Blog
Uncategorized

जीवनशैली आणि गर्भधारणा

जीवनशैली आणि गर्भधारणा

Author : Dr Akhila Ayyagari, Consultant & Fertility Specialist, Oasis Fertility, Banjara Hills

आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनाने आपल्या खाण्याच्या सवयी, इतर सवयी, झोपण्याच्या वेळा, कामाच्या पद्धती सर्व काही बदलले आहे. पिझ्झा खाण्याची तीव्र इच्छा होणे, उत्साहवर्धक पेये, केक्स, तळलेले पदार्थ, रात्रीच्या कामाच्या वेळा, सौंदर्य प्रसाधनांचा अतिवापर, रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या पार्ट्या हे सर्व आजच्या पिढीच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. परंतु, य रोजच्या सवयीच्या वाटणाऱ्या गोष्टी पुरुष व स्त्रिया दोघांच्याही प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम करत आहेत. हे आजचे धक्कादायक सत्य आहे.

जीवनशैलीने प्रजनन क्षमतेवर कसा परिणाम होतो?

प्रजनन क्षमतेवर परिणाम करणारे मुख्य घटक:

· वाढते वय

· बाहेरच्या पदार्थांचे सेवन

· वजन खुप कमी किंवा खूप जास्त असणे

· झोप (खूप कमी किंवा खूप जास्त)

· कॅफिन

· धुम्रपान

· मद्यपान

· ताण

· व्यावसायिक संधी

· उत्तेजक द्रव्ये

· लिहून दिलेली औषधे

1. वाढते वय

वय हा प्रजनन क्षमतेवर परिणाम करणारा महत्वाचा घटक आहे. शिक्षणासाठी किंवा करियरच्या स्वप्नांच्या मागे धावताना अनेक जोडपी पालक होण्याचा निर्णय पुढे ढकलतात. परंतु, असे करताना एका ठराविक वयानंतर त्यांची प्रजनन क्षमता एका ठराविक उंचीपर्यंत पोहोचते आणि मग ती कमी होऊ लागते याबद्दल ते अनभिज्ञ असतात. पुरुषांमध्ये वयाच्या ३५ वर्षानंतर शुक्राणूंची संख्या घटते, त्यांची हालचाल कमी होते व वीर्याची पातळी देखील कमी होते. वयाच्या ४० शी नंतर ते विचित्र दिसू लागू शकतात तसेच शुक्राणूमधील डीएनए अतिशय कमी होऊ लागतो.

स्त्रियांच्या बाबतीत, ३० वर्षानंतर गर्भधारणेची क्षमता कमी होते. वयानुसार स्त्रियांच्या बीजांडामध्ये निर्माण होणारा गुणसूत्राचा असमतोल गर्भपातास कारणीभूत ठरू शकतो, किंवा त्यामुळे गर्भारपणात इतर

समस्या निर्माण होऊ शकतात आणि अपत्याला वंशपरंपरागत समस्या होऊ शकतात. ३० वर्षाच्या आतील महिलेला गर्भधारणा होण्याची शक्यता ७१% असल्यास ३६ वर्षानंतर ती ४१% इतकीच राहते. एखाद्या जोडप्याला गर्भधारणा इतक्यात नको असल्यास ते आपली स्त्रीबीजे व शुक्राणू किंवा गर्भ जतन करून ठेवू शकतात. असे केल्याने त्यांची प्रजननक्षमता कमी होत नाही आणि त्यांना भविष्यात मूल होऊ शकते.

2. बाहेरच्या पदार्थांचे सेवन

बाहेरचे पदार्थ खाल्ल्याने गर्भधारणा होण्यास उशीर लागू शकतो हे अभ्यासातून सिद्ध झाले आहे. स्त्रियांच्या बाबतीत बाहेरचे पदार्थ अतिप्रमाणात खाल्ल्याने त्यांचे प्रजननाचे हार्मोन्स बदलतात आणि त्यांची मासिक पाळी अनियमित होते. संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की, आहारात धान्य, मासे आणि भाज्यांचा समावेश असल्यास प्रजननक्षमता वाढते.

3. वजन खूप कमी किंवा खूप जास्त असणे

BMI < 18.5 –खूप कमी वजन

BMI > 25 – खूप जास्त वजन

BMI > 30 – स्थूल

वजन खूप कमी असल्यास गर्भाशयाच्या कार्यामध्ये बिघाड होऊन वंध्यत्व येते. अशा स्त्रियांना वेळेपूर्वी प्रसूती होण्याची शक्यता अधिक असते. पुरुषांच्या बाबतीत, वजन खूप कमी असल्यास शुक्राणूंचे कार्य मंदावते.

