Blog
Uncategorized

अनियमित मासिक पाळी आणि गर्भधारणेबद्दल तुम्हाला हे माहित असणे आवश्यक आहे

अनियमित मासिक पाळी आणि गर्भधारणेबद्दल तुम्हाला हे माहित असणे आवश्यक आहे

Author: Dr. Sai Manasa Darla, Consultant, Fertility Specialist & Laparoscopic Surgeon

गर्भधारणा ही एक मानसिक हिंदोळयांचा प्रवास आहे आणि जेव्हा गर्भधारणा होण्यात अडचण येते तेव्हा ती त्रासदायक असू शकते.

या प्रवासाची पहिली पायरी म्हणजे स्त्रीच्या मासिक पाळीविषयी माहिती घेणे . गर्भधारणेचा विचार करत असाल तर मासिक पाळीचे चक्र , प्रजनन काळ आणि ओव्ह्यूलेशन (बीजकोशातून स्त्रीबीज बाहेर येण्याची क्रिया) जाणून घेणे आवश्यक आहे. मासिक पाळीच्या अनियमिततेमुळे गर्भधारणा होण्यात अडचण येऊ शकते.

अनियमित मासिक पाळी म्हणजे काय?

प्रत्येक स्त्रीच्या मासिक पाळीचे चक्र निरनिराळे असते. ‘सामान्य’ मासिक पाळी चक्र 21 ते 35 दिवसांचे असते तसेच पाळी येण्याचा दिवस 2-3 दिवस मागेपुढे होऊ शकतो .

खालील बाबतीत कालावधी अनियमित मानला जातो:

1.‘सामान्य’ श्रेणीच्या पुढे किंवा अलीकडे येणारी पाळी.

2.8 दिवसांपेक्षा जास्त काळ चुकलेली पाळी (काही प्रकरणांमध्ये गर्भधारणा असू शकते).

3.पॉलिमेनोरिया: वारंवार किंवा लवकर येणारी मासिक पाळी असेही संबोधले जाते. हा एक मासिक पाळीचा विकार आहे ज्यामध्ये मासिक पाळीचा कालावधी 21 दिवसांपेक्षा कमी असतो.

4.ऑलिगोमोनोरिया: हयात मासिक पाळी क्वचितच येते. अशा प्रकरणांमध्ये मासिक पाळीचे चक्र 35 दिवसांपेक्षा जास्त असते.

अनियमित मासिक पाळीची कारणे

अनेक घटक अनियमित पाळीस कारणीभूत ठरतात:

1.ओव्ह्यूलेशन समस्या: गर्भधारणेची शक्यता मासिक पाळीच्या दरम्यान परिपक्व अंडी बाहेर येण्याच्या क्रियेवर म्हणजेच ओव्ह्यूलेशनवर अवलंबून असते. अनियमित ओव्ह्यूलेशन किंवा अॅनोव्ह्यूलेशन (ओव्हुलेशन नसणे) यामुळे मासिक पाळी अनियमित होते.

2.पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS): हा एक हार्मोनल विकार आहे ज्यामध्ये शरीर मोठ्या प्रमाणात पुंजन्य संप्रेरक (अँड्रोजेन्स) तयार करते ज्यामुळे अनियमित ओव्ह्यूलेशन, अंडाशयातील सिस्ट्स आणि वंध्यत्व येते.

3.थायरॉईड आजार: एक कमी क्रियाशील किंवा अतिक्रियाशील थायरॉईड ग्रंथी मासिक पाळीच्या वारंवारतेवर आणि नियमिततेवर परिणाम करतात.

4.वजन वाढणे किंवा कमी होणे

5.तणाव आणि चिंता

6.हार्मोनल असंतुलन

7.गर्भनिरोधक गोळ्यांचा अनियमित वापर

8.गर्भाशयातील गाठी ( फायब्रॉइड्स), एंडोमेट्रिओसिस आणि मधुमेह यासारख्या बाबी

9.लैंगिक संक्रमित संक्रमण

अनियमित मासिक पाळी असलेल्या गर्भधारणेचे नियोजन कसे करावे?

असं वाटतं की एखाद्या स्त्रीची अनियमित मासिक पाळी असल्यास ती गर्भवती होऊ शकत नाही. परंतु, घाबरून जाण्याची गरज नाही, अनियमित मासिक पाळीच्या समस्येचे निराकरण आणि त्यावर उपचार केले गेले तर अनियमित मासिक पाळी असलेल्या स्त्रीसाठी गर्भधारणा होणे शक्य आहे.

ओव्ह्यूलेशनचा पाठपुरावा करणे आणि ओव्ह्यूलेशन दरम्यान योग्य वेळी शरीरसंबंध ठेवल्याने गर्भधारणेची शक्यता खूप वाढते. एखादी स्त्री ओव्ह्यूलेशनची लक्षणे ओळखू शकते.

ओव्ह्यूलेशनची लक्षणे

1.गर्भाशयाच्या ग्रीवेच्या श्लेष्मामध्ये (सर्विकल म्युकस) वाढ – चिकट, स्वच्छ आणि अंड्यातील पांढऱ्या भागासारखा स्त्राव

2.तुमच्या शरीराच्या तापमानात वाढ

ओव्ह्यूलेशन प्रेडिक्टर किट, अल्ट्रासाऊंड आणि रक्त तपासणी यांच्या मदतीने ओव्ह्यूलेशन निर्धारित केले जाऊ शकते.

अनियमित ओव्ह्यूलेशन किंवा अॅनोव्ह्यूलेशन बाबतीत, डॉक्टर मूळ कारणांची तपासणी करून योग्य उपचार लिहून देऊ शकतात. अंतर्निहित स्थितीवर उपचार केल्याने गर्भधारणेची शक्यता वाढते.

काही जीवनशैलीतील बदल मासिक पाळी आणि ओव्ह्यूलेशन नियमन करण्यासाठी उपयोगी ठरू शकतात.

खालील परिस्थितीत डॉक्टरांना भेटा:

1.तीन महिन्यांहून अधिक काळ मासिक पाळी न येणे

2.मासिक पाळीत एका आठवड्यापेक्षा जास्त काळ रक्तस्त्राव होणे.

3.जास्त रक्तस्त्राव

4.वेदनादायक पाळी

5.जर तुम्ही 35 वर्षांपेक्षा लहान आहात आणि एक वर्षापेक्षा जास्त काळ प्रयत्न करून देखील गर्भधारणा होऊ शकली नाही.

तळ टीप :

जरी गर्भधारणेच्या प्रवासात अनियमित मासिक पाळी हे कारण असू शकते , तरीही निराश होण्याची गरज नाही. वेळेवर पावले उचलून आणि मूळ समस्या दूर करून निरोगी गर्भधारणा होण्याची संधी मिळू शकते.

विसंगत मासिक पाळी, ओव्ह्यूलेशन समस्या आणि हार्मोनल असंतुलन ज्यामुळे मासिक पाळीत अनियमितता येते, यामुळे गर्भधारणा होणे अवघड होते.

प्रजनन तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास अनियमित मासिक पाळीसाठी कारणीभूत असलेल्या कारणांवर उपचार करून तसेच ओव्ह्यूलेशन नियमन आणि निर्धारण करून तुमची प्रजनन क्षमता सुधारण्यास मदत होऊ शकते.

Write a Comment

BOOK A FREE CONSULTATION