Ovarian Cancer

बीजकोशाच्या कर्करोगावरील उपचार – प्रजनन समस्या आणि जतन: भविष्याचा वेध

बीजकोशाच्या कर्करोगावरील उपचार – प्रजनन समस्या आणि जतन: भविष्याचा वेध

Author: Dr. D Maheshwari, Consultant & Fertility Specialist

गर्भाशयाचा कर्करोग हा महिलांमध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा कर्करोग आहे. हा बीजकोश, फॅलोपियन ट्यूब आणि पेरिटोनियममध्ये उद्भवतो. बीजकोशाच्या कर्करोगाचे सौम्य (कर्करोगाचा प्रादुर्भाव नसलेला- नॉन-मॅलिग्नंट), बॉर्डरलाइन (कर्करोगाच्या प्रादुर्भावाची कमी संभाव्यता) किंवा घातक (कर्करोगाचा प्रादुर्भाव) असे वर्गीकरण केले जाऊ शकते.

कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास असलेल्या स्त्रियांमध्ये गर्भाशयाचा कर्करोग टाळण्याचा कोणताही मार्ग नाही. याव्यतिरिक्त, अनुवांशिक इतिहास नसलेल्या वृद्ध आणि रजोनिवृत्तीच्या स्त्रियांना गर्भाशयाचा कर्करोग होण्याचा धोका देखील जास्त असतो.

कर्करोगाचे निदान होणे हीच उद्ध्वस्त करणारी घटना आहे तसेच संपूर्ण आरोग्यावर त्याचा परिणाम होत असल्याने त्या संबंधित उपचार देखील अत्यंत आव्हानात्मक आहेत. कर्करोग-ग्रस्त महिलांमध्ये या उपचारांमुळे प्रजननक्षमतेच्या समस्या उद्भवतात. कर्करोगाच्या उपचारांमुळे स्त्री प्रजननक्षमतेवर कायमस्वरूपी किंवा तात्पुरता परिणाम होतो.

कर्करोगाच्या उपचारांमुळे होणारी प्रजनन समस्या

हे जाणून घेणे महत्वाचे आहे की बीजकोशाच्या कर्करोगाच्या उपचारांमुळे बीजकोष आणि इतर प्रजननक्षम अवयवांचे कार्य बिघडते.

बीजकोशाच्या कर्करोगाच्या सामान्य उपचारांमध्ये रेडिएशन थेरपी, केमोथेरपी आणि शस्त्रक्रियेने बीजकोश काढून टाकणे याचा समावेश होतो.

केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपीसाठी वापरले जाणारे तीव्र स्वरूपाचे वैद्यकीय एजंट आणि रेडिएशन बीजकोशाचे नुकसान करतात. बीजकोशात अपरिपक्व बीज वा भ्रूण असतात आणि ते प्रत्येक महिन्याच्या ओव्हल्युशनच्या काळात परिपक्व अंडी शुक्राणूंद्वारे फलित होण्यासाठी बाहेर येतात. बीजकोशाच्या संदर्भातील कोणतीही हानी हे बीज नष्ट करू शकते ज्यामुळे वंध्यत्व आणि लवकर रजोनिवृत्ती होते.

काही स्त्रियांमध्ये कर्करोगाच्या उपचारांमुळे लवकर रजोनिवृत्ती होते, बिजकोशाच्या विशिष्ट कार्याच्या समाप्तीमुळे येणारे कायमचे वंध्यत्व येऊ शकते. केमोथेरपी घेतलेल्या काही स्त्रियांमध्ये, जरी उपचारानंतर मासिक पाळी थोड्या उशिरा परत येऊ शकते, तरीही त्यांची प्रजनन क्षमता कमी होऊ शकते.

तरुण स्त्रियांमध्ये रेडिएशन थेरपीमुळे रजोनिवृत्ती लवकर होते.

प्रजनन संवर्धन

उपचार सुरू करण्यापूर्वी आपल्या कर्करोग-विशेषज्ञाशी आपल्या प्रजननक्षमतेवर होणाऱ्या उपचारांच्या जोखीम आणि परिणामाबद्दल बोला. आपल्या प्रजनन संरक्षण पर्यायांबद्दल जाणून घेण्यासाठी प्रजनन-तज्ञाचा सल्ला घ्या.

प्रजनन संरक्षण पर्याय बऱ्याच घटकांवर अवलंबून असतात जसे की:

  • वय
  • कर्करोगाचा प्रकार आणि अवस्था
  • ओव्हरियन रिजर्व
  • संपूर्ण प्रक्रियेचा खर्च

बीज आणि भ्रूण गोठविणे: प्रजनन क्षमता टिकवून ठेवण्यासाठी हा एक प्रमाणभूत दृष्टीकोन आहे. स्त्रियांमध्ये बीज उत्पादन हार्मोनल इंजेक्शनद्वारे उत्तेजित केले जाते आणि परिपक्व बीज गोळा केली जातात आणि भविष्यातील वापरासाठी संरक्षित केली जातात. विवाहित स्त्रियांमध्ये, नियंत्रित प्रयोगशाळेच्या परिस्थितीत असे संकलीत केलेले बीज शुक्राणूंसह फलित केले जातात आणि भ्रूण तयार केले जाते. भविष्यात भ्रूण हस्तांतरणासाठी वापरण्यासाठी क्रायोप्रिजर्व केले जाते.

शस्त्रक्रियने काढून टाकणे: काही प्रकरणांत कर्करोगाचे निदान त्याच्या सुरुवातीच्या अवस्थेत होते आणि केवळ एका बीजकोशावर परिणाम झाला असेल, तर केवळ प्रादुर्भाव झालेले बीजाशय शस्त्रक्रियेने काढून टाकण्याचा पर्याय आहे. हे इतर निरोगी अंडाशयाचे जतन करून कायमचे वंध्यत्व टाळण्यास मदत करते.

बीजकोशाच्या ऊतींचे संरक्षण: कर्करोगाच्या उपचारानंतर परत प्रत्यारोपित करण्यासाठी एक भाग किंवा संपूर्ण अंडाशय शस्त्रक्रियेद्वारे काढून गोठवले जाते.

ही प्रक्रिया प्री-प्युबर्टल मुलींसाठी आणि बीजकोष उद्दीपन होऊ न शकणाऱ्या स्त्रियांसाठी खूप फायदेशीर आहे.

निष्कर्ष

गर्भाशयाचा कर्करोग किंवा कोणत्याही कर्करोगाचे निदान होणे हा एक तणावपूर्ण आणि भीतीदायक अनुभव असू शकतो. आणि आपल्या प्रजननक्षमतेबद्दल निर्णय घेणे, विशेषत: जर आपल्याला अद्याप मुले होण्याबद्दल खात्री नसेल तर ही घोर चिंताजनक परिस्थिती असू शकते. आपले मन शांत ठेवण्यासाठी, कर्करोगातून बचावलेल्यांना पालकत्वाची संधी आहे, जर त्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर! प्रजनन तज्ञ आपल्यासाठी योग्य असलेल्या पर्याय व योग्य ती निवड करण्यात आपली मदत करू शकतात.

Was this article helpful?
YesNo

fill up the form to get a

Free Consultation

Your data is 100% safe with us.

Avail 0% interest on EMI
All Procedures | No Upper Limit

How we reviewed this article:

HISTORY
  • Current Version
  • September 25, 2023 by Oasis Fertility

LatestTrending

Ad

BOOK A FREE CONSULTATION

Book

Appointment

Call Us

1800-3001-1000