स्थूल स्त्रियांना अनियमित मासिक पाळीची समस्या भेडसावते व त्यांना वंध्यत्व, गर्भपात आणि मृत बालकाच्या जन्माची समस्या भेडसावू शकते. स्थूल पुरुषांच्या वीर्याची पातळी सामान्य वजनाच्या पुरुषांपेक्षा तिपटीने कमी असते. स्थूलतेमुळे वीर्य ताठरता देखील होत नाही. आभ्यासाअंती असे सिद्ध झाले आहे की, स्थूलतेमुळेआयव्हीएफ उपचार देखील यशस्वी होण्याचे प्रमाण अत्यंत कमी असते. गर्भधारणेच्या शक्यता वाढवण्यासाठी वजन नियंत्रणात ठेवणे अतिशय महत्वाचे आहे.

4. झोप

स्त्रिया आणि पुरुष दोघांच्याही बाबतीत खूप झोप किंवा खूप कमी झोप दोन्हीही प्रजनन क्षमतेवर परिणाम करते. झोप पूर्ण न झाल्याने हार्मोनल असमतोल होऊन वंध्यत्व येते. प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी दररोज रात्री ७-८ तास झोप होणे आवश्यक आहे.

· कॅफिन

· कॅफिनच्या अतिरिक्त सेवनाने स्त्रियांच्या प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम (गर्भपात,बाळाचे निधन, मृत बाळाची प्रसूती) होतो.ज्या स्त्रिया दिवसाला १००मिग्रॅ कॅफिन चे सेवन करत असल्यास त्यांचा गर्भपात होण्याची शक्यता वाढते.

5. धुम्रपान

सिगारेटच्या धुम्रपानामध्ये ४००० केमिकल्स असतात. धूम्रपानाने शुक्राणूंची संख्या, त्यांची रचना आणि शुक्राणुच्या डीएनए वरही विपरीत परिणाम होतो. ज्या स्त्रिया धुम्रपान करतात त्यांच्या बीजांडांची संख्या घटल्याचे, गर्भाशय व गर्भनलिकांचे कार्य मंदावल्याचे आणि हार्मोन्सच्या पातळ्या हलल्याचे अभ्यासाने सिद्ध झाले आहे.

6. मद्यपान

मद्यपानाने पुरुषांमध्ये मद्यपानाने वृषण बारीक होणे, शुक्राणूंची संख्या घटणे, लीबिडोचे प्रमाण कमी होणे या समस्या दिसून येतात. मद्यपान करणाऱ्या स्त्रियांमध्ये गर्भधारणेची समस्या असते तसेच, त्वरित गर्भपात व बाळाच्या निधन होण्याच्या शक्यता वाढतात. ज्या स्त्रियांना हँगओव्हर नसतो त्यांच्या तुलनेत ज्यांना तो असतो त्या स्त्रियांना वंध्यत्व येत असल्याचे अभ्यासाने सिद्ध झाले आहे. मद्यपानाच्या प्रमाणाने खूप फरक पडतो हेच येथे सांगायचे आहे.

7. तणाव

शारीरिक, सामाजिक किंवा आर्थिक ताण हा समाजाचा एक महत्वाचा भाग झाला आहे.सामाजिक दबाव, चाचण्या, निदान, उपचार,अयशस्वी उपचार, अपूर्ण इच्छा आणि या सर्वांशी जोडलेला पैसा या सर्व बाबींमुळे तणाव हा एक महत्वाचा घटक बनला आहे.

तणाव आणि नैराश्य आल्याने टेस्टोस्टेरोनची संख्या कमी होते, गोनाडलची कार्यक्षमता घटते व पर्यायाने शुक्राणूंची संख्या कमी होते. ज्या स्त्रिया आठवड्याला ३२ तासांहून अधिक काम करतात त्यांना उशिरा गर्भधारणा होते.

8. व्यावसायिक संधी

i. हवेचे प्रदुषणात्मक घटक

कार्बन मोनोक्साइड, कारखान्यातून उत्सर्जित होणारे वायू आणि सल्फर डायओक्साईड मुळे पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. आणि वेळेपूर्वी प्रसूती, मृत बालकाची प्रसूती आणि नवजात बालकाचा मृत्यू या समस्या देखील उद्भवतात.

ii. जड धातू

· रंग, सिरेमिक इत्यादी मध्ये आढळणारे शिसे मासिक पाळीवर विपरीत परिणाम करते व त्यामुळे गर्भपात ई. समस्या होऊ शकतात.

