Blog
Uncategorized

गर्भनलिका बंद असणे (स्त्रीबीजवाहक नलिकेत अडथळा असणे) आणि वंध्यत्व याबद्दल आपल्याला खालील बाबी माहित असणे आवश्यक आहे.

गर्भनलिका बंद असणे (स्त्रीबीजवाहक नलिकेत अडथळा असणे) आणि वंध्यत्व याबद्दल आपल्याला खालील बाबी माहित असणे आवश्यक आहे.

Author: Dr. Jigna Tamagond ,Consultant – Fertility Specialist

 

वंध्यत्वाचा परिणाम बऱ्याच लोकांवर होतो. ज्ञात आणि अज्ञात कारणांमुळे स्त्री-पुरुषांना वंध्यत्वाचा अनुभव येतो. गर्भनलिकेतील अडथळा हे स्त्री वंध्यत्वाचे एक सार्वत्रिक कारण आहे.

जगभरातील अंदाजे 30% स्त्रियांमध्ये गर्भनलिकेतील अडथळा हे वंध्यत्वाचे कारण आहे.

गर्भनलिका ह्या अंडाशय आणि गर्भाशय यांना जोडणाऱ्या पूल आहेत.

गर्भधारणेच्या प्रक्रियेत ही महत्त्वाची भूमिका बजावते.

ही नलिका स्त्रीबीजाला अंडाशयातून गर्भाशयापर्यंत प्रवास करण्यास अनुमती देते. शुक्राणू या बीजाला भेटण्यासाठी गर्भाशयातून गर्भनालिके द्वारे वरच्या दिशेने प्रवास करतात ज्यामुळे बीजाचे संभाव्य फलन होऊ शकते.

फलित बीज या पुलावरून प्रवास करून गर्भाशयात त्याचे रोपण केले जाते आणि परिणामी गर्भधारणा होते.

प्रजनन क्षमतेवर ट्युबल ब्लॉकेजचा परिणाम:

या नालिकेत अडथळा असल्यास, स्त्रीबीजाचे फलन होत नाही किंवा जरी फलन झाले (अंशतः बंद नालिकेमुळे), तरी गर्भनलिकेतील अडथळ्यामुळे फलित बीजाला गर्भाशयापर्यन्त जाण्यासाठी आवश्यक असणारी हालचाल प्रतिबंधित होते, ज्यामुळे स्थानभ्रष्ट (एक्टोपिक) गर्भधारणा होते.

तथापि, फॅलोपियन ट्यूबपैकी केवळ एका नलिकेत अडथळा असल्यास स्त्रीबीज फलित होणे आणि गर्भधारणा होणे शक्य असते.

अनेक कारणांपैकी, काही घटक खाली दिले आहेत ज्यामुळे नलिकेत अडथळा येतो:

1.संक्रमणामुळे मेदयुक्त ऊतींची (स्कार टिश्यू) उपस्थिती (जसे की पेल्विक इंफ्लेमेटरी रोग आणि एसटीआय)

2.ओटीपोटाची शस्त्रक्रिया झाली असल्यास – अपेंडिक्स काढून टाकण्याची शस्त्रक्रिया, एक्टोपिक गर्भधारणा

3.एंडोमेट्रिओसिस

4.गर्भाशय आणि फॅलोपियन ट्यूबमध्ये जळजळ

5.गर्भाशय आणि फॅलोपियन ट्यूबबाबत जन्मदोष आणि विकृती

6.गर्भाशयातील फायब्रॉइड्स किंवा पॉलीप्स

तुमची गर्भनलिका बंद असल्याची लक्षणे :

गर्भनलिका बंद असणे याबाबतची लक्षणे अडथळ्याच्या मूळ कारणावर अवलंबून असतात.

उदाहरणार्थ, एंडोमेट्रिओसिसच्या बाबतीत, त्या स्त्रीला वेदनादायक पाळीदरम्यान जास्त स्त्राव होऊ शकतो.

हायड्रोसाल्पिंक्सच्या बाबतीत ओटीपोटाच्या एका बाजूला सौम्य ते नियमित वेदना होतात.

काही स्त्रियांना ओटीपोटात अचानकपणे किंवा त्यांच्या पाळी दरम्यान वेदना जाणवू शकतात.

