Blog
Uncategorized

वंध्यत्व: कारणे, प्रकार

वंध्यत्व: कारणे, प्रकार

वंध्यत्व किंवा गर्भधारणा होण्यास अक्षमता नवरा बायको पैकी एकामध्ये किंवा दोघांमध्ये देखील कोणत्याही कारणाने असू शकते. दोघांचीही व्यवस्थित तपासणी केल्यानंतर वंध्यत्व तज्ञ वंध्यत्वाचे नेमके कारण व त्यावरील उपचार ठरवू शकतो.

महिलांमधील वंध्यत्वाची कारणे:

  • गर्भधारणा होण्याशी संबंधित आजार
  • गर्भनालिकेतील दोष
  • गर्भाशयाशी निगडित समस्या
  • थायरॉईड किंवा प्रोलॅकटीन असे एंडोक्राइन संबंधित आजार
  • एंडोमेट्रीओसिस आणि एडिनोमायोसिस
  • स्थूलता

a. गर्भधारणा होण्याशी संबंधित आजार:

महिलांच्या प्रजनन हार्मोन्समध्ये झालेले कोणतेही असंतुलन गर्भधारणेशी संबंधित आजार होण्यास कारणीभूत ठरते. गर्भधारणेशी संबंधित काही आजार खालीलप्रमाणे:

  • पीसीओएस: पीसीओएस / पोलीसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम या आजारामध्ये एंड्रोजेन्स(पुरुष हार्मोन्स) च्या वाढलेल्या पातळ्या गर्भधारणा होण्यास अडचणी निर्माण करतात.हे महिलांमधील वंध्यत्वाच्या सर्वसामान्य कारणांपैकी एक आहे.महिलांमध्ये दिसणार्या अनियमित मासिक पाळी,पुरळ,अंगावरील केसांची जास्त वाढ, वजनवाढ ई. अशा काही लक्षणांवरून त्यांच्यातील वंध्यत्वाचा अंदाज येतो.
  • प्राथमिक बीजांडाची कमतरता/अपरिपक्व बीजांडाची घसरण: काही महिलांमध्ये अनेक कारणाने ४० वर्षांआधीच दोन्ही अंडाशये बंद पडतात.
  • जनुकीय कारणे: टर्नर सिंड्रोम, थिजलेला एक्स सिंड्रोम इत्यादी जनुकीय आजारांनी अपरिपक्व अंडी गळून पडतात.

b. गर्भंनलिकेतील दोष:

गर्भनलिका हां स्त्रियांच्या प्रजनन व्यवस्थेतील असा भाग आहे ज्यामुळे स्त्रीबीज व पुरुषबीजाचा संयोग होऊन गर्भधारणा होते. परंतु गर्भनलिकेमध्ये असे अनेक दोष असतात ज्याने एखाद्या स्त्रीच्या प्रजननक्षमतेला समस्या निर्माण होते. त्यांपैकी काही कारणे अशी:

  • गर्भनलिका अस्तित्वात नसणे (ट्यूबल अप्लाशिया)
  • क्षयरोगा सारखे संसर्ग
  • लैंगिक आजारांमुळे जननांगाला येणारी सूज आणि त्यामुळे होणारे आजार
  • जननांग किंवा पोटाची आधी झालेली शस्त्रक्रिया
  • अपेंडीसायटिस
  • हायड्रोसालपिनक्स(गर्भनलिकेत जमा होणारे द्रव)

c. गर्भाशयातील समस्या:

  • गाठी
  • गर्भाशयाचा विचित्र आकार
  • एंडोमेट्रीयल पॅथोलॉजी बारीक एंडोमेट्रीयम, पॉलिप्स

d. एंडोमेट्रीओसिस आणि एडिनोमायोसिस:

एंडोमेट्रीयम (गर्भाशयाचे अस्तर) गर्भाशयाच्या बाहेर म्हणजे ओटीपोट/पोट या ठिकाणी अस्ताव्यस्त वाढणे म्हणजे एंडोमेट्रीओसिस. यामुळे पाळीच्या दरम्यान अधिक रक्तस्त्राव होन व प्रचंड वेदना होणे, गर्भाशयातील अंडी कमी झाल्याने गर्भधारणा न होणे, अस्तर गर्भाशयाला चिकटून राहाणे इत्यादी, अशा अवस्थेला एंडोमेट्रिओसिस असे म्हणतात.

एडिनोमायसिसने एंडोमेट्रीयल कार्यावर आणि गर्भधारण क्षमतेवर परिणाम होतो व गर्भधारणा होण्याची शक्यता व क्षमता मंदावते.

वरील कारणांमुळे गर्भधारणा होत नाही.

महिलांमधील वंध्यत्वाचे निदान:

  • शारीरिक तपासणी
  • अल्ट्रासाउंड
  • अंडयांच्या संख्येसह इतर हार्मोन्सच्या चाचण्या
  • हिस्ट्रेरोसालपिंगोग्राफी
  • हिस्टेरोस्कोपी
  • लॅप्रोस्कोपी
  • जनुकीय चाचण्या

महिलांच्या वंध्यत्वावर उपचार:

  • गर्भधारणा होत नसल्यास स्त्रीबीजांचे प्रेरण
  • गर्भाशयाचे दोष नाहीसे करण्यासाठी, गर्भंनलिका निर्दोष करण्यासाठी, गर्भाशयातील गाठी किंवा एंडोमेतट्रीयल पोलिप अशा समस्यांवर लॅप्रोस्कोपिक/ हिस्टेरोस्कोपिक शस्त्रक्रिया करावी लागते.
  • आवश्यकतेनुसार IUI, IVF या प्रजनन तंत्रज्ञानाने महिलांना गर्भधारणा होऊ शकते.