· कारखान्यातून उत्सर्जित होणाऱ्या वायूंमध्ये आढळणारी, थर्मामीटर मध्ये आढळणाऱ्या मर्क्युरी ई. वायूंमुळे शुक्राणूंचा विकास खुंटतो.

iii. वंगण

केवाय जेली सारख्या सर्व वंगणांमुळे शुक्राणूवर परिणाम होतो.

iv. विस्कळीत करणारे केमिकल्स (EDC)

EDC हे असे केमिकल्स आहेत ज्यांमुळे नैसर्गिक हार्मोन्स सारखे तोतया हार्मोन्स तयार होतात. त्यामुळे शरीरातील हार्मोन्सच्या कार्यावर विपरीत परिणाम होतो. अन्न साठवणीचे प्लास्टिक, लहान मुलांची खेळणी, साबण, वंगणात्मक तेले, शाम्पू ई. मध्ये EDC सापडते.

v. किरणोत्सर्जन

अभ्यास असे दर्शवतो की गॅमा आणि एक्स-रे मुळे देखील प्रजननक्षमतेवर विपरीत परिणाम होतो. सेलफोन्स मुळे पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर विपरीत परिणाम होतो. सेलफोन्स इतर ठिकाणी ठेवणाऱ्या पुरुषांच्या तुलनेत ते कमरेला बांधणाऱ्या पुरुषांमध्ये वंध्यत्वाचे प्रमाण अधिक असल्याचे अभ्यासातून सिद्ध झाले आहे.

vi. कपडे आणि गरम पाण्याने अंघोळ

तंग कपडे घातल्याने शरीराचे तापमान वाढते आणि वीर्याची गुणवत्ता ढासळते.गरम पाण्याने अंघोळ केल्यास शुक्राणूंची निर्मिती कमी होते.

9. उत्तेजक द्रव्ये

मार्जुआना, कोकेन ई. उत्तेजक द्रव्यांनी शुक्राणूंची निर्मिती कमी होते. आणि त्यामुळे लैंगिक इच्छा कमी होऊन वीर्य ताठरता ई. च्या संदर्भातल्या समस्या निर्माण होतात.

10. लिहून दिलेली औषधे

कोल्कीकैन, सायक्लोफोस्फामैड, अंटीसायकोटिक्स, एच २ ब्लोकर्सयांसारख्या औषधांनी प्रजनन क्षमतेवर जो परिणाम होतो तो सुधारता येत नाही. या औषधांनी प्रोलाकटीन वाढते व लैंगिक संभोग करता येत नाही. ज्यामुळे प्रजननक्षमतेवर परिणाम होतो अशी औषधे ओळखून ते परिणाम कायमस्वरूपी होतात का?याचा शोध घ्यायला हवा.

आरोग्यपूर्ण आहारासाठी काही क्लुप्त्या:

कर्बोदके, फायबर, फोलेट, लायकोपीन युक्त आहार तसेच फळे आणि भाजेपाला यांचा आहारात समावेश केल्यास वीर्याची गुणवत्ता सुधारते.प्रोटीन आणि फॅटयुक्त खाण्याचा कमीतकमी समावेश केल्यास पुरुष आणि स्त्रिया दोघांचीही प्रजनन क्षमता वाढते.

प्रजननासाठीचा आहार म्हणजे काय?

ट्रान्स फैट्स पेक्षा जास्त मोनाउनसच्यूरेटेड अन्न खाणे, मांसाहारापेक्षा शाकाहारी अन्न खाणे, कमी फैट्स असलेले दुधाचे पदार्थ खाणे, ग्लायसेमिक पदार्थ कमी करणे, आणि लोह व जीवनसत्वयुक्त आहार घेणे हे प्रजननक्षमता वाढवण्यासाठी उत्तम असते.असे अन्न खाणाऱ्या जोडप्यांमध्ये वंध्यत्वाचे प्रमाण कमी असल्याचे अभ्यासाने सिद्ध झाले आहे.