तथापि, निदान झाल्यानंतर, ह्या लक्षणांवर उपचार केले जाऊ शकतात.

निदान:

बंद गर्भनलिका त्यांच्या मूळ कारणांसंबंधित लक्षणांमुळे ओळखणे कठीण आहे. सहसा, जोपर्यंत एखाद्या स्त्रीला गर्भवती होण्यास अडचण येत नाही तोपर्यंत या स्थितीचे निदान केले जात नाही.

बंद झालेल्या फॅलोपियन ट्यूबचे निदान करण्यासाठी सर्वसामान्यपणे वापरल्या जाणाऱ्या चाचण्या:

1.हायड्रोसाल्पिंगोग्राम किंवा एचएसजी ही एक एक्स-रे चाचणी आहे, ज्यामध्ये गर्भनलिकेतील अडथळे शोधण्यासाठी गर्भाशयात एक सुरक्षित नॉन-टॉक्सिक डायचे इंजेक्शन दिले जाते.

2.सोनोहिस्टेरोग्राम, ज्याला सामान्यत: सोनोग्राम म्हणतात, ही एक अल्ट्रासाऊंड चाचणी आहे जी गर्भाशयाची आतील बाजू पाहण्यासाठी वापरली जाते. यात ध्वनी लहरींचा वापर करून संगणक प्रतिमा तयार केली जाते.

3.लेप्रोस्कोपी जी की-होल शस्त्रक्रिया म्हणून देखील ओळखले जाते ज्यामध्ये शरीरात एक छोटासा छेद देऊन त्यात एक अगदी लहान कॅमेरा घातला जातो जो ओटीपोटाच्या आतील बाजूस पाहण्यास मदत करतो.

बंद झालेल्या गर्भ नालिकेसाठी उपचार पर्याय:

नमूद केल्याप्रमाणे, गर्भनलिका अंशतः अवरोधित असल्यास किंवा एक ट्यूब उघडी असली तरीही एखादी स्त्री गर्भवती होऊ शकते. तथापि, अंशतः अवरोधित ट्यूबच्या बाबतीत एक्टोपिक गर्भधारणेचा धोका जास्त असतो.

दोन्ही गर्भ नालिकांमध्ये पूर्णत: अडथळा असल्यास, उपचाराशिवाय गर्भधारणा होण्याची शक्यता खूपच कमी असते.

गर्भनलिका बंद असणे उपचार यावर आधारित आहेत

1.व्यक्तीचे वय

2.विकृतीचा प्रकार / कारण

3.अडथळ्याचे स्थान

पेल्विक संसर्ग निदानाच्या बाबतीत, अँटीबायोटिक्स औषधे लिहून दिले जातात.

जिथे शस्त्रक्रिया आवश्यक आहे अशा परिस्थितीत लॅप्रोस्कोपी वापरली जाते. या पद्धतीचा उद्देश स्त्रीची गर्भधारणा होण्याची शक्यता वाढवण्यासाठी अडथळा काढून टाकणे आणि गर्भनलिका उघडणे हा आहे.

शस्त्रक्रियेनंतर गर्भधारणेची शक्यता यावर अवलंबून असते:

1.वय

2.जोडीदाराच्या शुक्राणूंचे आरोग्य

3.गर्भ नलिकेची अपाय पातळी

शस्त्रक्रियेची शिफारस न केलेल्या प्रकरणांमध्ये किंवा अयशस्वी शस्त्रक्रियेच्या परिणामाच्या बाबतीत, त्या व्यक्तीस इन-विट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) चा सल्ला दिला जातो.

आयव्हीएफमध्ये प्रयोगशाळेच्या नियंत्रित वातावरणात शुक्राणूंसह स्त्रीबीज फलन समाविष्ट आहे. फलित बीज गर्भाशयात हस्तांतरित केले जाते, जे गर्भाशयात रोपण केल्यावर यशस्वी गर्भधारणा होते.

गर्भनलिका बंद असणे च्या बाबतीतही योग्य वेळी योग्य हस्तक्षेप केल्यास बाळ होण्याचे स्वप्न पूर्ण होणे शक्य आहे.

निरोगी आणि सुरक्षित गर्भधारणेची शक्यता समजून घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या योग्य उपचार पर्यायांबद्दल नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

Write a Comment

BOOK A FREE CONSULTATION