Blog
Uncategorized

पीसीओएस ने वंध्यत्व येते का?

पीसीओएस ने वंध्यत्व येते का?

अनेक तरुण स्त्रियांची मासिक पाळी त्यांच्याशी लपंडाव खेळत असते. व्यायामाचा अभाव, कमी किंवा अनियमित झोप, बाहेरचे व खूप प्रक्रिया केलेले अन्न सेवन करणे अशा अनेक कारणांमुळे मासिक पालीचे चक्र अनियमित होत असते. अनेक जणींना मासिक पाळी अनियमित असणे, स्थूल असलेल्या व नसलेल्या स्त्रियांच्या हार्मोनल असमतोलाचे प्रमाण आदिक असणे अशा समस्या भेडसावत असतात. तुम्हीही या समस्यांना तोंड देत असाल तर पीसीओएस (पॉलीसिस्टिक ओव्हारीयन सिंड्रोम ) हे त्यांचे कारण असू शकते. आजच्या काळात पीसीओएस ही स्त्रियांसाठीची सामान्य समस्या होऊन बसली आहे त्यामुळे स्त्रियांमध्ये वंध्यत्वाचे प्रमाण देखील वाढत आहे. घाबरू नका. जीवनशैलीतील बदल, औषधे व वंध्यत्वावरचे अत्याधुनिक उपचार यांद्वारे या समस्येवर तोडगा काढता येतो.

पीसीओएस म्हणजे काय ?

जेव्हा तुमची मासिक पाळी अनियमित असते आणि तुमचे अंडाशय काही हार्मोन्स जास्त प्रमाणात उत्सर्जित करू लागते व तुमच्या अंडाशयांमध्ये अनेक स्त्राव असलेल्या पिशव्या निर्माण होत असतात तेव्हा तुम्हाला पीसीओएस असते असे म्हणतात.

लक्षणे:

  1. अनियमित मासिक पाळी किंवा प्रमाणाबाहेर रक्तस्त्राव
  2. स्थूलपणा
  3. नको असलेल्या ठिकाणी केसांची लव वाढणे
  4. अंडाशयांमध्ये गाठी असणे
  5. टक्कल पडणे
  6. वंध्यत्व

पीसीओएस चे निदान :

तुम्ही आई होण्याच्या वाटेवर असाल तर पीसीओएस ची समस्या तुमच्यासाठी अतिशय घातक ठरू शकते. परंतु तुमच्या ठायी असलेली पीसीओएस ची लक्षणे खोडून काढून तुम्हाला आई होण्यासाठी मदत करण्यासाठी अनेक मार्ग आहेत.

a.ओटीपोटाची तपासणी :

डॉक्टर स्वत:च्या डोळ्याने तुमचा योनीमार्ग व गर्भाशय ग्रीवा त्यातील असलेल्या एखाद्या संसर्गाची तपासणी करण्यासाठी तपासतील. व गर्भाशयाचा आकार जाणून घेण्यासाठी दोन्ही बाजूने तपासणी करुन एखादी विकृती असल्यास तपासतील.

b.ओटीपोटाचे अल्ट्रासाऊंड:

अंडाशयामध्ये असलेल्या गाठी आणि गर्भाशयाचा आकार व एन्डोमेट्रियल लाईनिंगची जाडी तपासण्यासाठी योनीची आतून तपासणी केली जाते. त्याचबरोबर गर्भाशयामध्ये काही विकृती किंवा फायब्रॉईडस इत्यादी गोष्टी तपासल्या जातात.

c.रक्त तपासण्या :

एफएसएच, एलएच, एएमएच, टेस्टेरॉन इत्यादी हार्मोन्सच्या पातळया तपासण्यासाठी रक्ताच्या तपासण्या केल्या जातात. त्याचबरोबर, या तपासण्यांद्वारे इन्शुलिन प्रतिरोध, कॉलेस्ट्रॉल, थायरॉईड आणि प्रोलॅक्टीनच्या पातळ्या देखील तपासल्या जातात.

पीसीओएस वरचे उपचार:

i.जीवनशैलीतील बदल:

स्थूलपणा हे पीसीओएस असण्याचे एक महत्वाचे कारण आहे. समतोल आहार, बाहेरचे पदार्थ टाळणे, नियमित व्यायाम या त्रिसूत्रीचा अवलंब केल्याने वजन कमी होऊन पीसीओएस पासून सुटका करवून घेता येते. वजनामध्ये ५-१० % घट झाल्यास मासिक पाळी  नियमितपणे येऊ लागते. त्यामुळे प्रजनन क्षमता वाढते आणि मधुमेह अथवा हृदयाशी संबंधित इतर आजारांचा धोका कमी करता येतो.

ii.वैद्यकीय उपचार :

गर्भधारणेस सहाय्य करणारी औषधे व आययूआय, आयव्हीएफ यांसारख्या उपचारांनी पीसीओएस ग्रस्त महिलांना त्यावर मात करून मूले होण्यास मदत करतात.

पीसीओएस सोबत येणारी गुंतागुंत:

i.मधुमेह:

पीसीओएस असलेल्या महिलांना गर्भावस्थेत असताना मधुमेह होतो. त्यांची रक्त व शर्करा पातळी सतत तपासत राहावी लागते. त्यावर उपचार न केल्यास नेहमीपेक्षा आकाराने मोठे अर्भक, कालपूर्व प्रसूती,आणि सिझेरियनचा धोका वाढतो.

ii.गर्भपात:

पीसीओएस ने गर्भपात होण्याचा धोका वाढतो. गर्भपाताचे नेमके कारण समजू शकले नसले तरीही हार्मोन्स चे असंतुलन व स्थूलपणा ही गर्भपाताची कारणे असू शकतात.

iii. प्री– एकलेम्पशिया:

उच्च रक्तदाब म्हणजेप्री– एकलेम्पशिया झाल्यास त्याचा गर्भाच्या पोषणावर परिणाम होतो आणि त्यामुळे कमी वजनाचे अर्भक जन्माला येते. 

पीसीओएस ग्रस्त महिलांनी योग्य आहार, औषधोपचार आणि जीवनशैलीतील बदल केल्यास त्यांना गर्भधारणा होण्यास मदत होईल. सर्व पीसीओएस ग्रस्त महिलांना आयव्हीएफ किंवा तत्सम आधुनिक उपचार घ्यावे लागत नाहीत. आई होण्याआधी सर्व महिलांना आपल्या मासिक पाळीच्या चक्राविषयी संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे.

Write a Comment

BOOK A FREE CONSULTATION