एन्टीऑक्सिडंट्सचे कार्य

एन्टीऑक्सिडंट्स वीर्य ताठरतेसाठी अडथळा आणणारे जास्तीचा ROS (रीअक्टीव ऑक्सिजन स्पेसीज) काढून टाकतात. व पुरुषांच्या पेशींमध्ये कमी कार्यरत असलेल्या संयुगांचा ROS च्या संयुगांशी संयोग घडवून आणण्यात मदत करतात. मल्टीव्हिटेमीन्स घेणाऱ्या महिलांमध्ये वंध्यत्वाची समस्या कमी दिसते. क, ई जीवनसत्व, अल्ब्युमिन, सेरुलोप्लास्मीन, फेरीटीन इत्यादी मध्ये एन्टीऑक्सिडंट्स असतात.

डर्टी डझन्स: (जंतुनाशकांचे खूप प्रमाण असलेले अन्न): सफरचंद, सेलेरी, स्ट्रोबेरीज, पिचेस, पालक, आयात केलेले द्राक्ष आणि नेकटारिन्स, गोड मिरपूड, बटाटे, ब्ल्यूबेरीज, लेट्युस, आणि कोलार्ड ग्रीन्स.

क्लीन फिफ्टीन: (कमीत कमी जंतुनाशके असलेले अन्न):.कांदे, गोड मका, अननस,अवाकाडो, अस्पारागस, गोड मटार, आंबे, एगप्लांट, कांटालोप, किवी, कोबी,कलिंगड,मश्रूम्स, रताळे,द्राक्षे

मासे आणि शिंपले खाताना लक्षात ठेवण्याच्या सुरक्षेसंबधित बाबी

1. शार्क,स्वोर्डफिश,आणि किंग माकेरेल मध्ये मर्क्युरी ची पातळी अधिक असल्याने ते मासे खाऊ नयेत.

2. कोळंबी, कॅन्ड लाईट तुना, साल्मन , पोलॉक आणि कॅटफिश यांसारखे कमी मर्क्युरी असलेले मासे खावे. व्हाईट टूना मध्ये कॅन्ड लाईट तुना पेक्षा जास्त मर्क्युरी असते.

आम्ल रोखण्यासाठीच्या साध्या सवयी

1. लेबल्स वाचा:.जर तुम्हाला त्यावर लिहिलेले उच्चारता आले नाही तर ते विकत घेऊ नका.

2. सेंद्रीय खा: याची किंमत जरी जास्त असली तरीही जंतुनाशके फवारलेले घातक अन्न खाण्यापेक्षा महाग अन्न केव्हाही चांगले. अन्न वाहून नेण्याचे अंतर जेवढे कमी तितके त्यावर फवारलेल्या जंतुनाशकांचे प्रमाण कमी असते.

3. केमिकल्स टाळा: सौंदर्यप्रसाधने आणि पाणी यांमध्ये केमिकल्स चे प्रमाण जास्त असते. तसेच, पॅक केलेले सर्व पदार्थ, सुगंधी अत्तरे, एअर फ्रेशनर्स आणि घरात स्वच्छता करण्यासाठी वापरली जाणारी द्रव्ये यांमध्ये केमिकल्स असतात. तुम्ही लिंबाचा रस आणि व्हिनेगर वापरून स्वत: स्वच्छता द्रव्ये तयार करू शकता व काही तेलांचा वापर एअर फ्रेशनर म्हणून करू शकता.

4. फिल्टर केलेले पाणी प्या: BPA (बिशफेनोल ए) नसलेल्या बाटल्यातील पाणी प्या. प्लास्टिक पेक्षा धातू किंवा काचेच्या भांड्यातील पाणी अधिक सुरक्षित असते.

5. प्लास्टिक किंवा अन्मार्क भांड्याचा वापर : “माय्क्रोव्हेह सेफ” असे लिहिलेली प्लास्टिकची भांडी वापरा.

व्यायाम

पुरुष आणि महिला दोघांनीही दररोज काही प्रमाणात व्यायाम करायला हवा. दर आठवड्याला किमान ३ तास व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो.

जीवनशैलीमध्ये केलेले बदल स्त्रिया व पुरुष दोघांचीही प्रजननक्षमता वाढवते. तुम्ही गर्भधारणेकरता प्रयत्नशील असाल तर, बाहेरचे खाणे टाळा,धुम्रपान आणि मद्यपान टाळा, वजन नियंत्रणात ठेवा आणि समतोल आहार घ्या.

पालकत्वासाठी शुभेच्छा!

Write a Comment

BOOK A FREE CONSULTATION