटकांची भूमिका असते. असाच एक महत्त्वाचा संप्रेरक म्हणजे AMH किंवा Anti-Müllerian Hormone होय.

प्रथमत: AMH म्हणजे काय?

हे MIS – Mullerian Inhibiting Substance या नावानेही ओळखले जाते, हे गर्भावस्थेत असतानाच नर आणि मादी जननेंद्रियाच्या विकासासाठी आवश्यक संप्रेरक आहे.

पुरुषांद्वारे अंडकोषांमध्ये AMH तयार केले जाते. पुरुषांच्या बाबतीत त्याचे क्लिनिकल महत्त्व नाही.

स्त्रियांमध्ये, AMH ओव्हरीयन फॉलिकल्स मध्ये तयार होते. ह्यामुळे ओव्हरीयन फॉलिकल्सची वाढ आणि ते परिपक्व होण्यास मदत होते.

AMH चाचणीचा उपयोग

1.जरी AMH पातळी मोजणे हे स्त्रीयांचे प्रजनन आरोग्य समस्या प्रकार -जसे की PCOD सारख्या समस्येवर प्रकाश टाकू शकते, AMH मूलत: ओव्हरीयन राखीव (रिझर्व) मोजण्यासाठी बायोमार्कर म्हणून कार्यरत आहे. हे ओव्हरीजमधे शिल्लक असलेल्या स्त्रीबीज संख्येचा अंदाज घेण्यासाठी वापरले जाते.

2.स्त्रीया जर स्त्रीबीज गोठवण्याचा विचार करत असतील तर AMH चाचणी त्यांना निर्णय घेण्यास मदत करते.

3.किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळी अभावाचे (अमेनोरिया) निदान AMH पातळीचे निरीक्षण करून केले जाऊ शकते.

4.हे IVF आणि IUI सारख्या प्रजनन उपचारांच्या परिणामाचा अंदाज लावण्यास देखील ही चाचणी मदत करते.

5.रजोनिवृत्तीची सुरुवात झाल्याचा अंदाज करता येतो.

सामान्य AMH पातळी काय असते ?

AMH पातळीचे मूल्यांकन स्त्रीच्या वयोगटाच्या आधारे केले जाते.

पौगंडावस्थेमध्ये, AMH पातळी वाढू लागते आणि वयाच्या 25 व्या वर्षी शिखर गाठते. वाढत्या वयाबरोबर प्रत्येक स्त्रीमध्ये AMH पातळी नैसर्गिकरित्या कमी होते. म्हणून AMH ची कमी पातळी स्त्रीबीजाचा कमी साठा दर्शवते किंवा त्याउलट.

मानक पातळी परिवर्तनीय आहेत. AMH स्तरासाठी खालील सामान्य श्रेणी आहेत.

1.सरासरी: 1.0 ng/mL ते 4.0 ng/mL (अंदाजे).

2.कमी: 1.0 ng/mL पेक्षा कमी

3.अत्यंत कमी: 0.4 ng/mL पेक्षा कमी

वयोगटानुसार AMH पातळी:

प्रत्येक संबंधित वयोगटासाठी अंदाजे किमान स्तर खालील प्रमाणे आहेत.

1.25 वर्षे: 3.0 ng/mL.

2.30 वर्षे: 2.5 ng/mL.

3.35 वर्षे: 1.5 ng/mL.

4.40 वर्षे: 1 ng/mL.

5.45 वर्षे: 0.5 ng/mL.

AMH पातळी आणि गर्भधारणा:

AMH पातळी गर्भधारणेच्या शक्यतांवर परिणाम करते. 25 – 30 वर्षे वयोगटातील आणि 2.5 ng/mL ते 3.5 ng/mL AMH रीडिंग असलेल्या कोणत्याही स्त्रीला वयाने मोठ्या असलेल्या आणि कमी AMH पातळी असलेल्या स्त्रियांपेक्षा गर्भधारणा होण्याची अधिक शक्यता असते.

उच्च AMH चांगली गोष्ट आहे का?

जरी, उच्च AMH पातळी चांगल्या ओव्हरीयन रिझर्व आणि मोठ्या संख्येने स्त्रीबिजाच्या उपस्थितीशी संबंधित असली तरी, हे स्त्रीबीजाचा दर्जा मात्र दर्शवत नाही जो गर्भधारणेमध्ये आणि प्रजनन उपचारांच्या परिणामामध्ये भूमिका बजावणारा एक महत्त्वाचा घटक आहे. स्त्रीबिजाच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी AMH पातळी वापरली जाऊ शकत नाही.

AMH पातळी वाढल्याने गर्भधारणेची चांगली शक्यता असतेच असे नाही.

4.0 ng/mL वरील कोणतीही AMH पातळी असामान्यपणे जास्त आहे आणि ही चिंतेची बाब आहे.

असामान्यपणे उच्च AMH पातळी पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) दर्शवतो म्हणजे अशी संप्रेरक स्थिती असते ज्यामध्ये ओव्हरीमध्ये द्रव भरलेल्या पिशव्या असतात ज्यामुळे AMH चे उच्च उत्पादन सुरू होते.

स्त्रीबीज गोठण्याच्या बाबतीत, उच्च AMH पातळी तुम्हाला ओव्हरी हायपरस्टिम्युलेशन सिंड्रोम (OHSS) विकसित होण्याची शक्यता बळावू शकते.

उच्च AMH पातळी देखील स्त्री प्रजनन प्रणालीच्या विशिष्ट कर्करोगाचे वैशिष्ट्य आहे जसे की गर्भाशयाचा कर्करोग आणि ग्रॅन्युलोसा सेल ट्यूमर.

थोडक्यात पण महत्वाचे :

केवळ AMH पातळी तुमची प्रजनन स्थिती ठरवत नाही. इतर संबंधित प्रजननक्षम घटक जसे की गर्भाशयाची स्थिती, नलिका आरोग्य, शुक्राणूजन्य घटक आणि अंतर्निहित वैद्यकीय परिस्थिती गर्भधारणेमध्ये महत्वपूर्ण योगदान देतात.

आशेचा किरण हा आहे की गर्भधारणेच्या कमी शक्यता असतानाही, कमी स्त्रीबीज संख्या असताना किंवा AMH च्या कमी पातळीसह एखादी स्त्री गर्भवती होऊ शकते.

Write a Comment