Blog
Enquire Now
Case Study

एन्डोमेट्रीयल रीसेप्टीव्हीटी अॅरे (इआरए) च्या सहाय्याने गर्भधारणेच्या शक्यता वाढतात.

२३ वर्षांची राखी आणि ३३ वर्षीय पुरुष तुषार यांच्या लग्नाला ५ वर्षे झाली होती. लग्नाला ३ वर्षे पूर्ण झाल्यापासूनच ते दोघे कुटुंबनियोजन करत होते, परंतु त्यांना यश मिळत नव्हते. गर्भधारणेसाठी केलेल्या प्राथमिक चाचण्यांमध्ये तुषारचे शुक्राणू योग्य असले तरीही राखीच्या अंडाशयातील दोन्हीकडच्या स्त्रीबीजांची घटती संख्या आणि मासिकपाळी अनियमित असल्याचे आढळून आले.

राखीच्या हिस्टेरोस्कोपी व लॅप्रोस्कोपी ह्या दोन्ही शस्त्रक्रिया झाल्या होत्या. ज्यामध्ये तिच्या दोन्ही अंडाशयाच्या गर्भनलिका बंद असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे त्या गर्भनलिकांना छेद दिला होता. गेल्या काही वर्षांमध्ये त्यांचे 2 आयव्हीएफ उपचार अयशस्वी झाले होते. वारंवार अपयश येऊनही या जोडप्याने आशा न सोडता पुण्यातील ओएसिस फर्टीलिटी सेंटरला भेट दिली. त्यांच्या काही नियमित चाचण्या करण्यात आल्या ज्यामध्ये तुषारचा डीएफआय सामान्य म्हणजेच १५% असल्याची खात्री झाली.(ज्यामुळे शुक्राणूंची संख्या आणि त्यांचा होणारा क्षय लक्षात येतो)

मागच्या वेळी अयशस्वी झालेले आयव्हीएफ उपचार आणि अंडाशयातील स्त्रीबीजांची घटती संख्या लक्षात घेता अंडाशयातील बीजांड रोपणाच्या चक्राचे नियोजन करण्यात आले आणि दोन दिवसात ५ विकसित गर्भांचे रोपण करण्यात आले, परंतु ते देखील अयशस्वी ठरले.

चांगल्या प्रतीचा गर्भ वापरून देखील जेव्हा गर्भ राहण्यास ३ पेक्षा अधिक वेळा अपयश येते तेव्हा त्याला वारंवार अपयशी ठरलेले गर्भरोपण असे म्हणतात. अशा वेळी संपूर्ण शरीराच्या काही चाचण्या केल्या जातात. यामध्ये सामान्यत: रक्ताच्या गुठळ्यांची चाचणी व जनुकीय चाचणी केली जाते कारण, या गोष्टी गर्भरोपणास अडथळे निर्माण करतात. असे असले तरीही वंध्यत्वाचा सामना करणाऱ्या प्रत्येक रुग्णाच्या बाबतीत हीच कारणे लागू होत नाहीत. गर्भधारणा होण्यासाठी गर्भाशयाची एक ठराविक अवस्था आवश्यक असते. गर्भरोपण अयशस्वी ठरल्यास गर्भाशयाच्या देखील काही चाचण्या कराव्या लागतात.

एन्डोमेट्रीयल रीसेप्टीव्हीटी अॅरे (इआरए) या चाचणीद्वारे या चाचण्या केल्या जातात. या चाचणीद्वारे (गर्भाशयाच्या आवरणाचा) प्रतिसाद मिळवण्यासाठी कार्य करणाऱ्या 200 जनुकांची चाचणी केली जाते. या चाचणीद्वारे एन्डोमेट्रीयम (गर्भाशयाचे आवरण) प्रतिसादात्मक आहे किंवा नाही हे समजते व स्त्रीच्या गर्भरोपणाच्या खिडकीचा अंदाज घेता येतो. बीजांडाच्या रोपणासाठीचा आदर्श दिवस जाणून घेणे हे ईआरए चे ध्येय नसून गर्भरोपण अयशस्वी होण्याचे प्रमाण कमी करणे हे या चाचणीचे उद्दिष्ट आहे.

ईआरए चाचणी कशी केली जाते?
गर्भाशयाच्या आवरणाकडे दुर्बिणीतून पाहून ही चाचणी केली जाते. आयव्हीएफ चक्रादरम्यान एन्डोमेट्रीयम(गर्भाशयाचे आवरण) कार्यरत ठेवण्यामध्ये प्रोजेस्टेरॉन या संप्रेरकाचा मोठा सहभाग असतो. व प्रोजेस्टेरॉन कार्यरत झाल्यानंतर पाच दिवसांनी गर्भरोपण करण्यात येते.

प्रायोगिक चक्रामध्ये ईआरए केली जाते आणि बायोप्सी केल्यानंतर गर्भाला प्रतिसाद देणाऱ्या जनुकांची छाननी केली जाते. व एन्डोमेट्रीयम(गर्भाशयाचे आवरण) “प्रतिसादात्मक” आहे किंवा “अप्रतिसादात्मक” आहे हे ईआरए चाचणी ठरवते.

प्रतिसादात्मक – भविष्यात गर्भरोपण याच वेळेला केले जाऊ शकते.

अप्रतिसादात्मक –स्त्रीच्याएन्डोमेट्रीयमची(गर्भाशयाचे आवरण) जागा बदलली आहे व प्रोजेस्टोरॉन च्या स्त्रावाच्या वेळेमध्ये बदल झाल्यानंतर गर्भरोपण करण्यात यावे हे दर्शविते.

एकदा गर्भरोपणाची खिडकी निश्चित झाली की त्याच महिन्यात गर्भरोपणाचे नियोजन केले जाऊ शकते.

गर्भरोपण वारंवार अयशस्वी झाल्यानंतर ईआरए पद्धतीने गर्भधारणा झालेल्या स्त्रियांचे प्रमाण ७०% हून अधिक असू शकते असे संशोधनाद्वारे सिद्ध झाले आहे.

राखीच्या बाबतीत तिचे एन्डोमेट्रीयम(गर्भाशयाचे आवरण) जागेवरून हलले होते. त्यामुळे वैयक्तिक गर्भरोपण करून प्रोजेस्टोरॉनच्या बदलांवर लक्ष केंद्रित केले. यामध्ये ईआरए च्या निकालानुसार दोन परिपक्व गर्भांचे रोपण करण्यात आले. हे गर्भरोपण यशस्वी होऊन तिला गर्भधारणा झाली व तिची मातृत्वाची स्वप्ने पूर्ण झाली.

Write a Comment