Blog
Enquire Now
Uncategorized

गर्भारपण पुनर्नियोजन- बीजांडे जतन करून गर्भधारणा करणे (सामाजिक जतन)

गर्भारपण पुनर्नियोजन- बीजांडे जतन करून गर्भधारणा करणे (सामाजिक जतन)

Author: Dr. V Ramya, Consultant & Fertility Specialist

सध्याच्या काळात अनेक जोडपी करिअर आणि स्वतःच्या उत्कर्षासाठी अधिक प्रयत्नशील असल्याने गर्भधारणा होण्यास विलंब होत आहे. विशेषतः करिअर करू इच्छिणाऱ्या महिलांमध्ये स्त्रीबीजे जतन करून ठेवण्याचे प्रमाण दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत आहे. स्त्रीबीज जतन करून ठेवण्यासंदर्भात असलेल्या गैरसमज व आख्यायिका यांमुळे अनेक महिला स्त्रीबीज जतन करून ठेवण्याच्या भानगडीत पडत नाहीत. त्यासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.

सर्वप्रथम स्त्रीबीज जतन करणे म्हणजे काय?

वैद्यकीय भाषेत याला स्त्रीबीज क्रायो प्रिझर्व्हेशन असे म्हणतात.स्त्रियांची प्रजनन क्षमता जतन करून ठेवण्यासाठी ही प्रक्रिया केली जाते.

काही हार्मोनल इंजेक्शन्स देऊन गर्भाशय उत्तेजित केले जाते व त्यातून अनेक परिपक्व स्त्रीबीजे काढून घेतली जातात. ही परिपक्व स्त्रीबीजे नंतर वापरण्यासाठी जतन केली जात

स्त्रीबीजे जतन करून ठेवण्याची कारणे

स्त्रीबीजांचे जतन याविषया संदर्भात अनेक घटकांची महत्वाची भूमिका असते. त्यांपैकी काही घटक खालीलप्रमाणे

– करिअर आणि शैक्षणिक नियोजन

– लिंफोमा, स्तन व अन्य प्रकारचे कर्करोगावरील उपचार

– वैयक्तीक समस्या जसे की जोडीदार गमावणे किंवा जोडीदारामध्ये वंध्यत्व असणे

– काही कौटुंबिक अनुवांशिक कारणे ज्यांचा गर्भधारणा क्षमतेवर परिणाम होतो

– संसर्ग, अवयव निकामी होणे, आणि आरोग्याच्या इतर समस्

 

 

स्त्रीबीजे जतन करण्याचे योग्य वय

वयोमानानुसार स्त्रियांची बीजसंख्या कमी होत जाते आणि बीजांची गुणवत्ता व संख्या देखील वयावर अवलंबून असते हे आपल्याला माहीत आहेच.25-30 या वयोमानात स्त्रियांची गर्भधारणा क्षमता सर्वोच्च असते.

35-40 या वयात ही संख्या हळूहळू कमी होऊ लागते त्यामुळे वयाच्या 20 वर्षांनंतर व 30 वर्षाआधी स्त्रीबीजे जतन करून ठेवणे उत्तम.

40 वर्षांनंतर देखील तुमची स्त्रीबीजे जतन करता येऊ शकतात परंतु 35 वर्षांनंतर तुमची स्त्रीबीजे कमी होऊ लागतात. त्यामुळे त्यानंतर जतन करता येण्याजोग्या स्त्रीबीजांची संख्या अगदीच कमी असते. ज्या स्त्रियांना 40 वयानंतर गर्भधारणा हवी आहे त्यांना ही प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी स्त्रीबीज दात्यांकडून स्त्रीबीजे घेण्याचा सल्ला दिला जातो.

जतन करून ठेवलेल्या स्त्रीबीजांचे आयुष्य

जतन करून ठेवलेली स्त्रीबीजे आयुष्यभर वापरता येऊ शकतात. तरीही लोक ही स्त्रीबीजे जतन करून ठेवल्यापासून 10 वर्षातच वापरतात. कोणताही पुरावा नसला तरीही अशी स्त्रीबीजे 10 वर्षांपेक्षा अधिक काळ तशीच ठेवल्यास त्यांची गुणवत्ता ढासळते. जतन केलेली स्त्रीबीजे वापरात आली नाहीत तर टाकून देता येतात किंवा दान करता येतात.

निष्कर्ष:

अनेक कारणास्तव गर्भधारणेच्या प्रक्रियेस विलंब करणाऱ्या स्त्रियांसाठी स्त्रीबीजे जतन करणे हा एक आशेचा किरण आहे. त्याचबरोबर, ज्यांना स्त्रीबीजे जतन करायची आहेत त्यांनी त्यांचा वापर लवकरात लवकर करावा. जतन करण्यासाठी स्त्रीबीजांची निश्चित अशी संख्या नाही. यशस्वी गर्भधारणा करण्यासाठी शक्य तितकी स्त्रीबीजे जतन करावीत. परंतु, जतन करण्यासाठी उपलब्ध स्त्रीबाजांची संख्या गर्भाशयातील स्त्रीबीजे, वय आणि स्त्रियांच्या इतर वैद्यकीय स्थितीवर अवलंबून असते.

Write a Comment