पुरुषांमधील वंध्यत्व:

पुरुषांमधील वंध्यत्वाची अनेक कारणे आहेत:

  • शुक्राणु निर्मितीमध्ये अडचणी: शुक्राणु निर्मितीसाठी पुरुष प्रजनन व्यवस्थेची योग्य वाढ व रचना होणे आवश्यक असते. शुक्राणु निर्मितीमध्ये निर्माण झालेल्या समस्यांमुळे वंध्यत्व निर्माण होते.
  • शुक्राणु वहनामध्ये दोष: शस्त्रक्रिया, जन्मजात आजार व संसर्ग यांमुळे शुक्राचे वहन करणार्या नलिका बंद असतात.
  • शुक्राणुंच्या हालचालींमध्ये अडचणी: शुक्राणु विचित्र पद्धतीने हालचाल करत असतील तर ते अंड्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत.
  • संसर्ग: लैंगिक आजारांमुळे शुक्राणुची निर्मिती व शुक्राणुच्या हालचाली यांमध्ये अडचणी येऊ शकतात.
  • ताठरतेमध्ये अडचणी: मधुमेह, मुत्राशयाच्या शस्त्रक्रिया, औषधे यांमुळे लिंग ताठरतेच्या अडचणी निर्माण होतात.
  • कर्करोग: कर्करोग आणि केमोथेरपी, रेडिएशन यांसारख्या उपचारांमुळे लिबिडो व शुक्राणुंच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. त्याने वंध्यत्व येते.
  • जनुकीय दोष: सिस्टिक फायब्रोसिस, क्लाइनफेल्टर्स सिंड्रोम व अन्य जनुकीय आजारांनी शुक्राणुंच्या निर्मिती व वहनावर परिणाम होतो.
  • शुक्राणुविरोधी प्रतिकारके: काही रोगप्रतिकारक पेशींनी शुक्राणुवर हल्ला केल्याने शुक्राणुंना इजा होते.
  • अनावश्यक अंडकोष: काही पुरुषांच्या बाबतीत काही अंडी जन्माच्या आधीच लोप पावतात.त्यामुळे वंध्यत्व येते.
  • वेरीकोसेले: (अंडकोष असलेली पिशवी)मध्ये असलेल्या शिरा अस्ताव्यस्त ताणल्या जातात त्याला वेरीकोसेले असे म्हणतात. यामुळे शुक्रानुंच्या निर्मिती व हालचालींवर परिणाम होतो.
  • केमिकल्स/एक्स- रे: जंतुनाशके, जीवजंतु आणि उष्णतेमुळे शुक्रानुची संख्या कमी होते.
  • धूम्रपान: धूम्रपान करणार्या पुरुषांच्या शुक्राणुची निर्मिती हालचाल व गुणवत्ता कमी असते.
  • स्थूलता: स्थुलतेमुळे हार्मोन्सचे संतुलन बिघडते आणि प्रजननक्षमतेवर परिणाम होतो.

पुरुषांच्या वंध्यत्वाची कारणे:

  • बहुतेकवेळा अलाक्षणिक
  • लैंगिक इछेमध्ये बदल
  • लहान अंडकोष
  • अंडकोष वेदना/ सूज

पुरुष वंध्यत्वाचे निदान:

पुरुषांच्या वंध्यत्वाची चिकित्सा करण्यासाठी खालील चाचण्या केल्या जातात:

  • शारीरिक तपासण्या
  • वीर्य चिकित्सा
  • अल्ट्रासाउंड- चौकट, पारदर्शक
  • हार्मोन चाचण्या
  • जनुकीय चाचण्या

पुरुष वंध्यत्वावर उपचार:

  • हायपोगोनाडोट्रोपिक हायपोगोनाडिझम, शुक्राणुची संख्या व हालचाल कमी होणे व हार्मोन्स कमी होणे, एंटीऑक्सीडंट्स इत्यादी बाबतीतल्या वैद्यकीय व्यवस्था.
  • IUI, IVF / ICSI या आधुनिक उपचारांनी पुरुषांना पिता होण्याचे स्वप्न पूर्ण करता येते.
  • TESA, मायक्रो- TESE आणि MACS, मायक्रोफ्लूइडिक्स सारख्या शुक्राणु जतन करण्याची तंत्रे वापरल्याने प्रजननक्षमता सुधारते.

वंध्यत्वाचे प्रकार:

  • प्राथमिक वंध्यत्व – जेव्हा जोडप्याला एका वर्षाने देखील गर्भधारणा होत नाही तेव्हा त्याला प्राथमिक वंध्यत्व म्हणतात.
  • द्वितीय वंध्यत्व – पहिल्या वेळेला यशस्वी गर्भधारणा झाल्यावरदेखील) जेव्हा दुसर्या वेळी गर्भधारणा होण्यास जोडप्याला अडचणी येतात तेव्हा त्याला द्वितीयक वंध्यत्व म्हणतात.

वयानुसार प्रजनन क्षमता कमी होते. आणि पुरुष व् स्त्रियांमध्ये वंध्य्त्वा\चे लवकर निदान झाल्यास त्यांचे पालकत्वाचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. गर्भधारनेसाठी प्रयत्न करणार्या जोडप्याने योग्य आहार, नियमित व्यायाम करावा, धुम्रपान आणि मद्यपान बंद करावे. व योग्य प्रमाणात झोप घ्यावी त्याने गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते.

Write a Comment

BOOK A FREE CONSULTATION